पीरियड्सचं दुखणं थांबवण्यासाठी गोळी घेणं जीवावर बेतलं, 3 आठवड्यांतच ‘तिचा’ अंत; पण..
मासिक पाळीचं दुखणं थांबवण्यासाठी बऱ्याच महिला औषधं घेतात. कॉलेजमधील एका मुलीनेही या वेदना कमी करण्यासाठी असंच औषध घेतलं. मात्र ते तिला भलतंच महागात पडलं कारण त्या गोळ्या घेणं तिच्या जीवावर बेतलं.
लंडन| 20 डिसेंबर 2023 : मासिक पाळी किंवा पीरियड्सदरम्यान अनेक महिलांना पोटदुखी, पाठदुखी किंवा क्रॅम्प्सचा त्रास होतो. काहीजणी हा त्रास सहन करतात तर काही महिला तो थांबवण्यासाठी एखादी गोळी किंवा औषध घेतात. लंडनमधील एका 16 वर्षांच्या मुलीनेही पीरियड्सचं दुखणं कमी करण्यासाठी अशीच वेदनाशमक गोळी घेतली. मात्र ते औषध घेणं तिला भलतंच महागात पडलं कारण ते तिच्या जीवावरच बेतलं. त्या गोळ्या घेतल्यानंतर अवघ्या 3 आठवड्यांतच तिचा त्रास वाढला. डॉक्टरांच्या तपासणी दरम्यान तिच्या पोटात किडा असल्याचे सापडले. तसेच रक्त गोठल्याने 48 तासांतच तिचा मृत्यू झाला.
द टेलिग्राफच्या वृत्तानुसार, 16 वर्षीय लैला खान, या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलीला मासिक पाळीमुळे असह्य वेदना होत होत्या. त्या कमी करण्यासाठी तिच्या मैत्रिणींनी तिला औषध घेण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर लैलाने 25 नोव्हेंबरपासून गोळ्या घेण्यास सुरुवात केली. मात्र हे औषध घेतल्यानंतर 5 डिसेंबरपासून तिला डोकेदुखीचा त्रास सुरू झाला आणि आठवड्याच्या शेवटी तर तिला भयानक उलट्या होऊ लागल्या. तिच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार लैलाला दर 30 मिनिटांनी उलट्या होत होत्या. त्यांनी तिला तपासणीसाठी रुग्णालयातही नेले. डॉक्टरांनी तिला एक गोळी दिली आणि तिच्या पोटात जंत झाल्याचे सांगितले.
नो रेड फ्लॅग स्थिती
मृत मुलीची मावशी जेना ब्रेथवेट म्हणाली की, “ती रविवारी रात्री (17 डिसेंबर) खूप अस्वस्थ होती. आम्हाला सोमवारी (18 डिसेंबर) सकाळी डॉक्टरांची भेट घ्यावी लागली कारण तिला दर अर्ध्या तासाने उलट्या होत होत्या.” मात्र त्यानंतरही ती बराच वेळ आजारीच होती. तिच्या पोटात जंत किंवा किडा असल्याच संशय डॉक्रांनी व्यक्त केला. मात्र असे असले तरी नो रेड फ्लॅग स्थिती (गंभीर आजार किंवा इमर्जन्सी) असल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र बुधवारपर्यंत अशीच स्थिती राहिल्यास तिला हॉस्पिटलमध्ये न्या, असे त्यांनी सांगितले. मात्र, तिची प्रकृती आणखीनच बिघडल्याने ती वेदनेने ओरडू लागली. कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला, परंतु ती बाथरूममध्ये पडली आणि तिच्या पायाला दुखापत झाली. तिची मावशी आणि काकूने तिला रुग्णालयात नेण्यासाठी कारमध्ये बसवले पण तिने रिस्पॉन्स देणे बंद केले.
डॉक्टरांनी ब्रेन-डेड घोषित केले
अखेर लैला हिला ग्रिम्सबी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आणि सीटी स्कॅन करण्यात आले. मात्र तिच्या मेंदूमध्ये रक्ताची गुठळी तयार झाली. त्यामुळे तिच्यावर ऑपरेशनही करण्यात आले. पण डॉक्टरांनी तिला ब्रेनडेड घोषित केले.
अवयवदान करून वाचवले इतरांचे प्राण
लैलाच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की तिचे प्राध्यापक तिला ऑक्सफर्डची संभाव्य विद्यार्थिनी मानत होते. तिला ब्रेन डेड घोषित केल्यानंतर कुटुंबियांनी तिचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ख्रिसमसच्या काही दिवस आधीच लैलामुळे 5 लोकांचे प्राण वाचले.