Health Tips: हिवाळ्यात चांगले आरोग्य राखण्यासाठी रात्री ‘या’ पदार्थांचे सेवन टाळा

सकाळी आणि दुपारी जसा समतोल आहार गरजेचा आहे, तसेच रात्रीचे जेवणही हेल्दी व समतोल असले पाहिजे. रात्रीच्या जेवणाचा आपल्या संपूर्ण आरोग्यावर प्रभाव पडू शकतो.

Health Tips: हिवाळ्यात चांगले आरोग्य राखण्यासाठी रात्री 'या' पदार्थांचे सेवन टाळा
Follow us
| Updated on: Dec 10, 2022 | 10:15 AM

नवी दिल्ली – थंडीच्या दिवसांत (winter season) आजारी पडण्याचा धोका सर्वाधिक असतो. अशावेळी हिवाळ्यात आपण आपल्या आरोग्याची अधिक काळजी घेत खाण्या-पिण्याकडेही विशेष लक्ष दिले पाहिजे. ज्याप्रमाणे सकाळी आणि दुपारी जसा समतोल आहार गरजेचा (healthy diet) आहे, तसेच रात्रीचे जेवणही हेल्दी व समतोल असले पाहिजे. रात्रीच्या जेवणाचा आपल्या संपूर्ण आरोग्यावर प्रभाव पडू शकतो. हिवाळ्यात चांगले आरोग्य राखायचे असेल तर रात्रीच्या वेळेस काही पदार्थांचे सेवन (avoid these foods in night) करणे टाळावे.

फळं

थंड वातावरणात रात्री आंबट फळे खाणे टाळावे. हिवाळ्यात आंबट आणि थंड प्रकृतीची फळे अजिबात खाऊ नका. रात्रीच्या वेळेस लिंबूवर्गीय फळे खाल्ल्याने ॲसिड रिफ्लेक्स होऊ शकतो, ज्यामुळे छातीत जळजळ होणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. तसेच रात्रीच्या वेळेस थंड प्रकृतीची फळे खाल्ल्याने तुम्ही आजारी पडू शकता.

हे सुद्धा वाचा

मसालेदार जेवण

हिवाळ्याच्या दिवसात मसालेदार अन्न कमी खावे, विशेषतः रात्रीच्या वेळेस त्याचे कमी सेवन करावे. रात्री मसालेदार अन्न खाल्ल्याने पोट खराब होऊन तब्येतीवर परिणाम होऊ शकतो.

कच्च्या भाज्या

हिवाळ्यात रात्रीच्या वेळेस टोमॅटो, गाजर, मुळा, कांदा अशा कच्च्या भाज्या खाणे योग्य नाही. कच्च्या भाज्यांमुळे पोटात गॅस तयार होतो. रात्रीच्या वेळेस आपला पचनक्रिया आणि मेटाबॉलिज्म (चयापचय) यांचे कार्य मंद गतीने होते, त्यामुळे रात्रीच्या वेळी पचण्यास जड अशा कच्च्या पदार्थांचे सेवन करणे टाळावे.

तळलेले अन्न

रात्रीच्या वेळेस तळलेले अन्नपदार्थ खाऊ नयेत. रात्री पचनक्रिया मंद होते, त्यामुळे पचण्यस जड असे तेलकच अथवा तळलेले पदार्थांचे गोष्टींचे सेवन केल्याने पोटाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच आपले वजनही वाढू शकते.

कॅफेनयुक्त पदार्थ

थंडी असो किंवा उन्हाळा रात्रीच्या वेळेस कॅफेनयुक्त पदार्थ अथवा पेयांचे सेवन करू नये. कॅफेनयुक्त पदार्थ खाल्यामुळे किंवा प्यायल्यामुळे झोपेशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच या पदार्थांमध्ये अतिरिक्त प्रमाणात साखर असते ज्यामुळे शरीराचे वजन वाढू शकते.

(डिस्क्लेमर- संबंधित विकारांची प्राथमिक माहिती, लक्षणे, तसेच काय करता येईल, याची माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.