14 महिने लघवीच झाली नाही, रोज 3 लीटर पाणी पिऊनही असं कसं घडलं?; महिला घरातून थेट रुग्णालयात
एका महिलेने गेल्या चौदा महिन्यांपासून शौचालयाचा वापर केला नाही. नंतर तिला अत्यंत गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यासोबत असं नेमकं काय घडलं?
लंडन : जगातील प्रत्येक व्यक्तीने दररोज किमान दोन लिटर पाणी (water) प्यावे, असा सल्ला दिला जातो. असं म्हणतात की पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. तसेच पाणी प्यायल्याने त्वचाही (skin) चमकू लागते. पण जास्त पाणी पिण्याचे तोटेही असू शकतात. तुम्हाला कधी हे लक्षात आले आहे का, की जेव्हा तुम्ही जास्त पाणी पितात तेव्हा तुमची बाथरूमची ट्रीप वाढते. हे खरं आहे, जेव्हा शरीराला पुरेशा प्रमाणात पाणी मिळते, तेव्हा शरीर टॉयलेटच्या स्वरूपात आतील सर्व विषारी (toxins) पदार्थ काढून टाकते. पण जर कोणी भरपूर पाणी प्यायले आणि तरी त्या व्यक्तीला टॉयलेटला जावंसं वाटत नसेल तर?
असाच काहीसा प्रकार लंडनमध्ये राहणाऱ्या 30 वर्षीय एले ॲडम्ससोबत घडला. एलीला चौदा महिने लघवीच करता आली नाही. एके दिवशी सकाळी उठल्यावर तिला लघवीला जावेसे वाटले मात्र तिला लघवीच करता आली नाही. इच्छा असूनही तिला शौचालय वापरता आले नाही. आणि हा त्रास ती 1-2 दिवस नव्हे तब्बल 14 महिने सहन करत होती. डॉक्टरांकडे जाऊन तिने कॅथेटर वापरायची पद्धतही शिकून घेतली. मात्र तरीही तिला बराच त्रास सहन करावा लागला. त्यानंतर 14 महिन्यांनी तिला अत्यंत गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्याला एक अत्यंत दुर्मिळ आजार असल्याचे आढळून आले. फॉलर सिंड्रोम असे या आजाराचे नाव असून त्यामुळे तिला स्वत:हून लघवीच करता येत नव्हती
एका रात्रीत बदलले जीवन
एलेने तिची कथा डेली स्टारवर शेअर केली. तिने सांगितले की ऑक्टोबर 2020 मध्ये एका सकाळी तिला अचानक जाग आली. रात्रीपर्यंत सर्व काही सामान्य होते. मात्र सकाळी ती टॉयलेटला गेल्यावर तिला काहीच झाले नाही. तिने कितीही प्रयत्न केले तरी तिला लघवीच करता येत नव्हती. तिने भरपूर पाणी प्यायले. तरीही बाथरूमला जाता येत नव्हते. यानंतर ती हॉस्पिटलमध्ये गेली, तिथे डॉक्टरांना तिच्या लघवीच्या पिशवीत एक लिटर लघवी साठल्याचे आढळले. यानंतर, तिला एका इमर्जन्सी कॅथेटर लावण्यात आले.
मदतीविना लघवी करता येत नव्हती
एलीने तिच्या परिस्थितीबद्दल सांगितले की, जे काम तिला पूर्वी सोपे वाटायचे ते आज अवघड झाले आहे. डॉक्टरांनी त्याला सेल्फ कॅथेटराइज करायला शिकवले आहे. ती उपकरणांशिवाय लघवी करू शकत नाही. या घटनेच्या आठ महिन्यांनंतर जेव्हा एली पुन्हा युरोलॉजी विभागात गेली तेव्हा तिला कळले की हा खरं तर फॉलर सिंड्रोम आहे. अनेक स्त्रियांच्या बाबतीत 20-30 वयाच्या दरम्यान ही समस्या उद्भवू शकते. त्यानंतर एलेवर अनेक चाचण्या केल्या गेल्या, ज्यामध्ये हे स्पष्ट झाले की आता तिच्या उर्वरित आयुष्यासाठी तिला कॅथेटरच्या मदतीने लघवी करावी लागेल. मात्र अलीकडेच तिच्यावर एक शस्त्रक्रिया तिची समस्या निम्म्याने कमी झाली आहे.