प्रेग्नन्सीमध्ये गॅसेसचा त्रास कमी करायचा असेल तर फॉलो करा या टिप्स, मिळेल आराम
गरोदरपणात बऱ्याच महिलांना पोटात गॅसेस तयार होण्याचा त्रास सहन करावा लागतो. त्यापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायांचा अवलंब करू शकता.
नवी दिल्ली | 31 जुलै 2023 : गरोदरपणात प्रत्येक महिलेला मूड स्विंग्स पासून ते गॅसेसपर्यंत (gases) अनेक छोट्या-मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतो. प्रेग्नन्सीमध्ये काही महिलांना गॅसेसची समस्या जास्त (problems) त्रास देते. हे होणं स्वाभाविक असलं तरी ते वारंवार झाल्यास त्रास वाढतो. मात्र गरोदर महिला काही घरगुती उपाय करून या त्रासापासून सुटका किंवा आराम मिळवू शकतात. ते उपाय कोणते हे जाणून घेऊया,
गरोदरपणात गॅसचा त्रास जास्त का होतो ?
गरोदरपणात महिलांना जास्त गॅस का होतो ? हा प्रश्न बऱ्याच लोकांना पडतो. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार प्रेग्नन्सीमध्ये महिलांच्या शरीरात बरेचसे हार्मोनल बददल होत असतात. या बदलांचा स्त्रियांच्या शरीरातील पाचन ग्रंथीवर नेहमीपेक्षा जास्त परिणाम होतो. त्यामुळे शरीरात जास्त गॅस तयार होतो.
घरगुती उपाय कोणते ?
- द्रव पदार्थ किंवा पाण्याचे प्रमाण वाढवा. गरोदरपणात शरीरात पुरेशा प्रमाणात पाणी असेल तर अन्न नीट पचतं, त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने जास्तीत जास्त पाणी प्यायलं पाहिजे.
- गरोदर महिलेला पोट फुगण्याची किंवा गॅसेसची समस्या जाणवत असेल तर चालले पाहिजे किंवा हलका व्यायाम केला पाहिजे. शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहिल्याने आपली पचनसंस्था निरोगी राहते.
- गरोदर पणात फायबर युक्त पदार्थांचा समावेश असेल अशा डाएटचे पालन करावे. मात्र जास्त फायबर हे बद्धकोष्ठतेचे कारण ठरू शकते. डॉक्टरांच्या सल्ल्याने आहाराचे प्लानिंग करून तसे पालन करावे.
- काही वेळेस तणावामुळेही शरीरात गॅस होऊ शकतो. गरोदरपणात मूड स्विंग व्यतिरिक्त, तणाव देखील असतो. अशआ वेळेस गर्भवती महिलांनी तणाव कमी करण्यासाठी श्वासोच्छवासाचे व्यायाम करावेत. यामुळे केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिकदृष्ट्याही निरोगी राहण्यास मदत होते.
- अनेक अहवाल समोर आले आहेत ज्यानुसार तणावामुळेही शरीरात गॅस होऊ शकतो. गरोदरपणात मूड स्विंग व्यतिरिक्त, तणाव देखील असतो. गर्भवती महिला तणाव कमी करण्यासाठी श्वासोच्छवासाचे व्यायाम करू शकतात. हा व्यायाम केल्याने केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिकदृष्ट्याही निरोगी राहण्यास मदत होते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)