Remedies for Swollen Feet : गरोदरपणात पायांना सूज आल्याने चालणं झालं अवघड ? ‘या’ उपायांनी मिळवा आराम

गरोदरपणात पायांवर सूज येणे ही सामान्य बाब आहे, परंतु त्यामुळे चालताना खूप त्रास होतो. या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायांचा अवलंब करू शकता.

Remedies for Swollen Feet : गरोदरपणात पायांना सूज आल्याने चालणं झालं अवघड ? 'या' उपायांनी मिळवा आराम
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Feb 25, 2023 | 7:40 AM

नवी दिल्ली : आई होणे ही जगातील सर्वात सुंदर अनुभूती आहे असे म्हणतात, पण आई होणे तितके सोपेही नाही. गरोदरपणात (pregnancy) महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अनेक प्रकारच्या हार्मोनल बदलांमुळे (hormonal changes) शारीरिक आणि मानसिक समस्या निर्माण होतात. उलट्या, डोकेदुखी, चक्कर येणे, चेहऱ्यावर पुरळ येणे, याशिवाय शरीरात अनेक बदल होतात. लठ्ठपणा वाढला की, पायांना सूज (swollen feet) आल्याने या समस्यांना बहुतेकांना सामोरे जावे लागते. गरोदरपणात महिलांचे पाय का सुजतात ते जाणून घ्या.

गरोदरपणात पायांवर का येते सूज ?

तज्ञांच्या मते, गर्भधारणेदरम्यान पाय सुजणे खूप सामान्य आहे. बाळाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी शरीरात तयार होणारे अतिरिक्त रक्त आणि द्रव यामुळे ही समस्या उद्बवते होते. याला एडेमा म्हणतात. त्यामुळे केवळ पायांनाच नव्हे तर हात, चेहऱ्यासह शरीराच्या इतर भागांनाही सूज येऊ शकते. पायाला सूज आल्याने चालायला त्रास होतो. पाय जास्त वेळ लटकत अथवा अधांतरी राहिल्याने सूज वाढते. प्रसूतीनंतर काही दिवसांनी ही समस्या बरी होत असली, तरी जोपर्यंत पायांना सूज असते, तोपर्यंत त्रास तर होतच राहतो. आराम मिळवण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायांचा अवलंब करू शकता. ते कोणते याची माहिती जाणून घेऊया.

हे सुद्धा वाचा

पायाखाली घ्या उशी – गरोदरपणात जास्त वेळ बसल्याने किंवा उभे राहिल्याने पाय सुजतात. अशावेळी पायांना विश्रांती देण्यासाठी पायांखाली उशी ठेवा व नंतर त्यावर पाय ठेवा. सुमारे 20 मिनिटे या उशीवर पाय ठेवून झोपा. दिवसातून थोड्या वेळाने असे केल्याने पायांची सूज कमी होईल.

एप्सम मिठाच्या पाण्याने पाय शेका – जर तुम्हालाही पायांना सूज येण्याची तक्रार असेल तर तुम्ही एप्सम मीठ वापरू शकता. त्याच्या गुणधर्मांमुळे पायांच्या स्नायूंना शेक मिळतो. तसेच, वेदना कमी करण्यासाठीदेखील हे खूप उपयुक्त आहे. यासाठी एका मोठ्या भांड्यात गरम पाणी घ्या, त्यात एक चमचा एप्सम मीठ घाला, आता या पाण्यात तुमचे पाय 20 ते 25 मिनिटे भिजवा. यामुळे तुमच्या पायाची सूज कमी होईल.

पोटॅशिअमयुक्त आहार घ्या – गरोदरपणात पोटॅशिअमच्या कमतरतेमुळे पायांवर सूज येण्याची समस्या देखील उद्भवते. अशावेळी तुम्हाला उच्च रक्तदाब आणि वॉटर रिटेंशनच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो. यासाठी पोटॅशिअम युक्त अन्नाचा आहारात समावेश करा. बटाटे, केळी, डाळिंब पिस्ता, रताळे यांसारख्या गोष्टींचे सेवन करा. हे सूज कमी करण्यास मदत करतात.

हायड्रेटेड रहा – पायाची सूज कमी करण्यासाठी शरीराला हायड्रेट ठेवावे. गरोदर महिलेने जास्तीत जास्त पाणी प्यायले पाहिजे. किमान 7 ते 8 ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. यामुळे जळजळ कमी होण्यासही मदत होते.

या गोष्टींचीही घ्या काळजी

– जास्तीत जास्त प्रोटीन्सचे करा सेवन

– थोड्या थोड्या वेळाने फेऱ्या मारा, चालत रहा.

– (डॉक्टरांच्या सल्ल्याने) दररोज 20 मिनिटे व्यायाम करा.

– मीठ ठराविक प्रमाणात आणि कमी खा.

( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.