हिवाळ्यातील आहार हे आपल्यातील बहुतेक लोकांचे खूप आवडीचे आहे. कारण हिरव्या भाज्या आणि कॉर्न रोटी सारखे चवदार पदार्थ मोठ्या आवडीने खाल्ले जातात. तसेच या दिवसांमध्ये शेंगदाण्यापासून बनवलेल्या पदार्थांचा आपल्या आहारात भरपूर प्रमाणात समावेश केला जातो. तसेच मोहरीची हिरवी पाने, पालक, आणि इतर पालेभाज्यांमध्ये अधिक प्रमाणात गुणधर्मांचा खजिना असल्याने यात फायबर, व्हिटॅमिन सी आणि लोह यासारखे अनेक पोषक घटक तुम्हाला थंडीत निरोगी ठेवण्याचे काम करतात. त्यामुळे याच्या सेवनाने तुमचे आरोग्य नीट राहते आणि हे आरोग्यासाठी वरदान मानले जाते. निरोगी राहण्यासाठी हिरव्या भाज्यांचे सेवन करणे आवश्यक आहे. कारण हे तुमच्या निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली समजली जाते.
पण तुम्हाला माहित आहे का की या हिरव्या भाज्या काही लोकांच्या शरीरासाठी समस्या बनू शकतात. कारण हिरव्या भाज्यांमध्ये ऑक्सलेटसारखी अनेक संयुगे असतात जी काही लोकांच्या शरीराला हानी पोहोचवू शकतात. कोणत्या लोकांनी हिरव्या भाज्या खाणे टाळावे हे तज्ज्ञांमार्फत आम्ही तुम्हाला सांगतो.
दिल्लीच्या श्री बालाजी ॲक्शन मेडिकल इन्स्टिट्यूटच्या चीफ डायटीशियन प्रिया पालीवाल यांनी सांगितले की, ज्या लोकांना किडनीचा आजार आहे तसेच अपचनाच्या व गॅसशी संबंधित समस्या असलेल्या लोकांनी लोकांनी हिरव्या भाज्यांचे सेवन करू नये.
किडनीसंबंधित आजाराशी लढत असलेल्या रुग्णांनी जर पाले भाज्यांचे सेवन केल्यास शरीरातील केराटिन वाढल्याने आरोग्य बिघडू शकते. अशावेळी प्युरीनयुक्त पदार्थ कमी खाण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. हिरव्या भाज्यांमधील पालकामध्ये असे अनेक घटक असतात ज्याच्या सेवनाने किडनीच्या रुग्णांचा त्रास वाढवू शकतात.
चुकीच्या खानपानामुळे व आहाराचे नीट सेवन न केल्याने सुद्धा स्टोन होण्याची शक्यता असते. त्यातच स्टोन होण्याचे मुख्य कारण म्हणजे पाणी कमी प्रमाणात पिणे, तसेच बियानेयुक्त असलेल्या भाज्यांच्या सेवनाने देखील स्टोनची समस्या उद्भवू शकते. तसेच तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार पालेभाज्यांमध्ये काही मातीचे कण असतात, अशाने तुम्ही जर भाज्यांचे सेवन केल्याने किडनीपर्यंत किंवा पित्ताशयात स्टोन तयार होऊ लागतात. त्यामुळे तुम्हाला जर स्टोन असेल तर पालकसारख्या भाज्यांपासून अंतर ठेवा. प्रिया पालीवाल म्हणते की, जर एखाद्याचा बीपी जास्त असेल तर त्यानेही तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच पालक किंवा इतर हिरव्या भाज्या खाव्या. कारण त्यात पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते.
जर एखाद्याला आधीच ॲलर्जीच्या समस्या असेल तर त्या लोकांनी पालेभाज्या खाऊ नयेत, असे तज्ज्ञांनी सांगितले. याशिवाय गरोदर महिलांनीही याचे सेवन करू नये कारण हिरव्या भाज्यांमध्ये फोलेटचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे गरोदर महिलांना यायचा त्रास होऊ शकतो.
जर कोणाला संधिवात किंवा सांधेदुखीचा त्रास होत असेल तर त्यानेही तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच हिरव्या भाज्या किंवा इतर पालेभाज्या खाव्यात. कारण यात ऑक्सलेट नावाचे घटक असते आणि त्यामुळे समस्या आणखी वाढू शकतात.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)