Sleep Related Problems: रात्री मध्येच होते झोपमोड ? हे असू शकते आजाराचे कारण

दररोज रात्री 2-3 वाजता झोपेतून जाग येत असेल तर ही झोप न येण्याची समस्या असू शकते. यामुळे भविष्यात अनेक आजार होऊ शकतात.

Sleep Related Problems: रात्री मध्येच होते झोपमोड ? हे असू शकते आजाराचे कारण
Follow us
| Updated on: Dec 12, 2022 | 1:55 PM

नवी दिल्ली – क्वचित कधीतरी रात्री झोपेतून अचानक जाग येणे (waking up from sleep) हे सामान्य असते. बऱ्याच वेळेस आपल्याला तहान लागते किंवा लघवीला जायचे असते तेव्हा झोपेतून जाग येऊ शकते. किंवा एखादं वाईट स्वप्न पडल्यास अथवा झोपतानाची स्थिती योग्य नसेल तर या कारणामुळेही झोपमोड (sleep problem) होऊ शकते. मात्र जर तुम्हाला रोज रात्री झोपेतून जाग येत असेल तर या समस्येकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, मध्यरात्री 1 ते 3 च्या दरम्यान जाग येत असेल आणि पुन्हा झोप लागण्यात अडचण येत असेल तर हे अनेक कारणांमुळे होऊ शकते. दररोज रात्री झोपमोड होणे यामागे ताण-तणाव (stress) किंवा लिव्हर खराब होणे, हेही कारण असू शकते.

स्लीप सायकल म्हणजे काय ?

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, दररोज रात्री आपलं शरीर स्लीप सायकल म्हणजे झोपेच्या चक्रांमधून जाते. त्याअनुसार, रात्री अनेक वेळा तुम्ही जागे होऊ शकता, मात्र त्यानंतर तुम्हाला लगेच झोपही येते, हे नॉर्मल आहे. तुमची 7 ते 9 तासांची झोप ही स्लीप सायकलप्रमाणे असते. हे स्लीप सायकल नक्की कसे असते ते जाणून घेऊया…

हे सुद्धा वाचा

– तुम्ही जेव्हा झोपायला जाता, तेव्हा हळू-हळू झोप येते.

– सुरूवातीची आपली झोप ही सावध असते.

– थोड्या वेळातच आपल्याला गाढ झोप लागते.

– त्यानंतर असते REM (rapid eye movement) झोप, म्हणजे अशा झोपेदरम्यान तुम्हाला स्वप्न दिसते

रात्री झोपेतून जाग का येते ?

झोपेतून जाग येण्याची अनेक कारणे असू शकतात, ज्यामुळे आरोग्याशी संबंधित इतर समस्या उद्भवू शकतात.

वाढते वय

आपल्या झोपेवर वयाचा मोठा प्रभाव पडतो. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, जसे आपले वय वाढते, त्याप्रमाणे झोपेच्या चक्रातही बदल होत जातात. हे सहसा औषधांमुळे होते, कारण त्याचा आपल्या शरीरावर अनेक प्रकारे परिणाम होतो. यामुळे झोपेची गुणवत्ता तर खराब होतेच, पण सकाळी उठण्याची आणि झोपण्याची वेळही बदलते. रात्रीही अनेक वेळा झोपेतून जाग येते.

ताण

जर तुम्ही सतत तणावात असाल तर तुम्हाला रात्री मध्येच दचकून जाग येऊ शकते. यामुळे तुमच्या रक्तदाबाच्या पातळीतही बदल होऊ शकतात तसेच हृदयाचे ठोकेही वाढतात. तणाव आणि अस्वस्थपणा वाढला तर शरीराच्या अनेक अवयवावर परिणाम होण्यास सुरूवात होते.

औषधांचा दुष्परिणाम

जे लोक बऱ्याच काळापासून विविध आजारांसाठी औषधांचे सेवन करत असतात, त्यांना चांगली व गाढ झोप लागण्यात त्रास होऊ शकतो. सर्दी- खोकला, अँटी-डिप्रेसेंट्स यासारख्या औषधांमुळे झोपेवरही परिणाम होऊ शकतो.

त्याशिवाय स्लीप ॲपनिया, गॅस्ट्रिक त्रास , आर्थ्रायटिस, नैराश्य, न्यूरोपॅथी, मेनोपॉज , अतिसक्रिय थायरॉइड ग्रंथी यामुळेही झोपमोड होऊ शकते.

रात्री झोपमोड होण्याचे हेही असू शकते कारण ?

जर रात्री 1 ते 3 दरम्यान तुम्हाला झोपेतून जाग येत असेल तर त्यामागे वेगळे कारणही असू शकते. तुमच्या लिव्हरचे कार्य सुरळीतपणे सुरू नसेल तरीही असे होऊ शकते. लिव्हरचे कार्य नीट सुरू नसेल तर त्यामुळे रक्तप्रवाहही नीट होत नाही आणि समस्या निर्माण होऊ शकते. त्यापैकीच एक समस्या म्हणजे झोपेत होणारा बिघाड. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, तणावाचा सर्वात जास्त परिणाम आपल्या लिव्हरवर होतो. त्यामुळे जेव्हा झोप येत नाही तेव्हा आपल्याला ताण जाणवतो, चिडचिड होते आणि अस्वस्थ वाटते.

( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.