Gum Bleeding Remedies:तुमच्याही हिरड्यांमधून रक्त येते का ? ‘या’ घरगुती उपायांनी मिळू शकेल आराम
हिरड्यांमधून रक्तस्त्राव होण्याची समस्या सामान्य समजू नका कारण यामुळे दात आणि तोंडाचेही नुकसान होऊ शकते. काही घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही या समस्येपासून आराम मिळवू शकता,
नवी दिल्ली – पांढरे, चमकदार दात (healthy teeth) हे केवळ तोंडाच्या चांगल्या आरोग्याचेच (health) लक्षण नव्हे तर त्यामुळे आपले सौंदर्यही वाढते. त्यामुळे दातांच्या आरोग्याकडेही (teeth health) लक्ष देणे खूप गरजेचे आहे. हिरड्यांमधून रक्तस्त्राव होण्याची समस्या काही लोक अगदी सामान्य मानतात, पण तसे नाही. ही छोटीशी समस्या दात आणि तोंडाशी संबंधित इतर अनेक समस्यांचे कारण बनू शकते. जर समस्या ही खूप वाढली असेल तर डॉक्टरांना दाखवावे. तसेच काही घरगुती उपायांनीही या समस्येवर मात करू शकता.
1) नारळाचे तेल
हिरड्यांमधून रक्त येणे, दातांमध्ये तीव्र वेदना आणि श्वासाची दुर्गंधी या सर्वांवर खोबरेल तेलाने उपचार करता येतात. खोबरेल तेलामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात जे तोंडाशी संबंधित सर्व समस्या दूर करतात. 10-15 मिनिटे खोबरेल तेल तोंडात ठेवावे. आराम मिळतो.
2) हळद
हिरड्यांमधून रक्त येण्याची समस्या दूर करण्यासाठी हळद हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे. 1/2 चमचे मोहरीच्या तेलात 1/2 चमचा हळद आणि मीठ मिसळा, नंतर बोटांच्या मदतीने हिरड्यांना हलके मसाज करा. हळदीतील कर्क्यूमिन तत्व जळजळ आणि बॅक्टेरियाची समस्या दूर करते. तसेच हळदीची पेस्ट हिरड्यांवर चोळून 10 मिनिटे ठेवावी, व पाण्याने स्वच्छ धुवावे. हा देखील एक आरामदायी उपाय आहे.
3) लवंग तेल
तोंडी आरोग्य चांगले राखण्यासाठी लवंग तेल ही सर्वात प्रभावी कृती आहे. यात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ, अँटी-इन्फ्लेमेटरी आणि वेदना कमी करणारे घटक असतात. तो तोंडाशी संबंधित अनेक समस्यांवर प्रभावी उपाय आहे. लवंगाचे तेल कापसात भिजवून दुखणाऱ्या जागी ठेवा. भरपूर आराम मिळेल.
4) मीठाचे पाणी
या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी मीठाचे पाणी हा सर्वात सोपा उपाय आहे. यामुळे हिरड्यांमधून रक्त येणे, श्वासाची दुर्गंधी येणे या समस्यांपासूनही सुटका मिळते. यासाठी कोमट पाण्यात थोडेसे मीठ मिसळून त्या पाण्याने तोंड स्वच्छ धुवावे. ही क्रिया दिवसातून दोनदा करावी.
5) तुरटी
हिरड्यांमधून रक्त येण्याची समस्या दूर करण्यासाठी तुरटी हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे. यासाठी तुरटी पाण्यात टाकून नंतर त्याच पाण्याने तोंड धुवावे. यामुळे तोंडाचे आरोग्यही चांगले राहते.
6) कोरफड
कोरफडीचे जेल हिरड्या आणि दातांवर लावा. यामुळे रक्तस्रावाची समस्या तर दूर होईलच, सोबतच तोंडाच्या इतर अनेक समस्यांपासूनही आराम मिळेल. कोरफडीच्या अशा वापराने श्वासाच्या दुर्गंधीची समस्याही दूर होते.