तुमच्या हृदयाचं पण ऐका की! हार्ट अटॅकपूर्वी मिळतात हे संकेत

Heart Attack Symptoms | चतुरस्त्र अभिनेता श्रेयस तळपदे याला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. 'वेलकम 3' चित्रपटाच्या शुटींगनंतर त्याला अस्वस्थ वाटले आणि तो खाली कोसळला. अँजिओप्लास्टी करण्यात आली. त्याची प्रकृती स्थिर आहे. पण हृदयविकार येण्यापूर्वी शरीर आपल्याला हे संकेत देते. त्याकडे अजिबात दुर्लक्ष करु नका.

तुमच्या हृदयाचं पण ऐका की! हार्ट अटॅकपूर्वी मिळतात हे संकेत
Follow us
| Updated on: Dec 15, 2023 | 8:42 AM

नवी दिल्ली | 15 डिसेंबर 2023 : दमदार अभिनयाच्या जोरावर मराठीसह हिंदीत ओळख निर्माण करणाऱ्या श्रेयस तळपदे याला हृदय विकाराचा तीव्र झटका आला. सध्या तो खिलाडी अक्षय कुमार याच्यासोबत ‘वेलकम टू द जंगल’ हा चित्रपट करतोय. शुटींगनंतर तो घरी परतला. त्यावेळी त्याला अस्वस्थ वाटले. पण तो लागलीच जमिनीवर कोसळला. त्याला तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याच्या हृदयातील रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज आढळले. त्याच्यावर यशस्वी अँजिओप्लास्टी करण्यात आली. त्याची प्रकृती स्थिर आहे. मुळात हृदय विकाराचा झटका कशामुळे येतो? त्याची लक्षणं दिसतात का? अटॅक आल्यानंतर काय करावं असे अनेक प्रश्न डोक्यात सुरु होतात. अटॅकपूर्वी शरीर हे संकेत देते, तुम्हाला हे माहिती आहे का?

काय आहेत लक्षणे

  • हृदय पण त्याची व्यथा सांगते. ती समजून घ्यायची असते. जर ब्लॉकेज असेल तर हार्ट अटॅक येण्याची भीती अधिक असते.
  • हृदयाला रक्त पुरवठा पुरेशा प्रमाणात होत नसेल तर हृदय विकाराचा झटका येतो
  • हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्त वाहिन्यांमध्ये अडथळा आल्यास, त्या ब्लॉक झाल्यास श्वास घ्यायला त्रास होतो
  • हृदय विकार येण्यापूर्वी छातीत कळ उठते, तीव्र वेदना होतात. चेहरा, पाठ अथवा डाव्या हाताला मुंग्या येतात. घाम येतो.
  • छाती दुखते, गुदमरल्यासारखे वाटते. अस्वस्थ वाटते.
  • हृदयाला रक्त पुरवठा होत नसले तर धाप लागते. थकवा जाणवतो. हृदयाचे ठोके वाढतात
  • उच्च रक्तदाब, मधुमेहींना हृदयविकाराचा धोका अधिक असतो

ही चाचणी करु शकता

हे सुद्धा वाचा
  1. ईसीजी – ईसीजी म्हणजे इलेक्ट्रो कार्डियोग्राम. ईसीजी चाचणीमुळे हृदयाच्या इलेक्ट्रिकल अ‍ॅक्टिव्हिटी नोंदवली जाते. त्याचा आलेख तयार होतो. त्यामुळे हृदयाची गतीची अनियमितता नोंदवल्या जाते.
  2. टीएमटी- ट्रेड मिल टेस्टमध्ये हृदय, धमन्या, शिरा, रक्तवाहिन्या यांचं निरीक्षण करण्यात येते. ट्रेड मिलवर धावत असताना हृदयाची गती कशी आहे, ते तपासले जाते. त्यावरुन हृदयाचं आरोग्य ठीक आहे की नाही ते समोर येते.
  3. 2 डी इको – या चाचणीतून हृदयाचे कप्पे किती मोठे आहेत. हृदयाचे ठोके व्यवस्थित पडतात की नाही, हृदयातील चार झडपा योग्य प्रकारे काम करतात का याचे निरीक्षण करण्यात येते. हृदय विकाराचा झटका आल्यास, हृदयाचा कोणता भाग व्यवस्थित काम करत नाही याची माहिती मिळते.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.