Skin care: ‘असे’ तयार करा घरगुती ग्लिसरीन क्रीम; जे तुमच्या हातांना बनवेल अधिक मुलायम

जर तुमच्या हातांची त्वचा खरखरीत आणि कोरडी झाली असेल तर घरी बनवलेले हे ग्लिसरीन क्रीम वापरून पहा. या क्रीमच्या वापराने तुमचे हात आणि त्वचा मऊ, मुलायम होईल.

Skin care: 'असे' तयार करा घरगुती ग्लिसरीन क्रीम; जे तुमच्या हातांना बनवेल अधिक मुलायम
प्रातिनिधिक छायाचित्र Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Aug 31, 2022 | 10:46 AM

Homemade Glycerin Benefits : हिवाळा असो किंवा उन्हाळा, आजकाल धूळ, प्रदूषण, खराब हवामान यामुळे आपल्या त्वचेचे खूप नुकसान होते. हाता पायाची त्वचा कोरडी आणि खरखरीत होते. ड्राय स्किन, निर्जीव , खरखरीत हात यामुळे अनेक लोक हैराण होतात. चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी (skin care tips) बाजारात शेकडो क्रीम्स असतात, पण हाता-पायांच्या त्वचेची काळजी घेणे दरवेळेस जमतेच असे नाही. रोजच्या कामाच्या धबाडग्यात त्वचेकडे दुर्लक्ष होते आणि परिणामी त्वचा खराब होते. हात-पाय मऊ, मुलायम ठेवण्यासाठी तेल वगैरे लावून दरवेळेस फायदा होतोच असे नाही. त्यापेक्षा घरच्याघरी (home remedies) एखादे क्रीम तयार करून ते रोज, नियमितपणे लावल्यास त्वचा मऊ होईल. घरी ग्लिसरीनयुक्त क्रीम (Glycerin cream)तयार करून त्याचा वापर करून पहा. त्यामुळे कोरड्या त्वचेची तक्रार दूर होईल. हे क्रीम अवघ्या 4 पदार्थांच्या मदतीने घरी, सोप्या पद्धतीने तयार करता येईल. ते कसे ते जाणून घेऊया.

ग्लिसरीन क्रीम बनवण्याचे साहित्य

ग्लिसरिन – 1 चमचा

गुलाब पाणी – 2 चमचे

हे सुद्धा वाचा

नारळाचे तेल – 1 चमचा

बदामाचे तेल – 1 चमचा

ग्लिसरीन क्रीम बनवण्याची कृती

ग्लिसरीन क्रीम बनवण्यासाठी एक चमचा बदामाचे तेल व एक चमचा नारळाचे तेल एकत्र करून गरम करावे. ते एकमेकांमध्ये नीट एकजीव होत नाही, तोपर्यंत ते गरम करत रहावे. त्यानंतर गॅस बंद करून हे तेल एका भांड्यात काढावे आणि थंड होऊ द्यावे. हे मिश्रण थंड झाल्यानंतर त्यामध्ये गुलाबपाणी आणि ग्लिसरीन मिक्स करावे. हे सर्व मिश्रण एकत्र नीट मिसळावे. तुमचे ग्लिसरीन क्रीम तयार आहे.

काय आहेत ग्लिसरीन क्रीमचे फायदे ?

1) त्वचा मॉयश्चराइज करते – ग्लिसरीनचा वापर तयार करून केलेले क्रीम वापरल्यामुळे हाताची त्वचा मॉयश्चराइज होत. रोज या क्रीमचा वापर केल्याने तुमच्या हातांची त्वचा हवेतील मॉयश्चर शोषून घेते. त्यामुळे शुष्क त्वचा आणि त्यावरील डाग, पॅचेस कमी होऊ लागतात. ग्लिसरीन क्रीम लावल्यावर अवघ्या काही वेळातच हात मुलायम होतात.

2) हीलिंग इफेक्ट – ग्लिसरिनमध्ये अनेक गुणधर्म असतात जे पेशींच्या वाढीस मदत करतात. त्यामुळे, जर तुम्हाला त्वचेशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर ती दूर होऊ शकेल. रोज ग्लिसरीन क्रीमचा वापर केल्याने संक्रमित टिश्यूंची वाढ थांबते.

3) हानिकारक केमिकल्सपासून त्वचेचे रक्षण होते – ग्लिसरिन क्रीममध्ये असलेल्या नारळ तेलामुळे त्वचेवरील एपिडर्मल थर जाड होते. त्यामुळे हानिकारक केमिकल्स (रसायने) त्वचेच्या आतल्या थरापर्यंत पोचू शकत नाहीत व त्वचेचे संरक्षण होहोऊन त्वचा स्वस्थ राहते.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.