त्वचेचा हा त्रास ठरू शकतो ब्लड कॅन्सरचे लक्षण , अशी घ्या काळजी

ब्लड कॅन्सर झाल्यास त्या व्यक्तीला सहजपणे दुखापत होऊ शकते व रक्तस्त्राव होतो. त्वचेखालील रक्तपेशी या अशक्त होतात, ज्यामुळे दुखापत होण्याची शक्यता जास्त असते.

त्वचेचा हा त्रास ठरू शकतो ब्लड कॅन्सरचे लक्षण , अशी घ्या काळजी
Follow us
| Updated on: Dec 07, 2022 | 6:52 PM

नवी दिल्ली – जगभरात कॅन्सरचे रुग्ण दरवर्षी झपाट्याने वाढत आहेत. भारतातही कॅन्सरच्या (cancer) रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे.  एका अहवालानुसार भारतामध्ये 2020 सालापर्यंत कॅन्सरचे सुमारे 14 लाख रुग्ण होते. देशामध्ये सर्व्हायकल आणि प्रोस्टेट कॅन्सरच्या रुग्णांमध्ये 25 टक्के वाढ झाली आहे. त्याशिवाय ब्लड कॅन्सरच्या प्रकरणांमध्येही (रक्ताचा कर्करोग) वाढ (blood cancer) होत आहे. हा कॅन्सर लहान मुलांनाही होतो. ब्लड कॅन्सरला ल्यूकेमिया (leukemia) असेही म्हटले जाते.

ब्लड कॅन्सर झाल्यास बोन मॅरोमध्ये पांढऱ्या पेशी झपाट्याने तयार होऊ लागतात. त्यांच्यामधील संसर्गामुळे त्या निरोगी पेशी नष्ट करू लागतात. त्यामुळे शरीरातील प्लेटलेट्स कमी होऊ लागतात. मात्र या कॅन्सरची लक्षणे सहजासहजी लक्षात येत नाहीत आणि त्यामध्ये कोणताही ट्यूमरही विकसित होत नाही. मात्र त्वचेसंदर्भात उद्भवणाऱ्या काही समस्यांद्वारे ब्लड कॅन्सर झालाय का, हे कळू शकते.

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, ब्लड कॅन्सर झाला असल्यास सहजपणे दुखापत होऊ शकते व रक्तस्त्राव होतो. त्वचेखालील रक्तपेशी या अशक्त होतात, ज्यामुळे दुखापत होण्याची शक्यता जास्त असते. ब्लड कॅन्सरमध्ये प्लेटलेट्सदेखील कमी प्रमाणात तयार होतात. त्यामुळे दुखापत झाल्यास लगेच रक्त वाहू लागते आणि कधीकधी गरजेपेक्षा जास्त प्रमाणात रक्तस्त्राव होतो.

हे सुद्धा वाचा

त्वचेवर दिसतात ही लक्षणे

ब्लड कॅन्सर झाल्यास झपाट्याने वजन कमी होणे, ताप येऊन थंडी वाजणे, अशा इतर समस्यांच्या स्वरुपात लक्षणे दिसतात. मात्र अनेक प्रकरणांमध्ये ब्लड कॅन्सरची लक्षणे सहजासहजी कळत नाहीत. मात्र त्वचेच्या काही समस्यांद्वारे या आजाराबद्दल समजू शकते.

डॉक्टरांनी स्पष्ट केले की, ब्लड कॅन्सर झाल्यास त्वचेवर काही अशा जखमा होऊ शकतात, ज्यामधून रक्तस्त्राव होऊ शकतो. त्वचेवर जांभळ्या अथवा तपकिरी रंगाचे पुरळही दिसू लागते. हिरड्यांमधून रक्त येणे, त्वचेचा रंग बदलणे हेही ब्लड कॅन्सरची लक्षणे असू शकतात.

ल्यूकेमिया कॅटीस

ब्लड कॅन्सर झाल्यास शरीरात ल्यूकेमिया कॅटीसची लक्षणे दिसू लागतात. त्वचेखाली एक गाठ येते व जाडसर पॅचेस दिसू लागतात. त्वचेवर अशी लक्षणे दिसू लागल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधून चाचण्या करून घ्याव्यात.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.