Home Remedies for Sneezing: सतत येणाऱ्या शिंकांमुळे त्रासलात ? हे घरगुती उपाय करून पहा
थंडीच्या दिवसात सर्दी-खोकला होणे हे सामान्य आहे. मात्र सतत शिंका येत असतील तर माणूस त्रासून जातो. तो त्रास दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय करून पहा.
नवी दिल्ली – हिवाळ्याच्या दिवसांत बऱ्याच लोकांना सर्दी-खोकल्याचा (cough and cold) त्रास वारंवार होत असतो. त्यासोबतच शिंका येण्याची (sneezing) समस्याही सामान्य आहे. पण जर शिंका जास्त येत असेल तर त्याकडे गंभीरतेने लक्ष दिले पाहिजे. शिंका येण्याची अनेक कारणे असू शकतात. वातावरणातील धूळ, परागकण, बुरशी यासह ताप, सर्दी, कोरडी हवा, मसालेदार अन्न किंवा एखाद्या गोष्टीची ॲलर्जी (allergy) झाल्यानेही शिंका येऊ शकतात. सतत शिंका येत असतील तर काही घरगुती उपायांच्या मदतीने आराम मिळू शकतो.
1) मध मधाचे सेवन केल्याने तुम्हाला ऋतूमानानुसार होणाऱ्या ॲलर्जीपासून आराम मिळतो. त्यासाठी तुम्ही एका ग्लास कोमट पाण्यात थोडा मध मिसळून ते पाणी पिऊ शकता. शिंकांचा त्रास दूर करण्यासाठी तुम्ही मध आणि आल्याचा चहा देखील बनवू शकता.
2) हळद
शिंका येणे आणि नाक बंद होणे यासारख्या लक्षणांपासून आराम मिळण्यासाठी हळद प्रभावी असल्याचे आढळून आले आहे. हळदीमुळे रोगप्रतिकारक शक्तीचे नियमन देखील होते. गरम दूध किंवा पाण्यात हळद घालून त्याचे सेवन करू शकता.
3) काळी मिरी
काळी मिरी एक नैसर्गिक इम्युनोमोड्युलेटर आहे ज्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. तुम्ही काळी मिरीचा चहा अथवा काढा पिऊ शकता. त्यामध्ये आलं, तुळस आणि वेलचीही घालू शकता. ॲलर्जीच्या लक्षणांपासून आराम मिळण्यासाठी तुम्ही हा चहा दिवसातून दोनदा पिऊ शकता.
4) आलं
आल्याचे सेवन केल्याने ॲलर्जीपासून संरक्षण होते. आल्याची पावडर हळद आणि अश्वगंधा पावडरमध्ये घालून चांगली मिसळा. हे मिश्रण दुधासोबत प्यावे.
5) एअर फिल्टरचा करा वापर
एअर फिल्टर वापरल्याने हवा स्वच्छ ठेवण्यास मदत होते. त्यामुळे कोणतेही कण किंवा ट्रिगर्सच्या संपर्कात येण्यापासून टाळण्यासही मदत होते, ज्यामुळे आपल्याला शिंक येऊ शकते.
( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)