सावध व्हा… लहान मुलांमध्ये कर्करोगाचा धोका वाढतो आहे. लक्षणे आणि उपाय जाणून घ्या

सर्वसाधारणत: मोठ्या व्यक्तींच्या तुलनेत लहान मुलांमध्ये कर्करोगाची लक्षणे लवकर दिसून येतात, परंतु अनेकदा आपण त्या लक्षणांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो, वेळीच सावध होत तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्वाचे ठरते.

सावध व्हा... लहान मुलांमध्ये कर्करोगाचा धोका वाढतो आहे. लक्षणे आणि उपाय जाणून घ्या
Cancer
Follow us
| Updated on: Feb 10, 2022 | 9:59 AM

मुंबई :  गेल्या काही वर्षांपासून भारतात कर्करोग (cancer) फार वेगाने पसरताना दिसत आहे. धावपळीच्या जीवनात बदलती जीवनपध्दती, व्यायामाचा अभाव, फास्टफूड आदी अनेक घटक कर्करोगाला कारणीभूत ठरत असतात. विशेषत: लहान मुलांमध्ये कर्करोगाचे (children cancer) वाढते प्रमाण अधिक चिंताजनक (worrying)  आहे. कर्करोग हा अतिशय गंभीर आजार आहे. या आजाराचा वेळीच शोध लागला नाही तर या आजाराने रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. कर्करोग होण्याची वेगवेगळी कारणे आहेत. मात्र, शरीरातील पेशी असामान्य झाल्या की कर्करोग होतो. कर्करोगाचे अनेक प्रकार आहेत, स्तनाचा कर्करोग, त्वचेचा कर्करोग, फुफ्फुसाचा कर्करोग आणि कोलन आदी. कर्करोगाने तरुणांनाच नव्हे तर लहान मुलांनाही ग्रासले आहे. ब्लड कॅन्सर, मेंदू आणि पाठीच्या कण्यातील ट्यूमर, न्यूरोब्लास्टोमा, किडनी कॅन्सरची प्रकरणे प्रामुख्याने लहान मुलांमध्ये नोंदवली जातात. आज लहान मुलांमधील कर्करोगाची लक्षणे, उपाय याबाबत माहिती घेणार आहोत.

मुलांधील कर्करोगाची लक्षणे

1) त्वचा पिवळसर होणे,

2) तोंडातून किंवा नाकातून रक्त येणे.

3) हाडे दुखणे, पाठदुखी

4) चालण्यात अडचणी निर्माण होणे

5) पोटात किंवा मांडीवर टेंगूळ येणे

6) सकाळी उलट्या होणे

7) सतत ताप येणे

8) एकदम वजन कमी होणे

9) दिसण्याची क्षमता कमकुवत होते.

काही आजारांमुळे मुलांमध्ये कर्करोग होण्याची शक्यता वाढते. उदाहरणार्थ, मुलांमध्ये डाऊन सिंड्रोम असलेल्या मुलांमध्ये ल्युकेमिया होण्याची शक्यता 10-20 पट जास्त असते. या शिवाय कर्करोग हा काहीवेळा तो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातो. जर तुम्हाला कर्करोग असेल, तर तुमच्या मुलाला भविष्यात कर्करोग होण्याची शक्यता असते. रेटिनोब्लास्टोमा हा डोळ्यांच्या कर्करोगाचा दुर्मिळ प्रकार आहे. काही मुलांना ते आईच्या पोटातून होते. मुलाला डोळ्यांचा त्रास असल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. एका अहवालानुसार अहवालांनुसार, EVB हा लहान मुलांमध्ये एक सामान्य संसर्ग आहे. त्यामुळे मुलांमध्ये कर्करोग पसरतो.

कर्करोगापासून असे रहा लांब

मुलांना कॅन्सरपासून दूर ठेवण्यासाठी, विशेषतः स्वतःला आणि मुलाला धूम्रपान किंवा तंबाखूच्या सेवनापासून दूर ठेवावे लागेल. मुलांच्या रोजच्या आहारात भरपूर फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्यांचा समावेश करा. बाहेर जाताना सनस्क्रीन वापरा, विशेषतः मुलांच्या त्वचेवर तसेच मुलांच्या वजनाकडे विशेष लक्ष द्यावे.

संबंधित बातम्या

Beauty care: चेहऱ्याच्या समस्या पटकन दूर करतं तमालपत्र! कसा करावा उपयोग? जाणून घ्या!

खरंच सीटीस्कॅनमध्ये खराब झालेलं फुफ्फुस दिसत नाही? असं घडल्यास नेमके काय करावं

कोरोनातून बरे झाल्यानंतर पल्मोनरी फायब्रोसिस होऊ शकतो, प्रकार काय आणि उपचार काय?

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.