Worst Food For Brain : मेंदूसाठी हे पदार्थ ठरतात सर्वात खतरनाक, पडतो वाईट प्रभाव.. आजच खाणं सोडा हे पदार्थ

आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी सकस आहार खूप महत्त्वाचा आहे. पण काही खाद्यपदार्थ असे असतात जे सतत खाल्ल्यास त्याचा मेंदूवर वाईट परिणाम होतो. ते पदार्थ कोणते हे जाणून घेऊया.

Worst Food For Brain : मेंदूसाठी हे पदार्थ ठरतात सर्वात खतरनाक, पडतो वाईट प्रभाव.. आजच खाणं सोडा हे पदार्थ
Image Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Feb 02, 2023 | 7:48 AM

नवी दिल्ली – आपल्या शरीराच्या सर्व अवयवांचे (body parts) स्वतःचे महत्त्व आणि कार्य असते. शरीराच्या या अत्यावश्यक भागांपैकी असलेला मेंदू हा सर्वात महत्त्वाची भूमिका बजावतो. मेंदू (brain) हा आपल्या शरीराचा सर्वात महत्वाचा भाग आहे. तो आपल्या शरीरातील प्रक्रिया सुरळीत चालण्यास मदत करते. अशा परिस्थितीत शरीराच्या या महत्त्वाच्या भागाची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. संतुलित आणि सकस आहार (healthy food) घेतल्याने मेंदूचे कार्य चांगल्या प्रकारे होण्यास मदत होते. पण असे अनेक खाद्य पदार्थ आहेत, जे खाल्ल्याने आपल्या मेंदूवर वाईट परिणाम होतो. त्यांच्या सेवनाने आपली स्मरणशक्ती आणि मूड प्रभावित होतो. आपल्या मेंदूला हानी पोहोचवणारे पदार्थ कोणते हे जाणून घेऊया.

अती गोड पदार्थ

जास्त गोड खाणे केवळ आपल्या आरोग्यासाठीच नाही तर मनासाठीही हानिकारक ठरू शकते. खरं तर, जास्त साखर खाल्ल्याने हृदयविकार आणि टाइप 2 मधुमेहाचा धोका तर वाढतोच, पण त्याचा मेंदूवरही नकारात्मक परिणाम होतो. जास्त साखरेचे सेवन मेंदूतील इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता देखील वाढवू शकते, ज्यामुळे शिकण्याची क्षमता, स्मरणशक्ती आणि न्यूरॉनच्या विकासावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

हे सुद्धा वाचा

ट्रान्स फॅट

ट्रान्स फॅट देखील आपल्या मेंदूसाठी खूप हानिकारक असतात. हे एक प्रकारचे अनसॅच्युरेटेड फॅट असते. त्याच्या सेवनाने मेंदूवर हानिकारक परिणाम होतो. ट्रान्स फॅट्सचे सेवन केल्याने मेंदूमध्ये जळजळ होऊ शकते, ज्यामुळे मेंदूची उत्पादकता आणि न्यूरोनल क्रिया कमी होतात. बाजारात मिळणारे मांस, दुग्धजन्य पदार्थ आणि वनस्पती तेलांमध्येही ट्रान्स फॅट आढळते.

मद्यपान

अल्कोहोलचे अतिसेवन केवळ आपल्या आरोग्यासाठीच नाही तर आपल्या मानसिक आरोग्यासाठीही हानिकारक आहे. अल्कोहोलचा गैरवापर केवळ यकृत आणि पोटावर परिणाम करत नाही तर दीर्घकालीन सेवनामुळे मेंदूचा व्हॉल्यूम कमी होणे, मेटाबॉलिज्ममध्ये बदल, आणि न्यूरोट्रांसमीटर समस्या देखील होऊ शकतात.

रिफाइंड कार्ब्स

ब्रेड, पास्ता, कुकीज यांसारख्या रिफाइंड कार्बोहायड्रेट्सचे सेवन देखील आपल्या मेंदूसाठी हानिकारक ठरू शकते. खरंतर, या खाद्यपदार्थांमध्ये कोणतीही फायबर आणि पोषक तत्वं नसतात, ज्यामुळे शरीर ते लवकर पचते. त्यामुळे साखर आणि इन्सुलिनची पातळी वाढते. तसेच, रिफाइंड कार्बोहायड्रेट्समधे आढळणारा उच्च ग्लायसेमिक इंडेक्स (GI) स्मरणशक्ती खराब करू शकतो.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.