कर्करोगाचे घटक असलेल्या शॅम्पूबद्दल यूनिलिव्हरचे स्पष्टीकरण, काय म्हणाली कंपनी?

युनिलिव्हर या कंपनीच्या ड्राय शॅम्पूमध्ये कर्करोगाला कारणीभूत असलेले घटक आढळल्याने कंपनीने आपली उत्पादने वापस मागविली होती. यावर आता कंपनीने स्पष्टीकरण दिले आहे.

कर्करोगाचे घटक असलेल्या शॅम्पूबद्दल यूनिलिव्हरचे स्पष्टीकरण, काय म्हणाली कंपनी?
युनिलिव्हर Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 26, 2022 | 6:04 PM

नवी दिल्ली,  युनिलिव्हरच्या ड्राय शॅम्पूमध्ये कर्करोगास कारणीभूत ठरणाऱ्या हानिकारक घटकांच्या भीतीने भारतातील हिंदुस्तान युनिलिव्हर (एचयूएल) ने देशात असे कोणतेही उत्पादन विकत असल्याबाबत नकार दिला आहे. 21 ऑक्टोबर रोजी, यूएस एफडीएने बाजारातून डोव्ह ड्राय शैम्पू काढून घेण्याची नोटीस जारी केली. किंबहुना, संशोधकांना त्यात बेंझिनचे उच्च प्रमाण आढळले, ज्यामुळे कर्करोग होऊ शकतो. Dove आणि इतर ड्राय शॅम्पू उत्पादने HUL ची मूळ कंपनी Unilever द्वारे उत्पादित केली जातात. या खुलाशानंतर, युनिलिव्हरने यूएस बाजारातून Dove, Nexxus, Suave, TIGI आणि Aerosol ड्राय शॅम्पू परत मागवले आहेत.

अशी उत्पादने भारतात बनवत नाही

हिंदुस्तान युनिलिव्हरच्या म्हणण्यानुसार, कंपनी भारतात अशी उत्पादने बनवत नाही किंवा त्यांची येथे विक्रीही करत नाही. एका इंग्रजी वृत्तपत्राला उत्तर देताना कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, “HUL भारतात ड्राय शॅम्पू बनवत नाही किंवा विकत नाही. युनिलिव्हर यू.एस आणि कॅनडाने ऑक्टोबर 2021 पूर्वी उत्पादित ड्राय शॅम्पूची निवडक उत्पादने स्वेच्छेने मागे घेतली आहेत. अंतर्गत तपासणीनंतर, या उत्पादनांमध्ये बेंझिनची उच्च पातळी ओळखली गेली.

डोव्ह ड्राय शैम्पू युनिलिव्हरद्वारे यूएस आणि कॅनडाच्या बाजारपेठांमध्ये प्रामुख्याने विकले जाते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या शैम्पूमध्ये सेंद्रिय रासायनिक कंपाऊंड बेंझिन जास्त प्रमाणात आढळून आले आहे ज्यामुळे मानवी शरीरात कर्करोग निर्माण करणाऱ्या पेशींचा धोका वाढू शकतो.

हे सुद्धा वाचा

काय आहेत ड्राय शैम्पूचे तोटे?

केस ओले न करता स्वच्छ करण्यासाठी ड्राय शॅम्पूचा वापर केला जातो. ते पावडर किंवा स्प्रेसारखे असतात. हे शैम्पू केसांमधले तेल स्वच्छ करतात त्यामुळे केस मोकळे आणि दाट दिसतात. काही ड्राय शैम्पूमध्ये एरोसोल स्प्रे देखील असतो.

हे आरोग्यासाठी हानिकारक असते.   युनिलिव्हरने सांगितले की, बेंझिन हा घटक श्वास, अन्न किंवा त्वचेद्वारे शरीरात प्रवेश करू शकते. ते शरीरात गेल्याने बोन मॅरो, ल्युकेमिया आणि  ब्लड कॅन्सर होण्याचा धोका असतो.

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.