या कारणांमुळेही तुम्हाला पडू शकते टक्कल
केस गळण्याच्या समस्येने हल्ली सर्वजण त्रस्त असतात. परंतू या केस गळण्यासाठी आपल्या आहारातील काही सवयी अधिक हातभार लावत असतात. एका संशोधनात आपल्या विविध प्रकारचे पेय म्हणजे ड्रींक पिण्याचा केसांवर नेमका काय परीणाम होतो ते पाहूयात.
मुंबई : वाढत्या वयाबरोबर शरीरात अनेक बदल होत असतात. चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे, केस पांढरे होणे, तसेच केस गळणे हे वाढत्या वयाचे संकेत आहेत. वयाआधीच केस गळणे कोणालाही आवडणार नाही. पुरूष असो की स्रिया सर्वांनाच आपले केस प्रिय असून केसांच्या आरोग्यासाठी जो तो प्रयत्न करीत असतो. तसे पाहीले तर अनुवंशिकतेमुळे केस गळत असतात. परंतू आपल्या काही सवयींमुळे जर केस गळत असल्याचे समोर आले आहे. एका अभ्यासात असे आढळले आहे की एनर्जी ड्रींक पिण्याच्या सवयीचाही केसांच्या आरोग्यावर परीणाम होतो.
पुरूषांना एनर्जी ड्रींक पिण्याची सवय असते. परंतू नियमितपणे एनर्जी ड्रींक प्यायल्याने अनेक पुरूषांमध्ये टक्कल पडण्याचा वेग तीस टक्के वाढू शकतो. अभ्यासामध्ये असेही समजले आहे की केवळ एनर्जी ड्रींकच नव्हे तर फिजी ड्रींक, स्पोर्ट्स ड्रींक आणि गोड चहा याने देखील केस गळल्याचा धोका जादा वाढतो.
सॉफ्ट ड्रींकनेही वाढतो आहे धोका
चीनची राजधानी बिजींगच्या सिंघुआ युनिव्हर्सिटीच्या विशेषतज्ञांच्या संशोधनात फिजी ड्रींक ( कोक, पेप्सीसारख्या सॉफ्ट कार्बोनेटड ड्रींक्स ) आणि स्पोर्ट्स ड्रींक ( इलेक्ट्रोलाइट युक्त ड्रींक्स जे खेळाडू त्वरीत एनर्जी यावी यासाठी एथलीट्स पाण्याऐवजी पितात ) प्यायल्याने अधिक समस्या निर्माण होण्याचा धोका वाढत असतो. जर्नल न्यूट्रीएंट्सने म्हटल्या प्रमाणे या अभ्यासात समाविष्ट झालेले पुरूष दर आठवड्यास एक ते तीन लिटर दरम्यान ड्रींक्सचे सेवन करीत असतात त्यांना हेअरफॉलचा धोका अधिक असतो. तसेच जे लोक दर एकापेक्षा अधिक वेळा साखरयुक्त ड्रींक पितात त्यांना केस गळण्याचा धोका जे लोक अशा पेयांना स्पर्श देखील करीत नाही. त्या लोकांपेक्षा 42 टक्के अधिक आढळला.
अभ्यासात असेही आढळले की ज्या लोकांनी केस गळण्याची समस्या होती ते आठवड्यातून 12 वेळा साखरयुक्त पेय पित होते. 18 ते 45 या वयोगटातील एक हजाराहून अधिक जणांचा चार महिने या प्रयोगात अभ्यास केला गेला. या अभ्यासात केवळ पेयांचाच नाही तर लोकांच्या खानपानाच्या इतर सवयींचाही अभ्यास केला गेला. जे पुरूष भाज्या कमी आणि फास्ट फूड अधिक सेवन करतात त्यांचे केस अधिक वेगाने गळतात. तसेच या अभ्यासात चिंता, ताणतणावामुळेत अधिक प्रमाणात करतात त्यांचेही केस अधिक गळत असतात. केसांना आरोग्यपूर्ण ठेवण्यासाठी हेल्दी डाएट देखील महत्वाचे आहे.
केसांसाठी कोणतेही वेगळे सुपरफूड नाही
हेअर फॉलीकल पेशी दुसऱ्या क्रमांकाच्या सगळ्यात जास्त विभाजित होणाऱ्या पेशी आहेत. त्यांना सर्व पोषक तत्वांच्या संतुलित स्वस्थ आहाराची गरज असते. यात लीन प्रोटीन ( कमी फॅट, कर्ब्स आणि कोलेस्ट्रॉलवाले पदार्थ) आरोग्यदायी कर्ब्ज, फॅट, विटामिन आणि खनिज समाविष्ट आहेत. परंतू केसांसाठी कोणतेही वेगळे सुपरफूड नसल्याचे लंडनचे स्कीन एक्सपर्ट डॉ.शेरोन वोंग यांनी सांगितले आहे. मानवी शरीर जीवंत राहण्यासाठी केस ही आवश्यक बाब नसल्याने शरीर केसांच्या विकासासाठी पोषकतत्वांच्या वापरासाठी प्राथमिकता देत नाही. त्यामुळेच केसांच्या आरोग्यासाठी जास्तीत जास्त सकस आहार घेणे गरजेचे असते. पोषक तत्वांची कमतरता केसांना पातळ आणि ते गळण्यास हातभार लावत असतात असेही ते म्हणाले.