Bad Breath Remedies: तुमच्याही तोंडातून येतो दुर्गंध ? या उपायांनी घालवा तोंडाला येणारा वास
तोंडाला येणारा दुर्गंध ही अशी एक समस्या आहे जी बहुतेक लोकांना त्रास देते. दुर्गंधामुळे केवळ लाजिरवाणे वाटत नाही तर तुमचा आत्मविश्वासही कमी होतो. जर तुम्हीही या समस्येने त्रस्त असाल तर तुम्ही हे घरगुती उपाय करून पाहू शकता.
नवी दिल्ली – तोंडाला वास किंवा दुर्गंध येणे (bad breath) ही एक सामान्य समस्या असून अनेक लोकं त्यामुळे त्रस्त असतात. ही समस्या केवळ लाजिरवाणीच नव्हे तर अनेक वेळा यामुळे लोक तुमच्यापासून दूर पळतात. अनेक वेळा असंही घडतं की तुमच्या तोंडातून येणार्या दुर्गंधाबद्दल (bad smell from mouth) तुम्हालाच माहीत नसतं, पण लोक तुमच्यापासून दूर जातात. ही अतिशय लाजीरवाणी परिस्थिती असते. तमच्याही तोंडातून वास किंवा दुर्गंध येत असेल तर काही घरगुती उपायांच्या मदतीने (home remedies) तुम्ही या समस्येपासून मुक्त होऊ शकता.
बेकिंग पावडर
जर तुम्ही श्वासाच्या दुर्गंधाच्या समस्येने त्रस्त असाल तर बेकिंग पावडर तुमच्यासाठी खूप प्रभावी ठरु शकेल. श्वासाच्या दुर्गंधापासून सुटका मिळवण्यासाठी एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा बेकिंग पावडर मिसळा आणि या पाण्याने तोंड धुवा. दिवसातून एकदा असे केल्याने तोंडातून येणार दुर्गंध दूर होईल.
तुरटी
तोंडाचा दुर्गंध दूर करण्यासाठी तुम्ही तुरटीचाही वापर करू शकता. एका ग्लास पाण्यात तुरटी टाका आणि ती चांगली विरघळू द्या. आता साधारण 15 ते 20 मिनिटांनी तुरटी पाण्यातून बाहेर काढा. हे पाणी एका बाटलीत भरून ठेवा आणि नंतर रोज सकाळी आणि रात्री ब्रश केल्यानंतर या पाण्याने तोंड स्वच्छ धुवा. त्यावेळी तुरटीचे पाणी 2 ते 3 मिनिटे तोंडात भरून ठेवा. या उपायामुळे तुम्ही श्वासाला येणारा दुर्गंध बर्याच प्रमाणात कमी करू शकता.
बडीशेप
माउथ फ्रेशनर म्हणून वापरण्यात येणारी बडीशेप श्वासाला येणारा दुर्गंध दूर करण्यासाठीदेखील खूप प्रभावी आहे. यामध्ये असलेले अँटीबॅक्टेरिअल घटक तोंडातील बॅक्टेरिआ नष्ट करण्यास मदत करतात. यामुळे श्वासाला येणारा दुर्गंध वाढवणाऱ्या बॅक्टेरिआपासून आराम मिळतो आणि तोंडाला वासही येत नाही.
दालचिनी
जर तुम्ही तोंडाला अथवा श्वासाला येणाऱ्या दुर्गंधाच्या समस्येने त्रस्त असाल तर तुम्ही यासाठी दालचिनीचा चहा पिऊ शकता. रोज सकाळी ब्रश केल्यानंतर दालचिनीचा चहा प्यायल्याने श्वासाचा दुर्गंध दूर होईल. यामध्ये असलेले सिनामिक ॲल्डिहाइड नावाचे घटक दुर्गंध वाढवणारे बॅक्टेरिआ नष्ट करण्यात मदत करतात. हवं असल्यास तुम्ही दालचिनीच्या पाण्याने गुळण्यादेखील करू शकता.
डाळिंबाचे साल
जर तुम्हाला श्वासाला येणाऱ्या दुर्गंधापासून सुटका हवी असेल तर तुम्ही यासाठी डाळिंबाच्या सालीचाही वापर करू शकता. यासाठी डाळिंबाची साले पाण्यात उकळून त्या पाण्याने चूळ भरावी किंवा गुळण्या कराव्यात. असे नियमितपणे केल्याने श्वासाला येणाऱ्या दुर्गंधाची समस्या दूर होईल.