Health Budget : 2047 पर्यंत देशातून ॲनिमिया संपवण्याचे लक्ष्य, जाणून घ्या या आजाराबद्दल सर्वकाही..
शरीरातील हिमोग्लोबिन कमी होणे आणि आवश्यक जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळेही सिकलसेल ॲनिमिया होतो. वाढत्या वयाबरोबर ही समस्या धोकादायक बनू शकते.
नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala sitaraman) यांनी त्यांच्या टर्ममधील शेवटचा अर्थसंकल्प आज सादर केला. या बजेटमध्ये हेल्थ सेक्टरसाठी (health sector) काही विशेष घोषणा करण्यात आल्या. हेल्थकेअर सेक्टर मजबूक करण्यासाठी सरकारने अनेक घोषणा केल्या. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आरोग्य अर्थसंकल्पात घोषणा करताना 2047 पर्यंत देशाला सिकलसेल ॲनिमिया (anemia) या आजारापासून मुक्त करण्याचे उद्दिष्ट जाहीर केले. हा आजार भारतात मोठ्या प्रमाणावर पसरलेला आहे. 15 ते 50 वयोगटातील सुमारे 56 टक्के महिलांना याचा सामना करावा लागतो. ॲनिमिया का होतो आणि तो किती धोकादायक आहे हे जाणून घेऊया.
वरिष्ठ डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, ॲनिमिया म्हणजे शरीरात रक्ताची कमतरता. हा आजार अनेक कारणांमुळे होतो. शरीरातील हिमोग्लोबीन कमी होणे आणि आवश्यक खनिजे आणि जीवनसत्त्वे यांची कमतरता निर्माण होणे, हे देखील या आजाराचे कारण आहे. वाढत्या वयाबरोबर ही समस्या धोकादायक बनते. त्याची प्रकरणे स्त्रियांमध्ये अधिक सामान्य आहेत. ज्या महिला आहारात तांबे आणि जीवनसत्त्व यांचे केमी सेवन करतात, त्यांना सिकलसेल ॲनिमियाचा धोका जास्त असतो. महिलांमध्ये मासिक पाळी दरम्यान रक्त कमी होते. या काळात योग्य आहार न घेतल्याने ॲनिमियाचा धोका असतो.
ही आहेत ॲनिमियाची लक्षणे
– त्वचा पिवळसर होणे
– हृदयाचे ठोके अचानक वाढणे किंवा कमी होणे
– चक्कर येणे
– श्वास घेण्यास त्रास होणे
– डोकेदुखी
– लघवी अथवा शौचाचा रंग बदलणे
अशक्तपणा खूप धोकादायक आहे
ॲनिमिया अतिशय धोकादायक
ॲनिमिया हा सौम्य आणि गंभीर दोन्ही प्रकारचा असतो, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले. जर शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी 8g/dl पेक्षा कमी असेल तर तो गंभीर ॲनिमिया असतो, यामध्ये रुग्णाला रक्त द्यावे लागते. गर्भवती महिलांना ॲनिमिया होण्याची शक्यता जास्त असते, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले. या महिलांनी आपल्या आहारात प्रोटीन आणि लोहयुक्त पदार्थांचा आवर्जून समावेश केला पाहिजे.