डिप्रेशन, थकवा आणि सुस्ती येणे…. तुम्हालाही जाणवतात का ही लक्षणं ? असू शकतात या व्हिटॅमिनच्या कमतरतेचे संकेत, काय खाऊन करता येते भरपाई ?

Vitamin B-12: शरीरात व्हिटॅमिन बी-12 च्या कमतरतेमुळे तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. B-12 मेंदूच्या विकासातही महत्त्वाची भूमिका बजावते. हे जीवनसत्व आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे.

डिप्रेशन, थकवा आणि सुस्ती येणे.... तुम्हालाही जाणवतात का ही लक्षणं ? असू शकतात या व्हिटॅमिनच्या कमतरतेचे संकेत, काय खाऊन करता येते भरपाई ?
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Mar 14, 2023 | 12:39 PM

नवी दिल्ली : आपल्या शरीराचे विविध रोगांपासून संरक्षण करण्यासाठी व्हिटॅमिन बी12 (vitamin B12) आवश्यक आहे. शरीरात त्याची कमतरता असल्यास, शरीर आपल्याला त्याचे संकेत अनेक प्रकारे देऊ लागते. तुम्ही जर सहज थकत (tiredness) असाल किंवा थकवा आणि सुस्त वाटत असेल तर तुमच्यात व्हिटॅमिन बी12 ची कमतरता (deficiency) असू शकते. तुमच्या शरीरातील आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे तपासण्यासाठी नियमित रक्त तपासणी करून घेणे उत्तम ठरते. शरीरात व्हिटॅमिन बी-12 च्या कमतरतेमुळे तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

व्हिटॅमिन B12 मेंदूच्या विकासातही महत्त्वाची भूमिका बजावते. हे जीवनसत्व आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे. आपल्या शरीरातील B12 ची कमतरता असेल तर कोणती लक्षणे दिसतात तसेच कमतरता दूर करण्यासाठी कोणत्या गोष्टींचा आहारात समावेश केला पाहिजे ते समजून घेऊया.

शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असल्यास काय करावे ?

हे सुद्धा वाचा

शरीरात व्हिटॅमिन बी-12 ची कमतरता असल्यास अंडी, चिकन आणि मांस यांचा समावेश केला जाऊ शकतो. तुम्ही जर शाकाहारी असाल तर तुम्हाला B12 आवश्यकता पूर्ण करण्यात अडचण येऊ शकते. जर तुम्ही तुमची दैनंदिन व्हिटॅमिन बी 12 आवश्यकता आहाराद्वारे पूर्ण करू शकत नसाल, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. व्हिटॅमिन बी-12 समृध्द अन्न सेवन करून तुम्ही ही कमतरता भरून काढू शकता. शरीरातील लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी व्हिटॅमिन बी-12 खूप महत्वाचे आहे.

शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असल्यास कोणते पदार्थ खावे ?

पालक

आपल्या शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता भरून काढण्यासाठी पालक सारख्या हिरव्या भाज्या हा एक उत्तम शाकाहारी पर्याय आहे. आपण पालकाची भाजी, सूप, पराठे आणि स्मूदीसह सर्व प्रकारच्या पाककृती बनवू शकता.

दही

दह्यामध्ये प्रथिने आणि व्हिटॅमिन बी 12 भरपूर प्रमाणात असते. मात्र तुम्ही साखर न घालता दही खा किंवा घरी तयारे केलेले साधे दही सेवन करा. तुम्ही ते भाजलेल्या बटाट्यासोबत खाऊ शकता किंवा ताजेतवाने आणि पौष्टिक नाश्त्यासाठी एक कप दह्यात काही बेरीज टाकून खाऊ शकता.

बीटरूट

बीटामध्ये भरपूर प्रमाणात लोह, फायबर, पोटॅशिअम तसेच व्हिटॅमिन बी12 असते. बीटरूटचे नियमित सेवन केल्याने केसांची वाढ सुधारते, त्वचा निरोगी आणि चमकते आणि सहनशक्ती वाढते.

गाईचे दूध

गाईचे दूध हा प्रथिने, कॅल्शिअम, फॉस्फरस आणि पोटॅशिअम तसेच व्हिटॅमिन बी 12 यांचा चांगला स्रोत आहे. दररोज 2 कप दूध पिऊन तुम्ही तुमची व्हिटॅमिन बी 12ची रोजची गरज पूर्ण करू शकता. पनीरसारखे दुग्धजन्य पदार्थ देखील व्हिटॅमिन बी 12 चे चांगले स्त्रोत आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.