Health Tips: जंक फूडची सवय सोडवायची आहे ? फॉलो करा या सोप्या टिप्स
जर तुम्हाला जंक फूड खायची सवय असेल तर कॉफी प्यावी, त्यामुळे जंक फूड खाण्याच्या सवयीपासून सुटका होईल. कॉफीमधील कॅफेनमुळे भूक कमी लागते. ज्यामुळे सतत खाण्याची सवयही कमी होते.
नवी दिल्ली – आजकाल बहुतांश लोकांना जंक फूड (junk food) खायला आवडतं. मात्र याच जंक फूडमुळे लठठ्पणा (obesity) , हृदयरोग (heart problem) आणि यासारख्या आरोग्याच्या इतर समस्या उद्भवतात. त्यमुळे डॉक्टरही चांगल्या आरोग्यासाठी जंक फूडपासून लांब रहायचा सल्ला देतात. जंक फूडमुळे शरीरातील फॅट्स आणि कोलेस्ट्रॉल (cholesterol) वेगाने वाढू लागते. कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे हृदयरोगाचा धोका संभवतो. सोप्या शब्दांत सांगायचं तर जंक फूड हे शरीरातील टॉक्सिनप्रमाणे असते. त्यावर वेळीच अंकुश लावणे महत्वाचे ठरते.
हे सोपं नसलं तरी फारसं कठीणही नसतं. आजकाल बरेचसे लोक जंक फूडवरच जगतात, अनेक लोकांना रोज बाहेरचे पदार्थ खायलाच आवडतात. जर तुम्हालाही जंक फूड खायची सवय असेल आणि ती सोडवायची इच्छा असेल तर या सोप्या पण फायदेशीर टिप्सचा अवलंब करा.
घरीच बनवा पदार्थ
जर तुम्हालाही जंक फूड खायची सवय असेल तर ते सोडवण्यासाठी तुम्ही घरीच स्वयंपाक करायला सुरूवात करा. तुम्ही तुमच्या आवडीचे पदार्थ घरीच तयार करू शकता. ऑनलाइन व्हिडीओजच्या मदतीने तुम्ही विविध पदार्थ घरीच बनवू शकता.
कॉफी प्या
जर तुम्हाला जंक फूड खायची सवय असेल तर कॉफी प्यावी, त्यामुळे जंक फूड खाण्याच्या सवयीपासून सुटका होईल. कॉफीमध्ये कॅफेन मुबलक प्रमाणात असते, ज्यामुळे भूक कमी लागते. आणि सतत खाण्याची सवयही कमी होते. त्यामुळेच काहीही खायची इच्छाच झाली नाही तर जंक फूड खाण्याची सवयही सुटेल.
पनीरचे सेवन करा
पनीरमध्ये प्रोटीन हे मुबलक प्रमाणात असते. त्याचे नियमित सेवन केल्यास शरीरात प्रोटीनची कमतरता निर्माण होत नाही तसेच भूकही कमी लागते. तसेच पनीरमध्ये कॅल्शिअम भरपूर असते. आपल्या आरोग्यासाठी पनीर हे खूप फायदेशीर ठरते.
भरपूर पाणी प्या
दररोज पुरेशा प्रमाणात पाणी पिणे आपल्या चांगल्या आरोग्यासाठी अत्यावश्यक ठरते. त्यामुळे दिवसभरात किमान 3 लिटर पाणी पिणे गरजेचे ठरते. त्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते व शरीर हायड्रेटेड राहते. पुरेसे पाणी प्यायल्यामुळे अपचनाच्या समस्येपासूनही आराम मिळतो.
( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)