कोरोना लसनिर्मिती ते लसीकरण, जाणून घ्या 3 महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं
इंडियन मेडिकल एसोसिएशन चे माजी सचिव डॉ. नरेंद्र सैनी यांनी लसीसंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. (corona vaccine vaccination)
मुंबई : कोरोना विषाणूमुळे ज्या वेगाने जीवितहानी झाली, किंबहूना त्यापेक्षाही जास्त वेगाने कोराना थोपवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. जगभरात अनेक संशोधक कोरोनावर प्रभावी लस शोधण्यासाठी दिवस रात्र एक करत आहेत. तर ब्रिटन, अमेरिकासारख्या देशांमध्ये कोरोना प्रतिबंधक लस देण्यास सुरुवातही झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही लसीकरणाच्या कार्यक्रमासाठी योजना आखायला सुरुवात केलेली आहे.या पार्श्वभूमीवर कारोना लस, लसीकरण याविषयी माहिती असणे गरजेचे आहे. इंडियन मेडिकल एसोसिएशनचे माजी सचिव डॉ. नरेंद्र सैनी यांनी लसीसंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. (three answers of question of corona vaccine and vaccination)
लसीचे परीक्षण कसे होते?
जगभरात लसनिर्मितीचे काम सुरु आहे. लसीचे परीक्षण युद्धपातळीवर सुरु आहे. यावर बोलताना डॉ. नरेंद्र सैनी यांनी सांगितलं की, “माध्यम तसेच नागरिकांनी कोरोना लसीच्या परीक्षणाकडे लक्ष देऊ नये. कोणत्याही लसीचे परीक्षण करताना वेगवेगळे टप्पे असतात. तिसऱ्या टप्प्यातील परीक्षण करताना दोन स्वयंसेवकांची निवड करण्यात येते. यातील एकाला लस देण्यात येते. तर दुसऱ्याला लस दिली जात नाही. कोणत्या स्वयंसेवकाला कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आलेली आहे, हे खुद्द स्वयंसेवकांनादेखील माहीत नसते. ज्या स्वयंसेवकाला लस दिली जाते, त्याला वैज्ञानिक भाषेत प्लेसिबो म्हटले जाते. जी व्यक्ती कोरोना लसीवर अभ्यास करते आहे, फक्त त्याच व्यक्तीला या सर्व गोष्टींची माहिती असते. लस दिल्यांतर दोन्ही स्वयंसेवकांची तुलना केली जाते. त्यांच्या शरीरात होणाऱ्या बदलांचा अभ्यास केला जातो.” (three answers of question of corona vaccine and vaccination)
लस 100 टक्के प्रभावी म्हणजे नेमकं काय?
लसीच्या क्षमतेबद्दल बोलताना डॉ. सैनी म्हणाले, “सध्या अस्तित्वात असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसी 80 टक्के, 90 टक्के प्रभावी असल्याचे सागिंतले जात आहे. कोणतीही लस 100 टक्के प्रभावी नसते. लसीच्या प्रभावी असण्याच्या क्षमतेला ईफिकेसी (Efficacy) म्हटले जाते. एखादी लस 90 टक्के प्रभावी ठरली तरी 10 टक्के नागरिक असे असतील, ज्यांना कोरोना संसर्गाची भीती असेल.” (three answers of question of corona vaccine and vaccination)
खरंच कोरोना लस हानिकारक आहे?
“जगभरात कोरोना प्रतिबंधक लस निर्माण करण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले जात आहेत. मात्र, यावेळी लस दिल्यानंतर स्वयंसेवकांना साईड ईफेक्ट झाल्याच्या काही घटना झाल्या. मूळात पाहायचं झालं तर प्रत्येक लसीचे शरीरावर काहितरी साईड ईफेक्ट्स होत असतात. मात्र, कोरोना लसीने साईड ईफेक्ट्स झाल्यानंतर लसच खराब आहे, असं म्हणणं चुकीचं आहे. कुठलेही लसीकरण करण्यामागे प्रचंड अभ्यास आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असतो,” असे लसीच्या हानिकारकतेबद्दल बोलताना डॉ. जैनी म्हणाले.
संबंधित बातम्या :
कोरोनापासून मुक्तीसाठी केवळ लस एकमेव पर्याय आहे का?; वाचा तज्ज्ञांना काय वाटतं?
कोरोना’तून बरे झाल्यावर रुग्णांमध्ये हृदयासंबंधित समस्यांमध्ये वाढ, पाहा तज्ज्ञ काय म्हणतायत…
तुम्हाला अॅलर्जी आहे? तर मग कोरोना लसीवरची सर्वात मोठी बातमी तुमच्यासाठी!
(three answers of question of corona vaccine and vaccination)