White Tongue : तुमच्या जिभेचा रंग कोणता ? गुलाबी की पांढरा; असू शकतात या समस्या

आपली जीभ हे उत्तम मौखिक आरोग्याचे लक्षण आहे. पण जसजसे आपण मोठे होऊ लागतो, तसतसा अनेक कारणांमुळे जीभेवर पांढरा थर जमा होऊ लागतो. काही वेळा त्यामुळे तोंडाच्या संसर्गालाही निमंत्रण मिळते. त्यासाठी काही घरगुती उपाय जाणून घ्या.

White Tongue : तुमच्या जिभेचा रंग कोणता ? गुलाबी की पांढरा; असू शकतात या समस्या
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Feb 20, 2023 | 7:37 AM

नवी दिल्ली : मोत्यासारखे पांढरे दात (teeth care) कोणाला आवडत नाहीत, पण काही कारणांमुळे आपल्या दातांचा तसेच जिभेचा रंग बदलतो. जेव्हा आपली जीभ पांढरी होऊ लागते, तेव्हा ती त्रासदायक गोष्ट ठरते. निरोगी जिभेचा पृष्ठभाग काही पांढऱ्या भागासह फिकट गुलाबी रंगाचाअसतो. पण आपली जीभ संपूर्णपणे पांढरी किंवा पिवळी असेल तर सावधगिरी बाळगली पाहिजे. आपली जीभ हे उत्तम मौखिक आरोग्याचे (oral care) लक्षण आहे. पण जसजसे आपण मोठे होऊ लागतो, तसतसा अनेक कारणांमुळे जीभेवर पांढरा थर जमा होऊ लागतो. दातांची नीट काळजी न घेणे, धूम्रपान, आनुवंशिकता, कॉफी आणि चहासारख्या कॅफिनयुक्त पेयांचे सेवन यासारख्या अनेक कारणांमुळे जीभ पांढरी किंवा पिवळी (white tongue) दिसू शकते. अशा परिस्थितीत जर तुम्ही डेंटिस्टकडे जाऊ शकत नसाल तर जिभेवरील पांढरा थर दूर करण्यासाठी काही उत्तम घरगुती उपाय जाणून घ्या.

पांढऱ्या जीभेपासून कशी मुक्तता मिळवावी ?

आपल्या जिभेच्या वरच्या भागावर किंवा संपूर्ण भागावर अन्नाचे कण, जंतू आणि मृत पेशींचा जाड पांढरा लेप तयार झाला असेल तर आपली जीभ पांढरी दिसू शकते. यामुळे अस्वस्थता, दुर्गंधी आणि तोंडाचे आरोग्य खराब होऊ शकते. पांढरी जीभ हे गंभीर आरोग्य समस्येचे लक्षण नसेल पण ते दातांच्या खराब आरोग्याचे देखील लक्षण असू शकते, ज्यामुळे संसर्ग होऊ शकतो.

हे सुद्धा वाचा

पांढऱ्या जिभेपासून मुक्तता मिळवण्याचे उपाय :

1) प्रोबायोटिक्स

दही किंवा केफिर यांसारखे प्रोबायोटिक्स असलेले पदार्थ खाल्याने तोंडातील बॅक्टेरिआचे निरोगी संतुलन राखण्यास मदत करू शकतात. प्रोबायोटिक्स हानिकारक जीवाणूंची वाढ कमी करण्यास आणि जीभेवर पांढरा कोटिंग तयार होण्यास प्रतिबंध करण्यास मदत करू शकतात.

2) तेलाच्या गुळण्या

तेलाने गुळण्या करणे ही एक प्राचीन पद्धत आहे. त्यासाठी एक चमचा खोबरेल तेल 15-20 मिनिटे तोंडात धरून ठेवावे व नंतर ते थुंकून टाकावे. खोबरेल तेल हे नैसर्गिक क्लिंझर म्हणून काम करते, त्यामुळे तोंडातून बॅक्टेरिया आणि घाण काढली जाते व जिभेवरील पांढरा थरही कमी होण्यास मदत होते.

3) बेकिंग सोडा

बेकिंग सोडा हा एक असा नैसर्गिक उपाय आहे जो तोंडातील आम्ल किंवा ॲसिडचा प्रभाव काढून टाकण्यास मदत करू शकतो. त्यामुळे तुमच्या जिभेवरील बॅक्टेरिआची वाढ कमी होण्यासही मदत होते. एक चमचा बेकिंग सोडा थोडे पाण्यात मिसळून पेस्ट बनवावी आणि जीभ घासण्यासाठी त्याचा वापर करावा.

4) मिठाच्या पाण्याच्या गुळण्या

जीभ पांढरी झाली असेल तर सर्वात सोपा आणि प्रभावी घरगुती उपाय म्हणजे मिठाच्या पाण्याने गुळण्या करणे. यासाठी एक कप कोमट पाण्यात एक चमचा मीठ मिसळावे आणि ते पाणी तोंडात 30 सेकंद ठेऊन गुळण्या कराव्यात. मिठात जंतुनाशक गुणधर्म असतात जे तुमच्या तोंडातील बॅक्टेरिया नष्ट करण्यात आणि तुमच्या जिभेवरील पांढरे कोटिंग कमी करण्यास मदत करतात.

5) टंग क्लीनर

जिभेवरील पांढरा थर काढून टाकण्याचा आणखी एक सोपा आणि प्रभावी मार्ग म्हणजे टंग क्लीनरचा वापर करणे. हे टंग क्लीनर किंवा स्क्रॅपर्स एखाद्या मेडिकलमध्ये सहज उपलब्ध असतात किंवा काही वेळा ते ब्रशच्या मागच्या बाजूसही असतात. हे टंग क्लीनर्स जिभेवरील बॅक्टेरिया आणि मलबा यांचा थर हळूवारपणे काढून टाकण्यासाठी डिझाइन केलेले असतात. टंग क्लीनर्स जिभेच्या मागच्या बाजूस ठेऊन ते हळूवारपणे पुढे ओढावे. मात्र प्रत्येक स्ट्रोकनंतर ते आठवणीने पाण्याने स्वच्छ धुवावे.

Non Stop LIVE Update
मोदींच्या 'एक है तो सेफ है' घोषणेवर संजय राऊतांची टीका, म्हणाले.....
मोदींच्या 'एक है तो सेफ है' घोषणेवर संजय राऊतांची टीका, म्हणाले......
भाजपा - शिंदेंनी गुंडांना निवडणूक निरीक्षक नेमलंय, राऊत यांची टीका
भाजपा - शिंदेंनी गुंडांना निवडणूक निरीक्षक नेमलंय, राऊत यांची टीका.
नरेंद्र मोदी यांनीच महाराष्ट्राला 'एटीएम' बनवले, नाना पटोले यांची टीका
नरेंद्र मोदी यांनीच महाराष्ट्राला 'एटीएम' बनवले, नाना पटोले यांची टीका.
जेवढे मोदी - शाह जास्त फिरतील तेवढ्या आम्हाला जास्त जागा -जयंत पाटील
जेवढे मोदी - शाह जास्त फिरतील तेवढ्या आम्हाला जास्त जागा -जयंत पाटील.
भाजपा नेत्याच्या हत्येने खळबळ, भरदिवसा कुऱ्हाडीने वार केले
भाजपा नेत्याच्या हत्येने खळबळ, भरदिवसा कुऱ्हाडीने वार केले.
कॉन्ट्रॅक्टरचं दिवाळी आणि जनतेचं दिवाळं, काय म्हणाले उद्धव ठाकरे ?
कॉन्ट्रॅक्टरचं दिवाळी आणि जनतेचं दिवाळं, काय म्हणाले उद्धव ठाकरे ?.
आम्ही महाराष्ट्राला मविआचं 'एटीएम' होऊ देणार नाही, काय म्हणाले पंतप्रध
आम्ही महाराष्ट्राला मविआचं 'एटीएम' होऊ देणार नाही, काय म्हणाले पंतप्रध.
महाराष्ट्राची सेवा करण्याचे सुख काही औरच, म्हणूनच..,'काय म्हणाले मोदी
महाराष्ट्राची सेवा करण्याचे सुख काही औरच, म्हणूनच..,'काय म्हणाले मोदी.
वरळीची निवडणूक वन साईड होणार, सचिन अहिर यांनी केला दावा...
वरळीची निवडणूक वन साईड होणार, सचिन अहिर यांनी केला दावा....
शरद पवारांचे वारसदार कोण? दादा मिश्कीलपणे म्हणाले, 'मी रतन टाटांचा...'
शरद पवारांचे वारसदार कोण? दादा मिश्कीलपणे म्हणाले, 'मी रतन टाटांचा...'.