या धाडसी लेकीने बापाला दिले जीवदान, 17 वर्षांच्या मुलीने पित्यासाठी स्वत:च्या यकृताचा भाग केला दान

अल्पवयीन मुलगी आपल्या पित्याला वाचविण्यासाठी अवयवदान करण्यास तयार असूनही नियम आड येत होते. परंतू कोर्टाने नियमाला बगल देत निकाल तिच्या बाजूने दिला.

या धाडसी लेकीने बापाला दिले जीवदान, 17 वर्षांच्या मुलीने पित्यासाठी स्वत:च्या यकृताचा भाग केला दान
liverImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Feb 18, 2023 | 4:29 PM

कोच्ची : आपल्या पालकांच्या ऋृणातून उतराई होणे सोपे काम नाही, केरळच्या एका अवघ्या सतरा वर्षांच्या मूलीने असे काम केले आहे की लोक तिला आदर्श कन्या म्हणूनच ओळखत आहेत. ही मुलगी सर्वांसाठी रोल मॉडल ठरली आहे, लिव्हरच्या आजाराने त्रस्त असलेल्या आपल्या बापाला जगविण्यासाठी या अल्पवयीन मुलीने स्वत:च्या यकृताचा काही भाग दान केला आहे. मात्र तिचे वय सतरा असल्याने तिला या केरळ हायकोर्टात याचिका दाखल करून परवानगी घ्यावी लागली.

केरळ हायकोर्टाच्या परवानगीनंतर अवयव दान केले आहे. अशा प्रकारचे हे देशातील पहिलेच अवयव दान म्हटले जात आहे. कोच्चीच्या एका इसमाला यकृताचा आजार असल्याने त्यांच्यावर अवयव प्रत्यारोपणाची शस्रक्रिया करण्याची गरज होती. परंतू या प्रकरणात कायदेशीर अडचण आली. कारण या इसमाच्या लेकीने आपल्या यकृताचा काही भाग दान करण्याची तयारी दर्शविली. परंतू तिचे वय केवळ सतरा असल्याने अवयव दान करण्यात अडचण आली. त्यामुळे अधिसूचित मानवी अवयव आणि पेशी प्रत्यारोपण (टीएचओटी) नियम 2014 च्या कलम 18 नूसार वयात सूट देण्याची मागणी करण्यात आली.

केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातील देवानंदा हीच्या याचिकेला मंजूरी देत तिला परवानगी देण्यात आली. न्या. व्ही.जी. अरूण यांनी 20 डीसेंबर 2022 रोजी या प्रकरणी आदेश दिले. आम्हाला या मुलीच्या लढ्याला यश आल्याने अत्यानंद झाला आहे, तिच्या याबाबतच्या लढ्याला अखेर यश आले आहे. या अल्पवयीन मुलीच्या वडीलांना प्रतीश पीजी फॅटी लिव्हरच्या आजाराने गेली अनेक वर्षे त्रस्त आहेत.

देवानंदा हीच्या वडीलांना वाचविण्याचा एकमात्र पर्याय लिव्हर ट्रांसप्लांटच्या मदतीने क्षतिग्रस्त यकृताला बदलणे हाच होता. रूग्णाच्या नातलगांमध्ये केवळ त्यांच्या मुलीचेच यकृत त्यांच्याशी मॅच झाले होते. देवानंदा आपल्या वडीलांना वाचविण्यासाठी यकृताचा काही भाग दान करण्यास एका पावलावर तयार झाली होती. परंतू तिचे कमी वय हीच एकमात्र अडचण बनली होती.

अल्पवयीन मुलगी आपल्या पित्याला वाचविण्यासाठी अवयवदान करण्यास तयार असूनही नियम आड येत होते. परंतू कोर्टाने नियमाला बगल देत निकाल तिच्या बाजूने दिला. कोर्टाने अवयवदान सल्लागार समितीला आदेश दिला की जर अवयवदाता वैद्यकीय दृष्ट्या अवयवदानास सक्षम असेल तर त्याला सज्ञान समजून व्यवहार करावा असे स्पष्ट करीत ऑपरेशनला परवानगी दिली. राजागिरी रूग्णालयाच्या मल्टी – ऑर्गन ट्रांन्सप्लांट सर्व्हीसेसचे प्रमुख डॉ. रामचंद्रन नारायण यांच्या नेतृत्वाखाली ही शस्रक्रीया पार पडली. राजागिरी रूग्णालयाचे कार्यकारी संचालक आणि सीईओ फादर जॉनसन वाझापल्ली यानी देवानंदा ही एक रोल मॉडेल असल्याचे म्हटले आहे.

भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....