Health News : आयुर्वेदिक उपचारात त्रिफळा रामबाण, पण या लोकांसाठी घातक

त्रिफळाचे अनेक फायदे आहेत. त्याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारकही शक्ती वाढवण्यासाठी फायदा होतो. पण त्रिफळाचे जितके फायदे आहेत तितकेच ते हानिकारकही आहे. काहीवेळा त्रिफळाचे सेवन शरीरासाठी हानिकारक देखील ठरू शकते.

Health News : आयुर्वेदिक उपचारात त्रिफळा रामबाण, पण या लोकांसाठी घातक
Follow us
| Updated on: Apr 23, 2023 | 11:38 PM

बहुतेक लोक त्यांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आयुर्वेदिक उपचार करतात. आयुर्वेदातही चांगले आरोग्य ठेवण्यासाठी अनेक योग्य मार्ग सांगितले आहेत. शरीराचा प्रत्येक अवयव निरोगी ठेवण्यासाठी आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचा वापर केला जातो. यापैकी एक म्हणजे त्रिफळा. त्रिफळा हे पोटाच्या आरोग्यासाठी वरदान मानले जाते. आवळा, हरड, जायफळ अशा अनेक वनौषधींपासून बनवलेल्या त्रिफळामध्ये अँटीऑक्सिडंट्स, अँटी-इंफ्लेमेटरी आणि व्हिटॅमिन सी सारखे गुणधर्म असतात.

त्रिफळाचे अनेक फायदे आहेत. त्याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारकही शक्ती वाढवण्यासाठी फायदा होतो. पण त्रिफळाचे जितके फायदे आहेत तितकेच ते हानिकारकही आहे. काहीवेळा त्रिफळाचे सेवन शरीरासाठी हानिकारक देखील ठरू शकते. तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कोणत्या लोकांनी त्रिफळा घेणे टाळावे.

मधुमेह असलेल्या लोकांनी काळजी घ्यावी

मधुमेह रोखण्याचे गुणधर्म त्रिफळामध्ये आहेत. पण जर एखाद्या व्यक्तीला आधीपासूनच मधुमेहाचा त्रास असेल तर त्यांनी त्रिफळाचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्रिफळा खाल्ल्याने मधुमेहाचा त्रास असणार्‍यांना हायपोग्लायसेमियाची समस्या होऊ शकते. त्यामुळे त्रिफळाचे सेवन करण्याआधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.

वजन कमी असणारे

ज्या लोकांचे वजन कमी आहे त्यांनी त्रिफळा चूर्ण घेणे टाळावे.  त्रिफळामध्ये असे गुणधर्म आहेत की ते मेटाबॉलिज्म सुधारून पोटाची चरबी कमी करते. त्यामुळे ज्यांचे वजन कमी आहे त्यांनी हे चूर्ण घेऊ नये. कारण ते घेतल्याने आणखी वजन कमी होण्याची समस्या निर्माण होऊ शकते.

पोट बिघडल्यावर खाऊ नका

त्रिफळा हे पोटासाठी रामबाण औषध मानले जाते. पण, पोट बिघडल्यावर कोणीही चुकून त्रिफळा चूर्ण खाऊ नये. कारण या चूर्णमध्यये बद्धकोष्ठता दूर करणारे घटक असतात.

गरोदरपणात हे चूर्ण खाऊ नये

तुम्हाला माहीती आहे का गरोदरपणात त्रिफळा चूर्ण कोणीही चुकूनही खाऊ नये. कारण हे चूर्ण खाल्ल्याने गर्भपात होऊ शकतो. गरोदरपणात पोटात गॅस तयार होण्याची समस्या निर्माण होते. ती टाळण्यासाठी महिला त्रिफळाचे सेवन करतात. पण असे केल्याने नुकसान होऊ शकते. त्यामुळे गर्भधारणेदरम्यान त्रिफळाचे सेवन हे डॉक्टरांच्या सल्ल्यावरच करा.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.