Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या गोष्टी दूर ठेवाल तर युरिक ॲसिड राहील नियंत्रणात

युरिक ॲसिड नियंत्रणात ठेवायचे असेल तर खाण्या-पिण्याची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. काही पदार्थ असे असतात, जे खाल्याने युरिक ॲसिड वाढू शकते.

या गोष्टी दूर ठेवाल तर युरिक ॲसिड राहील नियंत्रणात
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Dec 29, 2022 | 6:14 PM

नवी दिल्ली – युरिक ॲसिड (Uric Acid) हा आपल्या लिव्हर (यकृत) मध्ये बनणारा एक टाकाऊ (waste) पदार्थांपैकी असते जे लघवीद्वारे शरीराबाहेर टाकले जाते. महिलांमध्ये युरिक ॲसिडचा सामान्य स्तर 3.5 ते 6 mg/dL इतका असतो. तर पुरुषांमध्ये युरिक ॲसिडची नॉर्मल लेव्हल 4 ते 6.5 mg/dL यइतकी मानली जाते. जेव्हा युरिक ॲसिडची पातळी सामान्य स्तरापेक्षा वाढते, तेव्हा ते शरीराच्या वेगवेगळ्या भागात जमा होते. त्यामुळे सांध्यामध्येही वेदना होतात. यामुळे गाऊटची (Gout) समस्या निर्माण होऊ शकते. वाढत्या युरिक ॲसिडकडे बराच काळ दुर्लक्ष केल्यास किडनी (kidney problem) खराब होऊ शकते.

कोणते पदार्थ आणि पेय टाळून तुम्ही युरिक ॲसिडवर नियंत्रण ठेऊ शकता ते जाणून घेऊया.

प्युरीनयुक्त पदार्थांचे सेवन करू नका

हे सुद्धा वाचा

एका रिपोर्टनुसार, युरिक ॲसिड नियंत्रित करण्यासाठी प्युरीनयुक्त पदार्थ कमीत कमी प्रमाणात सेवन करावेत. प्युरीनयुक्त पदार्थ शरीरात युरिक ॲसिडचे उत्पादन वाढवतात, ज्यामुळे संधिवात होण्याचा धोका असतो. मांसाहारी पदार्थ तसेच दुग्धजन्य पदार्थांमध्ये प्युरीनचे प्रमाण जास्त असते. रेड मीटमध्येही ते असते. अशा परिस्थितीत हे पदार्थ खाणं टाळावे.

मद्यपान आणि साखरयुक्त पेये टाळा

मद्यपान आणि साखरयुक्त पेयांचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने गाउटचा धोका वाढतो. या पेयांमध्ये कॅलरीज आणि स्वीटनर्स जास्त असतात, ज्यामुळे वजन वाढू शकते आणि मेटाबॉलिज्मची समस्या उद्भवू शकते. यामुळे युरिक ॲसिडची पातळी वाढते. युरिक ॲसिडची समस्या टाळण्यासाठी मद्यपान करणे तसेच कोल्ड्रिंक्स, सोडा, ज्यूस, एनर्जी आणि स्पोर्ट्स ड्रिंक्स पिणे टाळावे.

काही औषधांनीही वाढू शकते युरिक ॲसिड

– काही औषधे घेतल्यानेही शरीरातील युरिक ॲसिडचे प्रमाण वाढू शकते. जी औषधे रोगप्रतिकारक शक्ती दाबतात, ती औषधे घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. बहुतेक लोक डोकेदुखीच्या वेळी ॲस्पिरिन घेतात, परंतु प्रत्येक वेळी असे करू नये. ॲस्पिरिनच्या उच्च डोसमुळे युरिक ॲसिड वाढू शकते.

या पदार्थांचे सेवन फायदेशीर

हाय युरिक ॲसिड कमी करण्यासाठी भरपूर भाज्या व फळांचे सेवन केले पाहिजे. त्यामध्ये प्युरिनचे प्रमाण कमी असते, ज्यामुळे शरीराला आवश्यक ती पोषक तत्वं मिळतात. पूर्ण धान्य, ब्रेड आणि बटाटा यांचे सेवन केल्याने गाऊटच्या समस्येपासून बचाव होऊ शकतो. तसेच युरिक ॲसिड शरीरातून बाहेर टाकण्यासाठी भरपूर पाणी प्यावे.

(डिस्क्लेमर- संबंधित विकारांची प्राथमिक माहिती, लक्षणे, तसेच काय करता येईल, याची माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

'ससून'च्या अहवालातील निष्कर्ष काय? 'दीनानाथ'वर कारवाई होणार?
'ससून'च्या अहवालातील निष्कर्ष काय? 'दीनानाथ'वर कारवाई होणार?.
'लबाडांनो पाणी द्या', संभाजीनगरात पाणी प्रश्नावर ठाकरे गट आक्रमक
'लबाडांनो पाणी द्या', संभाजीनगरात पाणी प्रश्नावर ठाकरे गट आक्रमक.
2-3 टकले सोडले तर हे सरकार.., राणेंचा रोख दादांकडे? नेमकं काय म्हणाले?
2-3 टकले सोडले तर हे सरकार.., राणेंचा रोख दादांकडे? नेमकं काय म्हणाले?.
फूल टाईम पोलीस, पार्ट टाईम चोर;पोलीस उपनिरीक्षकानेच बनवली चोरांची टोळी
फूल टाईम पोलीस, पार्ट टाईम चोर;पोलीस उपनिरीक्षकानेच बनवली चोरांची टोळी.
हातात हात अन् एवढ्या गर्दीत फक्त फडणवीस..शाहांच्या 'त्या' कृतीची चर्चा
हातात हात अन् एवढ्या गर्दीत फक्त फडणवीस..शाहांच्या 'त्या' कृतीची चर्चा.
संभाजीनगर पोलीस महानिरीक्षकांची मोठी कारवाई; निलंबित कासले बडतर्फ
संभाजीनगर पोलीस महानिरीक्षकांची मोठी कारवाई; निलंबित कासले बडतर्फ.
'माझ्या नातवाला शेतीची आवड आहे..', एकनाथ शिंदे नातवासोबत शेतात रमले
'माझ्या नातवाला शेतीची आवड आहे..', एकनाथ शिंदे नातवासोबत शेतात रमले.
दत्ता गाडेची गुगल हिस्ट्री चेक अन वारंवार पॉर्न...धक्कादायक माहिती उघड
दत्ता गाडेची गुगल हिस्ट्री चेक अन वारंवार पॉर्न...धक्कादायक माहिती उघड.
मराठी माणसांच्या अस्तित्वावर वरवंटा फिरवून.., राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
मराठी माणसांच्या अस्तित्वावर वरवंटा फिरवून.., राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
'हिंदी'विरोधात दादरमध्ये जागोजागी तुफान बॅनरबाजी, 'हिंदू आहोत पण...'
'हिंदी'विरोधात दादरमध्ये जागोजागी तुफान बॅनरबाजी, 'हिंदू आहोत पण...'.