Vinod Kambli : चिंता वाढवणारी बातमी… विनोद कांबळीच्या मेंदूमध्ये क्लॉट, स्ट्रोकचाही धोका; ब्रेन क्लॉट आणि ट्यूमरमध्ये फरक काय?
विनोद कांबळी याचा आजार बऱ्याच चर्चेत आहे. त्याच्या मेंदूत क्लॉट असल्याचे समोर आले आहे. ब्रेन क्लॉटमुळे आणि ब्रेन ट्यूमर यांच्यात काय फरक आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. स्ट्रोक हा मेंदूतील रक्ताचा पुरवठा थांबल्याने होतो, तर ब्रेन ट्यूमर हा मेंदूतील पेशींच्या अनियंत्रित वाढीने होते. दोन्ही आजार धोकादायक असले तरी त्यांची लक्षणे आणि उपचार वेगळे असतात.
आपल्या आक्रमक फलंदाजीमुळे क्रिकेटप्रेमींच्या हृदयावर राज्य गाजवणारा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे. डॉ. विवेक त्रिवेदी हे विनोद कांबळीवर उपचार करत आहेत. डॉ. त्रिवेदी यांनी कांबळीबाबतची हेल्थ अपडेट दिली आहे. विनोद कांबळीच्या ब्रेनमध्ये ब्लड क्लॉट झाला आहे, अशी माहिती त्रिवेदी यांनी दिली. एक्सपर्ट्सच्या मतानुसार, ब्रेन क्लॉट झाल्याने स्ट्रोकचा धोका अधिक असतो. स्ट्रोक हा एक धोकादायक आजार आहे. अशा परिस्थितीच वेळेतच उपचार मिळायला हवेत.
जगभरात मृत्यू होण्याची जी तीन कारणे सांगितली जातात, त्यात स्ट्रोक हे तिसऱ्या क्रमांकाचं कारण आहे. यावरून स्ट्रोक किती धोकादायक आहे हे दिसून येतं. भारतात एकूण मृत्यूंपैकी 8 टक्के मृत्यू या स्ट्रोकमुळे होतात. इंडियन स्ट्रोक असोसिएशनने सांगितल्यानुसार, भारतात दरवर्षी सुमारे 12 ते 13 लाख लोकांना स्ट्रोक येतो.
स्ट्रोक हा एक मेंदूचा आजार आहे. त्याप्रमाणेच मेंदूचा आणखी एक आजार म्हणजेच ब्रेन ट्यूमर. दरवर्षी ब्रेन ट्यूमरची प्रकरणं वाढत आहेत. द लँसेटनुसार, भारतात दरवर्षी ब्रेन ट्यूमरच्या 28,000 हून अधिक केसेस समोर येतात. स्ट्रोक असो किंवा ब्रेन ट्यूमर, त्याच्या केसेस दरवर्षी वाढतच असतात. हे दोन्ही जीवघेणे आजार आहेत. पण ब्रेन ट्यूमर आणि स्ट्रोक यात खूपच फरक आहे. ते नेमकं काय ? जाणून घेऊया.
ब्रेन स्ट्रोक आणि ब्रेन ट्यूमर दोन्ही मेंदूशी संबंधित गंभीर आजार आहेत. हे दोन्ही आजार जीवघेणे आहेत. गेल्या काही वर्षात हे आजार वाढत आहेत. खाण्यापिण्याच्या सवयी, बिघडलेली जीवनशैली यामुळे हे आजार होत असतात. मात्र, ब्रेनमध्ये ब्लड क्लॉट आणि ब्रेन ट्यूमर होण्याची इतरही वेगळी कारणं आहेत. पण या दोन्ही आजारात बराच फरक आहे. बरंच अंतर आहे, असं दिल्लीचे न्यूरोसर्जन डॉ. मनिष कुमार यांनी सांगितलं.
ब्रेन क्लॉट आणि ट्यूमरमध्ये काय फरक?
मेंदूला ऑक्सिजनचा अपुरा पुरवठा झाला की ब्रेन स्ट्रोक येतो. ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या नसा फाटतात. यामुळे मेंदूच्या पेशी हळूहळू डॅमेज होतात. त्यामुळे त्या व्यक्तीला पक्षाघाताचा त्रास होऊ शकतो. या गंभीर प्रकरणात मृत्यूही होऊ शकतो. मेंदूत रक्ताच्या गाठी झाल्यावर म्हणजे ब्लड क्लॉट झाल्यावर स्ट्रोक येऊ शकतो. अनेकदा मेंदूत रक्ताच्या गाठी होणं हे सुद्धा स्ट्रोकचं एक कारण असतं.
स्ट्रोक अनेक प्रकारचे असतात. यात इस्कोमिक स्ट्रोक, हेमोरेजिक स्ट्रोक आणि ट्रान्सिएंट इस्केमिक अटॅक हे तिन्ही आजार धोकादायक आहेत. हे आजार झाल्यावर वेळेत उपचार नाही मिळाले तर मृत्यू होऊ शकतो. जर एखाद्या व्यक्तीला अचानक चक्कर येत असेल, त्याचा बॅलन्स जात असेल, चेहऱ्याची एक बाजू कंप पावत असेल, इत्यादी लक्षणं दिसत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ही सर्व स्ट्रोकची लक्षणे आहेत.
ब्रेन ट्यूमर म्हणजे काय ?
ब्रेन ट्यूमरमध्ये मेंदूच्या पेशी अनियंत्रित पद्धतीने वाढत असतात. त्या हळूहळू चांगल्या आणि निरोगी पेशींना दाबून टाकतात. त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रभाव टाकतात. ब्रेन ट्यूमर दोन प्रकारचे असतात. एक कॅन्सरवाला तर दुसरा विना कॅन्सरवाला. याला बेनाइन आणि मॅलिग्नेंट ट्यूमर म्हटलं जातं. बेनाइन ट्यूमर हळूहळू वाढतो. तो मेंदूच्या चांगल्या पेशींना इजा करत नाही. मॅलिग्नेंट ट्यूमर वेगाने वाढतो आणि चांगल्या पेशींंचही नुकसान करतो.
ब्रेन स्ट्रोकची लक्षणं अचानक दिसू लागतात. ते गंभीर असतात. तर ब्रेन ट्यूमरची लक्षणं हळूहळू विकसित होतात. ब्रेन ट्यूमरमुळे कॅन्सर होऊ शकतो. पण स्ट्रोकमुळे कॅन्सर होत नाही. ब्रेन स्ट्रोक झाल्यावर औषधाने किंवा सर्जरी करून त्याचा इलाज होऊ शकतो. पण ब्रेन ट्यूमरमध्ये सर्जरी, कीमोथेरपी आणि रेडियोथेरपी करावी लागते. ट्यूमर कॅन्सरवाला आहे की नाही यावरही बरंच अवलंबून असतं. तुम्हाला जर वारंवार डोकेदुखीचा त्रास होत असेल, उलट्या होत असतील, झटके येत असतील तर ही लक्षणे दुर्लक्षित करू नका.
ब्रेन ट्यूमर आणि स्ट्रोकपासून संरक्षण कसं मिळवायचं?
ताजी फळं, भाज्या आणि विविध धान्य खा
नियमित व्यायाम करा
धूम्रपान करू नका
अल्कोहलचं सेवन करू नका
ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवा
सतत डोकेदुखी होत असेल तर उपचार घ्या
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)