ही वनस्पती केसांसाठी आहे फारच चमत्कारी, कोंडा आणि केसगळीच्या समस्येवर रामबाण उपाय
आवळा केसांना निरोगी, मऊ आणि चमकदार बनवण्यासाठी फायदेशीर मानला जातो. याचा नियमित उपयोग केल्याने केस गळण्याची समस्या कमी होते. त्यासोबतच केस वाढतात आणि चमकदार होण्यासोबत मजबूत होतात.
आवळा आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो. याशिवाय आवळ्यामुळे केसांची गुणवत्ता सुधारते. ज्यामुळे केस काळे राहण्यास मदत होते. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट आणि इतर पोषक तत्वे आहे. जे केसांच्या वाढीसाठी आणि केसांना नैसर्गिक चमक देण्यासाठी फायदेशीर आहे. यासोबतच आवळ्यामुळे केसांची गुणवत्ता सुधारते. केसांचा नैसर्गिक रंग टिकवून ठेवण्यास मदत होते. आवळा केसांचा रंग नैसर्गिक पद्धतीने काळा ठेवण्यास फायदेशीर आहे.
आवळा कच्चा किंवा वाळलेला खाणे केसांसोबत आरोग्यासाठीही फायदेशीर ठरू शकतो. आवळा अनेक पद्धतीने खाल्ला जाऊ शकतो. त्यासोबतच आवळा केसांना देखील लावला जातो. जाणून घेऊया आवळा केसांना लावण्याची पद्धत.
आवळ्याचे तेल
तुम्ही आवळ्याच्या तेलाचा वापर करू शकता. आवळा तेल बाजारामध्ये सहज उपलब्ध होते. आवळ्याचे तेल माथ्याला आणि केसांना लावून मसाज करा. त्यानंतर तीस मिनिटानंतर केस स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या. आवळ्याच्या तेलामुळे केसांची मुळे पक्की होतात आणि केस मजबूत होऊन दाट होतात.
आवळ्याची पावडर आणि दही
तुम्ही आवळ्याचा हेअर मास्क बनवून देखील केसांना लावू शकता. दही आणि आवळा दोन्हीही केसांसाठी फायदेशीर आहे. ह्यामुळे केस चमकदार आणि निरोगी होतात. हेअर मास्क बनवण्यासाठी तुम्ही एका वाटीमध्ये २ ते ३ चमचे आवळा पावडर , २ चमचे दही आणि १ चमचा मध घेऊन मिक्स करा. हा मास्क केसांच्या मुळांपासून लावा. २० ते ३० मिनिटानंतर केस स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या.
आवळा पावडर आणि मध
आवळा पावडर आणि मधाचे मिश्रण हे केसांना मऊ आणि चमकदार बनवण्यासाठी फायदेशीर आहे. एका वाटीत २ चमचे आवळा पावडर आणि १ चमचा मध घेऊन मिक्स करा. त्यानंतर हे मिश्रण केसांना वीस ते तीस मिनिटे लावून ठेवा. शेवटी केस शाम्पू लावून स्वच्छ धुऊन घ्या.
आवळ्याचे पाणी
तुमचे केस निरोगी आणि चमकदार बनवण्यासाठी तुम्ही आवळ्याचे पाणी केसांना लावू शकतात. यासाठी तुम्हाला आधी आवळे कापून ते पाण्यामध्ये उकळून घ्यावे लागतील. त्यानंतर रात्रभर त्याला तसेच ठेवून दुसऱ्या दिवशी सकाळी हे पाणी तुमच्या केसांना लावा. हे पाणी आठवड्यातून दोनदा लावल्याने तुमचे केस निरोगी आणि चमकदार होतील.