शरीरात वाढेल विटामिन्स डीचे प्रमाण, रोज सकाळी नाश्त्यात याचा समावेश करा
विटामिन्स डीची कमतरता पूर्ण करण्यासाठी नमूद अन्नपदार्थांचा आपल्या नाश्त्यात समावेश करावाच शिवाय नियमित सकाळच्या कोवळ्या उन्हात चालायला गेल्याने विटामिन्स डीची कमतरता पूर्ण होण्यास मदत मिळेल.
व्हिटामिन्स डी आपल्या शरीराला खूपच आवश्यक असते. हे व्हिटामिन्स आपल्या हाडांना मजबूत बनवतेच शिवाय आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढविते. शरीरात व्हिटामिन्स डीची कमतरता झाल्यास कमजोरी, थकवा आणि हाडांमध्ये दुखणे सारख्या समस्या सुरु होतात. अनेकदा काही जण व्हिटामिन्स डीची कमतरता पूर्ण करण्यासाठी सप्लीमेंट्सची मदत घेतात. परंतू काही नैसर्गिक अन्नपदार्थांच्या मदतीने आपण आपल्या शरीरातील व्हिटामिन्स डीची कमतरता कमी करु शकतो. तर यासाठी रोज नाश्त्यात काय खावे ते पाहूयात..
विटामिन्स डी साठी सर्वात सोपा पर्याय म्हणजे कोवळ्या उन्हात फिरायला जाणे. रोज सकाळी दहा ते पंधरा मिनिटे कोवळ्या उन्हात चालल्याने ही कमतरता दूर होऊ शकते. तसेच सकाळच्या न्याहारीत काही अन्नपदार्थांचा समावेश केल्यास देखील विटामिन्स डीची कमतरता दूर होते. चला तर पाहूयात कोणते आहेत ते पदार्थ ते पाहूयात…
1.अंडी –
अंडे हे विटामिन्स डी मिळण्याचे चांगले सोर्स आहे.खास करुन याचा बलक महत्वाचे असते. उकडलेले अंडे किंवा अंड्याचे ऑम्लेट खाल्याने शरीरात विटामिन्स डी ची कमी भरुन निघू शकते. अंड्यात प्रोटीन देखील भरपूर असते. त्यामुळे सकाळी नाश्त्यात अंडी खाण्याचे फायदे खूप असतात.
2.मशरुम –
मशरुम ही वनस्पती डी जीवनसत्वाच्या कमतरतेवर खूपच प्रभावशाली आहे. खास करुन उन्हात वाळवलेले मशरुम फायदेशीर असतो. यामुळे डी जीवनसत्वाचे प्रमाण वाढते. नाश्त्यात याला सलाड किंवा सूप म्हणून खाऊ शकता.
3.फोर्टिफाईड दूध आणि तृणधान्य
बाजारात अशाप्रकारचे फोर्टिफाइड दूध आणि तृणधान्ये देखील नाश्यात खाल्ल्यास याचा फायदा होतो. रोज नाश्त्यात एक ग्लास फोर्टीफाईड दूध किंवा एक वाटीभर तृणधान्य घेतल्यास डी जीवनसत्वाची कमतरता दूर होण्यास मदत होते.
4. फॅटी फिश –
फॅटी फिश उदाहरणार्थ साल्मन, टुना, आणि बांगडा यात माशात डी जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते. अर्थात हा मासांहारी पर्याय आहे. तुम्ही मांसाहारी असाल तर हा पर्याय तुमच्यासाठी डी जीवनसत्व वाढविण्यासाठी चांगला आहे.
5.ऑरेंज ज्यूस –
काही ब्रॅंडचे ज्युस विटामिन्स डीने फोर्टीफाईड केलेले असते. नाश्त्यात याचा समावेश केल्यास दिवसाची हेल्थी सुरुवात होऊ शकते. आणि विटामिन्स डीची कमी देखील भरुन निघू शकते.
6.दही –
फोर्टीफाईड दही देखील विटामिन्स डीचा चांगला स्रोत आहे. याला नाश्त्यात फळं किंवा नट्स सोबत खाता येते.यामुळे डी जीवनसत्व देखील मिळेल आणि पचनक्रिया देखील सुधारण्यास मदत मिळेल.
7.ओटमील –
काही ब्रॅंडचे ओटमील देखील विटामिन्स डी ने फोर्टीफाईड केलेले मिळते. नाश्त्यात ओटमील खाल्ल्याने डी जीवनसत्व तर मिळतील शिवाय यातील फायबरमुळे पचन क्रिया देखील चांगली होण्यास मदत मिळेल.
विटामिन्स डी च्या कमतरतेची लक्षणे –
स्नायूंत दुखणे
थकवा जाणवणे
हाडे दुखणे
वारंवार आजारी पडणे
( सूचना – ही माहीती सर्वसामान्य ज्ञानावर आधारीत आहे. योग्य माहीतीसाठी तुमच्या डॉक्टरांशी किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा )