Tips to prevent thyroid: थायरॉईडमुळे वाढतात मानसिक समस्या, शरीरावर होतो घातक परिणाम

शरीरातील अनेक क्रियांमध्ये थायरॉईड हार्मोनचे विशेष महत्त्व असते, पण त्याच्या कमतरतेमुळे रुग्णाला अनेक मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. थायरॉईडची समस्या टाळण्यासाठी अनेक घरगुती उपाय आहेत.

Tips to prevent thyroid: थायरॉईडमुळे वाढतात मानसिक समस्या, शरीरावर होतो घातक परिणाम
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Jan 18, 2023 | 9:52 AM

नवी दिल्ली – आपल्या शरीरात हार्मोन्सना (hormones) खूप महत्त्व आहे. त्यांचे प्रमाण खूपच कमी असते पण संपूर्ण शरीरावर नियंत्रण ठेवतात. शरीरातील नियंत्रण आणि समन्वयाचे काम हार्मोन्सचे असते. जर हार्मोन्स थोडे कमी झाले किंवा त्यांचे प्रमाण थोडेही वाढले तर अनेक आजार होऊ शकतात. थायरॉईड (thyroid) हार्मोन हेही त्यापैकीच एक आहे. आपल्या मानेजवळ एक फुलपाखराच्या आकाराची ग्रंथी किंवा ग्लँड (thyroid gland)असते, त्यामधून थायरॉईड हार्मोन्स बाहेर पडतात. थायरॉईड असंतुलित झाल्यास अनेक शारीरिक समस्यांसोबतच मानसिक समस्याही उद्भवू शकतात.

थायरॉईडच्या असंतुलनामुळे नैराश्य, चिंता, निद्रानाश अशा मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. तसचे थायरॉईड हे आपले वजन, हृदय आणि प्रजनन क्षमता देखील नियंत्रित करते, त्यामुळे त्यात अडथळा आल्यास यावर थेट परिणाम होतो. थायरॉईड हार्मोन वाढल्यास त्याला हायपरथायरॉईड म्हणतात, तर ते कमी झाल्यास त्याला हायपोथायरॉईडीझम असे म्हटले जाते. थायरॉईड कमी होणे किंवा वाढणे, या दोन्ही परिस्थिती अतिशय धोकादायक असून त्यामध्ये मानसिक समस्या उद्भवू शकतात.

हायपो थायरॉईची लक्षणे –

हे सुद्धा वाचा

शरीरात थायरॉईडचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा कमी झाले तर त्या व्यक्तीला सतत चिंता वाटत राहते. सतत चिडचिड होते, राग येतो. कोणत्याही कामात लक्ष केंद्रित करण्यात अडचण येते. रुग्ण नेहमी उदास आणि दुःखी राहतो. लोकांना भेटणे किंवा बोलणे यातही अडचण येते. रोजच्य कामांमध्ये मन लागत नाही. दिवसभर आळस येतो, तसेच थकवा येणे, थंडी वाजणे, काही प्रकरणांमध्ये वजन वाढणे, अशी लक्षणेही दिसून येतात. तसेच काही रुग्णांचा आवाज जड होतो, तर काहींना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. तसेच स्नायू अशक्त होणे, चेहरा सुजणे असाही त्रास होतो. महिलांना मासिक पाळीदरम्यान खूप त्रास होतो तसेच केसही पातळ होतात.

थायरॉईडपासून वाचण्यासाठी घरगुती उपाय

आयोडीनयुक्त मीठ- हेल्थलाइननुसार, थायरॉईड कमी असल्यास आयोडीनयुक्त मीठाचा वापर करू नये. याशिवाय सीफूड, दुग्धजन्य पदार्थ, अंडी, चिकन यासारखे पदार्थ खाणेही टाळावे.

बग्लीवीड वनस्पती- हृदय आणि फुफ्फुसाच्या समस्यांवर बग्लीवीड वनस्पतीने उपचार केले जातात. बग्लीवीड ही लॅव्हेंडरसारखीच एक वनस्पती आहे ज्याची फुले औषधी कामांसाठी वापरली जातात. याद्वारे थायरॉईड देखील नियंत्रित करता येते.

लेमन बाम – लेमन बाम हीदेखील एक वनस्पती आहे जी थायरॉईडवर उपचार करण्यासाठी वापरली जाते. ही पुदिन्यासारखीच असून सहज उपलब्ध होते.

लव्हेंडर ऑइल- थायरॉइडच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी लव्हेंडर ऑईलने मसाज करणे फायदेशीर ठरते. यासोबतच चंदनाचे इसेंशिअल ऑईलचा वापर केल्यानेही थायरॉईडमुळे उद्भवणाऱ्या मानसिक समस्यांपासूनही संरक्षण होऊ शकते.

व्यायाम- ज्याप्रमाणे इतर अनेक आजारांमध्ये व्यायामाचा खूप फायदा होतो, त्याचप्रमाणे थायरॉईडच्या समस्येवरही व्यायाम फायदेशीर ठरतो. थायरॉईडमधील मानसिक समस्या टाळण्यासाठी योगासने व इतर व्यायामसोबतच मेडिटेशन करणे देखील फायदेशीर ठरते.

(डिस्क्लेमर- संबंधित विकारांची प्राथमिक माहिती, लक्षणे, तसेच काय करता येईल, याची माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.