Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हाळ्यातही टाचांना भेगा पडतात, ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा आराम

उन्हाळ्यात त्वचेसह संपूर्ण शरीराची काळजी घेणे महत्त्वाचे असते. अशातच हिवाळ्यात टाचांना भेगा पडणे ही एक सामान्य समस्या आहे, परंतु जर उन्हाळ्यातही तुमच्या टाचांना भेगा पडत असतील तर तुम्ही काही घरगुती उपाय करून पहावेत.

उन्हाळ्यातही टाचांना भेगा पडतात, 'या' घरगुती उपायांनी मिळवा आराम
Follow us
| Updated on: Mar 26, 2025 | 7:54 PM

उन्हाळा येताच आपण आपल्या त्वचेची विशेष काळजी घेत असतो. या ऋतूत, बहुतेक लोकं त्यांच्या चेहऱ्याची आणि हातांची काळजी घेण्याकडे लक्ष देतात, परंतु अनेकदा पायांची काळजीकडे दुर्लक्ष होते. परिणामी पायांच्या टाचांना भेगा पडतात. हिवाळ्यात कोरड्या त्वचेमुळे टाचांना भेगा पडणे सामान्य आहे. पण जर उन्हाळ्यातही तुमच्या टाचांना भेगा पडत असतील तर ते चिंतेचा विषय असू शकते. उन्हाळ्यात टाचांना भेगा पडण्यामागे अनेक कारणे असू शकतात. जसे की पायांच्या त्वचेचा जास्त कोरडेपणा, पाण्याची कमतरता, धूळ, जास्त घाम येणे आणि चुकीचे पादत्राणे घालणे.

जर उन्हाळ्यात तुमच्या पायांच्या टाचांना भेगा पडत असतील आणि वेदना होत असतील तर घाबरून जाण्याची गरज नाही. या लेखात, आम्ही तुम्हाला काही सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्यांच्या मदतीने तुमच्या भेगा पडलेल्या टाचा लवकर बऱ्या होतील आणि पुन्हा मऊ आणि गुळगुळीत होतील.

उन्हाळ्यात टाचांना भेगा पडण्याची कारणे

हे सुद्धा वाचा

टाचांना भेगा पडू नयेत म्हणून, प्रथम त्यांची कारणे समजून घेणे महत्त्वाचे आहे. उन्हाळ्यात टाचांना भेगा पडण्याची ही मुख्य कारणे असू शकतात. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे त्वचा कोरडी आणि निर्जीव होते, ज्यामुळे टाचांना तडे जाऊ लागतात. याशिवाय, जास्त वेळ अनवाणी चालल्याने त्वचा कडक आणि कोरडी होते, ज्यामुळे पायांच्या टाचांना भेगा पडतात. घट्ट, सिंथेटिक किंवा निकृष्ट दर्जाचे पादत्राणे घातल्याने टाचांना लवकर तडे जाऊ शकतात. शरीरात व्हिटॅमिन ई, ए आणि ओमेगा-3 फॅटी अॅसिडची कमतरता देखील टाचांना भेगा पडू शकते.

हे घरगुती उपाय करून पहा

रात्री झोपण्यापुर्वी नारळाच्या तेलाचा वापर करा

नारळच्या तेलात अँटी-बॅक्टेरियल आणि मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात, ज्यामुळे भेगा पडलेल्या पायांच्या टाचा लवकर बऱ्या होतात. म्हणून रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्याने पाय धुवा. त्यानंतर टाचांना नारळाचे तेल लावा आणि मसाज करा. नंतर कॉटनचे मोजे घाला आणि रात्रभर तसेच राहू द्या. दररोज असे केल्याने काही दिवसांत तुमच्या टाचा मऊ होतील.

मध आणि कोमट पाण्याचा वापर

मध हे एक नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे, जे त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवते त्याशिवाय पायांच्या काळजीसाठी भेगा पडलेल्या टाचांना बरे करते. यासाठी एका टबमध्ये कोमट पाणी घ्या आणि त्यात 2-3 चमचे मध मिसळा. त्यात तुमचे पाय 15-20 मिनिटे त्यात ठेवा. हलक्या हातांनी स्क्रब करा, पाय पुसून घ्या आणि थोडी क्रीम लावा. आठवड्यातून 3 वेळा हा उपाय केल्याने टाचा लवकर बऱ्या होतात.

कोरफड आणि ग्लिसरीन लावा

कोरफडीमध्ये दाहक-विरोधी आणि उपचार करणारे गुणधर्म असतात, जे त्वचेला मऊ करतात. अशा परिस्थितीत तुमच्या भेगा पडलेल्या टाचांना बरे करण्यासाठी, 2 चमचे एलोवेरा जेलमध्ये 1 चमचा ग्लिसरीन मिसळा. रात्री टाचांवर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. रात्रभर तसेच राहू द्या आणि सकाळी धुवा. कोरफड टाचांना आतून पोषण देते आणि त्यांना जलद बरे करते.

केळीचा पॅक बनवा

पिकलेले केळं हे एक उत्कृष्ट नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे, जे भेगा पडलेल्या टाचांना लवकर बरे करते. 1 पिकलेले केळ मॅश करा आणि त्यात थोडे नारळाचे तेल मिक्स करा. त्यानंतर ते टाचांवर लावा आणि 20 मिनिटे तसेच राहू द्या. कोमट पाण्याने पाय धुवा. आठवड्यातून 2-3 वेळा हा उपाय केल्याने तुमच्या टाचा लवकर बऱ्या होतील.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश.
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट.