Health : आता स्मार्टरिंगच्या माध्यमातून कळणार आरोग्याचा आलेख; ‘अल्ट्राह्युमन’चा अनोखा अविष्कार
अल्ट्राह्युमनने नुकतेच आपल्या स्मार्टरिंगचे लाँचिंग केले आहे. या रिंगच्या मदतीने युजर्स आपला आरोग्य डेटा ट्रॅक करू शकतात. यामध्ये यूजर्सना अनेक खास फीचर्सही देण्यात आले असून, एखाद्या स्मार्टवॉच सारखेच यात विविध आरोग्य विषयक मोड उपलब्ध आहेत.
स्मार्टबँड आणि स्मार्टवॉचनंतर आता स्मार्टरिंगही (SmartRing) बाजारात आली आहे. स्मार्ट फिटनेस ब्रँड अल्ट्राह्युमनने (Ultrahuman) अशाच एका रिंगचे नुकतेच लाँचिंग केले आहे. कंपनीने या रिंगला अल्ट्राह्युमन रिंग असे नाव दिले असून, या रिंगच्या माध्यमातून युजर्स आरोग्य डेटा नियमित पध्दतीने अपडेट करु शकतात. तसेच आपल्या आरोग्याकडे या रिंगच्या माध्यमातून लक्ष देऊ शकणार आहेत. ही रिंग म्हणजे एक प्रकारचे मेटाबॉलिझम ट्रॅकिंग (Metabolism tracking) असून ते वेअरेबल डिव्हाईस देखील आहे. त्याच्या मदतीने युसर्जच्या सर्व हालचाली, झोप आणि शरीरातील ऊर्जा डायनॅमिक ट्रॅक केली जाऊ शकते. एखादी स्मार्टवॉच ज्या पध्दतीने आरोग्य विषयक सुविधा पुरविण्याचे काम करते ते सर्व मोड या रिंगमध्येही देण्यात आलेले आहेत. ही रिंग अनेक हेल्थ फीचर्सवर काम करते.
रिंगमध्ये काय असेल खास?
अल्ट्राह्युमन रिंग साध्या डिझाइनसह उपलब्ध असून यामध्ये युजर्सना कोणत्याही प्रकारचा डिसप्ले मिळणार नाही. त्यात स्क्रीन किंवा कुठलेही व्हायब्रेशन राहणार नाही. थोडक्यात, यूजर्सना यात सतत नोटिफिकेशन्स मिळणार नाहीत. युजर्सना त्यांचा ॲक्टीव्हीटीचा संपूर्ण तपशील मॅन्यूअली तपासावा लागणार आहे. युजर्स वर्कआउट करतानाही रिंगचा वापर करु शकणार आहेत. अंगठी टायटॅनियमपासून बनलेली असून कंपनीच्या म्हणण्यानुसार ही अंगठी टूल स्टीलपेक्षा 5 पट अधिक मजबूत आहे; तसेच स्क्रॅच रजिस्टेंट देखील आहे. ब्रँडनुसार, अल्ट्राह्युमन रिंग अशी बनवण्यात आली आहे की ती बाहेरून मजबूत असून तेव्हढीच आतून आरामदायी आहे.
फीचर्स आणि किंमत
रिंग 5 दिवसांच्या बॅटरी लाइफसह येते. 7 जुलैपासून ग्राहक ही रिंग प्री-बुक करू शकणार आहेत. त्याची शिपिंग ऑगस्ट 2022 मध्ये सुरू होईल. युजर्स 18,999 रुपयांच्या किमतीत या रिंगची प्री-ऑर्डर करू शकणार आहेत. ही रिंग ब्लॅक आणि गोल्डन या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.