Health : बिअर पिणं वाईट पण चेहऱ्याला लावण्याचे फायदे एकदा वाचाच जाणून घ्या
बिअरमुळे आपल्या त्वचेवरील पिंपल्स, बॅक्टेरियाचा संसर्ग देखील कमी होण्यास मदत होते. तर आता आपण चेहऱ्यावर बिअर लावण्याचे फायदे काय आहेत याबाबत जाणून घेणार आहोत.
मुंबई : बिअर पिणे हे आपल्या शरीरासाठी घातक असते. बिअर ही आपल्या यकृतासाठी हानिकारक असते. त्यामुळे डॉक्टर देखील प्रत्येकाला बिअरचं सेवन न करण्याचा सल्ला देतात. पण बिअर जरी आपल्या शरीरासाठी घातक असली तरी ती आपल्या चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर असते. होय तुम्ही ऐकताय ते खरं आहे. बिअर आपल्या चेहऱ्याला लावल्यामुळे आपली त्वचा चमकदार आणि निरोगी राहते. बिअरमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात जे आपल्या त्वचेसाठी गुणकारी ठरतात.
शास्त्रज्ञांच्या संशोधनानुसार, बिअरमध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म आहेत जे आपली त्वचा चमकदार आणि निरोगी बनवण्यास मदत करतात. बिअर बनवताना हॉप्स नावाच्या फुलाचा वापर केला जातो. या फुलामध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-मेलानोजेनिक, अँटी-इंफ्लेमेटरी असे गुणधर्म असतात. जे आपली त्वचा निरोगी ठेवतात.
चेहऱ्यावर बिअर लावल्याचे फायदे
चेहऱ्यावर बिअर लावल्यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होण्यास मदत होते. बिअरमुळे चेहऱ्यावरील हायपरपिग्मेंटेशन कमी होते. कारण बिअरमध्ये हायड्रोक्विनोन नावाचे संयुग असते जे हायपरपिग्मेंटेशन कमी करते. बिअर लावल्यामुळे चेहऱ्यावरील बॅक्टेरियाचा संसर्ग कमी होतो बिएर लावल्यामुळे चेहऱ्यावरील डेड स्किन काढून टाकण्यास मदत होते. तसंच आपली त्वचा चमकदार होते. बिअर लावल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर ग्लो येतो.
चेहऱ्यावर बिअर कशी लावायची?
चेहऱ्यावर बिअर कशी लावायची असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. तर यासाठी तुम्ही बिअर आणि संत्र्याचा रस यांचे मिश्रण करून ते चेहऱ्याला लावू शकता. हे मिश्रण कापसाच्या बोळ्याने तुमच्या चेहऱ्यावर लावा आणि वीस मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ धुवा. तुम्ही खोबरेल तेल आणि बिअर याचे मिश्रण देखील चेहऱ्यावर लावू शकता. यासाठी एक चमचा खोबरेल तेल आणि एक चमचा बिअर घ्या आणि मिक्स करा. त्यानंतर हे मिश्रण तुमच्या चेहऱ्याला लावा. आणि १५ मिनिटांनंतर तुमचा चेहरा स्वच्छ धुवा. तुम्ही 3 स्ट्रॉबेरी घ्या, त्या मॅश करा आणि त्यात 1 चमचा बिअर मिक्स करा. तयार केलेली ही पेस्ट तुमच्या चेहऱ्याला लावा. त्यानंतर २० मिनिटांनी तुमचा चेहरा स्वच्छ धुवा.