पीरियडच्या दुसऱ्या दिवशी होतात अधिक वेदना ? आरामासाठी हे उपाय करा
मासिक पाळीचे ते ४-५ दिवस कोणत्याही महिलेसाठी त्रासदायक असतात. पण बहुतेक महिलांना दुसऱ्या दिवशी अधिक त्रास होतो. अशावेळी आराम मिळवण्यासाठी काय करावे ते जाणून घेऊया.
Get rid of period pain : मासिक पाळी (period) … सर्वच मुली, स्त्रियांच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा . पण तो थोडा वेदनादायकक असतो. पीरियडचे ते ४-५ दिवस प्रत्येक महिलेसाठी खूपच त्रासदायक असतात. पण काही महिलांना पाळीच्या दुसऱ्या दिवशी जास्त त्रास (periodpain) होतो. तुम्हालाही पाळीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी हा त्रास होत असेल तर काही सोप्या टिप्स जाणू घ्या, ज्या फॉलो केल्याने तुम्हाला थोडा आराम मिळू शकतो.
मासिक पाळीच्या दुसऱ्या दिवशी अधिक वेदना का होतात ?
पीरियडमध्ये रक्त आणि टिश्यूजचे नियमितपणे वाहत असतात. त्यामुळे गर्भाशयाचे स्नायू आकुंचन पावतात आणि गर्भाशयाला रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा कमी होऊ लागतो. गर्भाशयात ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाल्यामुळे त्यामुळे ते प्रोस्टाग्लॅंडिन सारखे रसायन सोडते ज्यामुळे वेदना होऊ शकता. या प्रकारच्या वेदना सामान्यतः मासिक पाळीच्या दुसऱ्या दिवशी होतात आणि त्याला डिसमेनोरिया म्हणतात.
मासिक पाळीच्या वेदना कमी करण्याचे उपाय
पीरियड क्रॅम्प्स वेदनादायक असू शकतात. या वेदनांपासून आराम मिळवण्याचे काही उपाय आहेत.
गरम पाण्याने शेका
गरम पाण्याची पिशवी स्नायूंना आराम देते आणि रक्ताभिसरण सुधारते. ज्यामुळे पीरियड्सचे क्रॅम्प्स कमी होतात. यामुळे पोटदुखीमध्ये आराम मिळतो.
कॅफेनचे सेवन कमी करा
काम करण्यासाठी कॉफीवर अवलंबून असाल तर ते मासिक पाळीच्या काळात त्रासदायक ठरते. कारण कॅफिनमुळे रक्ताभिसरण कमी होते. त्यामुळे गर्भाशय आकुंचन पावू शकते. ज्यामुळे वेदनादायक क्रॅम्प्स येऊ शकतात.
ओव्याचे पाणी प्या
ओवा हा केवळ पचनाच्या समस्यांसाठी उपयुक्त नाही तर मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठीही फायदेशीर ठरते. ओव्यामधील औषधी गुणधर्म हे उपयुक्त ठरतात.
मासिक पाळीत डार्क चॉकलेट, ॲव्होकॅडो, सॅल्मन, हिरव्या पालेभाज्या आणि ब्रोकोली खा. ज्यामुळे तुम्हाला आराम मिळेल. या पदार्थांचे सेवन केल्याने सूज येणे आणि मासिक पाळीदरम्यान येणारे क्रॅम्प्स कमी होण्यास मदत होते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)