तुरटी आणि मीठ एकत्र वापरा, ‘या’ समस्या होतील दूर
तुरटी आणि मीठामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. जे शरीरातील अनेक समस्या दूर करण्यास उपयुक्त ठरतात. अशावेळी तुरटी आणि मीठ वापरून तुम्ही कोणत्या समस्यांपासून मुक्त होऊ शकता हे जाणून घेऊया.
तुरटी आणि मीठ एकत्र मिसळल्यास अनेक समस्या दूर होतात. या दोन्ही गोष्टींमध्ये शरीरातील अनेक प्रकारच्या समस्या दूर करणारे गुणधर्म आहेत. तुरटीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, तर मीठात बॅक्टेरिया आणि अँटी-फंगल गुणधर्म देखील असतात. हिवाळ्यात घरगुती उपचारांसाठी मीठ आणि तुरटी बहुतेक लोकं वापरतात. कारण तुरटी आणि मीठ हिवाळ्यात शरीरातील अनेक समस्या दूर करू शकते. तोंडातून येणाऱ्या दुर्गंधीपासून ते दातांच्या हिरड्यांपर्यंत सर्व काही बरे होऊ शकते. तर या लेखात मीठ आणि तुरटी कशासाठी वापरली जाते हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.चला जाणून घेऊयात
दात आणि हिरड्यांची समस्या
तुरटी आणि मीठ हे दात व हिरड्यांसाठी खूप फायदेशीर आहे. याचा वापर करून हिरड्यांची सूज, वेदना आणि तोंडाचे व्रण बरे करता येते. यामुळे घसा खवखवण्यापासूनही आराम मिळतो. तुरटी पाण्यात विरघळवून त्यात चिमूटभर मीठ घालावे आणि मग त्याबरोबर चुळ भरावी. अश्याने घशाच्या समस्यांपासून आराम मिळतो.
जखम आणि रक्तस्त्राव
जर तुम्हाला दुखापत झाली असेल आणि खूप रक्तस्त्राव होत असेल तर तुम्ही तुरटी वापरू शकता. जखमेवर हलकी तुरटीची पावडर लावल्यास रक्तस्त्राव लवकर थांबतो आणि संसर्ग होत नाही.
पायांच्या टाचांना भेगा पडणे
हिवाळ्यात काही लोकांच्या पायांच्या टाचांना भेगा पडतात. अशा वेळी ते बरे करण्यासाठी तुरटी अतिशय उपयुक्त ठरते. गरम पाण्यात तुरटी आणि मीठ मिसळावे आणि नंतर त्यात आपले पाय काही वेळ ठेवावे. यामुळे भेगा पडलेल्या टाचा मऊ होतात आणि संसर्ग टाळण्यास देखील मदत होते.
पिंपल्स आणि मुरुम
तुरटी आणि मीठ हे पिंपल्स व मुरुम कमी करण्यास देखील मदत करते. यामुळे पिंपल्सचे बॅक्टेरिया दूर होतात आणि त्वचा स्वच्छ होते. यासाठी तुरटी आणि मीठाची पेस्ट तयार करून पिंपल्स आणि मुरुमांच्या भागावर लावा आणि १०-१५ मिनिटांनी धुवून टाका. याने काही दिवसात तुमच्या चेहऱ्यावरील मुरमांची समस्या दूर होईल.
घामाचा दुर्गंध काढून टाकते
जर तुम्हला सतत घाम येत असेल आणि त्यामुळे दुर्गंधी येत असेल तर तुरटी आणि मीठ वापरावे. यासाठी तुम्हाला फक्त आंघोळीपूर्वी पाण्यात तुरटी आणि मीठ मिसळावे लागेल आणि नंतर त्या पाण्याने आंघोळ करा. असे केल्याने तुम्हाला सतत घाम येणार नाही आणि दुर्गंधी दूर होईल. तसेच त्वचा बॅक्टेरियामुक्त राहील.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)