सावधान! लठ्ठपणा-तणाव-अशक्तपणाकडे दुर्लक्ष करताय? असू शकतात ‘या’ समस्येची लक्षणे…
आरोग्यासंबंधित बोलत असताना अनियमित मासिक पाळीला जबाबदार ठरणाऱ्या या 9 कारणांबद्दल जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
मुंबई : अनियमित पाळी ही बहुतेक स्त्रिया सामान्य समस्या आहे. बऱ्याचदा गर्भधारणेदरम्यान, पाळीची अनियमितता हे सामान्य आहे. परंतु, आपण गर्भधारणेची योजना आखत नसल्यास आणि तरीही आपल्या मासिक पाळीमध्ये अनियमितता असल्यास, त्यासाठी बरीच कारणे असू शकतात. आरोग्यासंबंधित बोलत असताना अनियमित मासिक पाळीला जबाबदार ठरणाऱ्या या 9 कारणांबद्दल जाणून घेणे महत्त्वाचे आहे (Uneven menstruation cycle and late period reasons).
ताण
तणावाचा शरीरावर अनेक प्रकारे परिणाम होतो. तणावमुळे GnRH नावाच्या संप्रेरकाची मात्रा कमी होते, ज्यामुळे ओव्हुलेशन किंवा पाळी वेळेत येत नाही. यासाठी स्वत:ला नेहमी तणावमुक्त ठेवा आणि मासिक पाळी नियमित करण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
आजार
अचानक ताप, सर्दी, खोकला किंवा दीर्घकालीन आजारपणामुळेही पाळी येण्यास विलंब होऊ शकतो. परंतु, हे तात्पुरते आहे. एकदा आपण आजारातून बरे झालो की मासिक पाळी नियमित होते.
नित्यक्रमात बदल
वेळापत्रक बदलणे, रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणे किंवा एखाद्या महत्त्वाच्या कामामुळे आपली दिनचर्या बदलते. जेव्हा शरीराला या नवीन शेड्यूलची सवय लागते किंवा जेव्हा आपण सामान्य रूटीनमध्ये परत येतो, तेव्हा पाळी अनियमित होते (Uneven menstruation cycle and late period reasons).
स्तनपान
अनेक स्त्रियांना स्तनपान सुरू असेपर्यंत मासिक पाळी येत नाहीत.
गर्भ निरोधक गोळ्या
गर्भ निरोधक गोळ्या आणि काही इतर औषधे देखील मासिक पाळीचे चक्र बदलतात. अशी औषधे घेतल्यावर एकतर पाळी कमी येते, खूप लवकर येतो किंवा ती पूर्णपणे थांबते. अशा वेळी तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा.
लठ्ठपणा
लठ्ठपणामुळेदेखील मासिक पाळीला विलंब होऊ शकतो. जरी, ही समस्या कमी वजनाच्या लोकांना देखील होत असली, तरी लठ्ठपणा याचे मुख्य कारण असू शकते (Uneven menstruation cycle and late period reasons).
रजोनिवृत्ती
रजोनिवृत्तीपूर्वी महिलांच्या शरीरात बरेच अंतर्गत बदल होतात. यामुळे, मासिक पाळी उशीरा किंवा वेळेआधी येऊ शकते.
अशक्तपणा
मासिक पाळी अनियमित येण्यास जसा लठ्ठपणा कारणीभूत ठरतो, तसाच शरीराचा अति बारीकपणा देखील पाळीवर बंधने आणतो. पाळी नियमित येण्यासाठी वजन हा घटक महत्त्वाचा आहे.
थायरॉईड
गळ्यातील थायरॉईड ग्रंथी चयापचयाची क्रिया नियंत्रित करतात. शरीराच्या बर्याक्रियांमध्येही याची महत्त्वाची भूमिका असते. आपल्याला थायरॉईड संबंधित कोणतीही समस्या असल्यास मासिक पाळी प्रभावित होऊ शकते.
(Uneven menstruation cycle and late period reasons)
Health | देशातील 10 टक्के महिला PCODने ग्रासित, जाणून घ्या ‘या’ आजाराबद्दल…https://t.co/j8mizk9UJ9#PCOD #health
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 17, 2020