Health : चालणं की जॉगिंग, वजन कमी करण्यासाठी काय आहे उत्तम? जाणून घ्या!
अनेक कारणांमुळे लोकांमध्ये लठ्ठपणाची समस्या निर्माण होताना दिसते. मग लठ्ठपणा कमी करण्यासाठी लोक अनेक वेगवेगळे उपाय करतात. लठ्ठपणा कमी करण्यासाठी जॉगिंग आणि चालणं सुरू करतात मात्र नेमका कोणत व्यायाम बेस्ट आहे ते जाणू घ्या.
मुंबई : सध्याच्या धावपळीच्या जीवनात लोक स्वतःकडे जास्त लक्ष देत नाहीत. तसंच बहुतेक लोकांचं काम हे डेस्कवर म्हणजे एका जागी बसून असतं, तर भरपूर लोक हे फास्टफूडवर मोठ्या प्रमाणात ताव मारताना दिसतात. अशा अनेक कारणांमुळे लोकांमध्ये लठ्ठपणाची समस्या निर्माण होताना दिसते. मग लठ्ठपणा कमी करण्यासाठी लोक अनेक वेगवेगळे उपाय करतात.
जीमला जाणं, व्यायाम करणं, डाएट करणं, जॉगिंगला जाणे असे अनेक उपाय ते करत असतात. यामध्ये बरेच लोक लठ्ठपणा कमी करण्यासाठी दररोज जॉगिंगला जाणे किंवा चालायला जाणं हा उपाय करतात. पण लठ्ठपणा कमी करण्यासाठी जॉगिंग फायदेशीर आहे की चालायला जाणे याबाबत तुम्हाला माहितीये का? तर आपण आता याबाबत जाणून घेणार आहोत.
जॉगिंग आणि फास्ट चालण्यामधील फरक?
फास्ट चालल्यामुळे व्यक्ती एका मिनिटात 100 पावलं चालू शकतो तर जॉगिंगमध्ये एक व्यक्ती 15 सेकंदच्या आत 40 ते 45 पावलं चालू शकतो. तसंच फास्ट चालल्यामुळे आपल्याला दम लागतो पण हळू चालण्याच्या तुलनेत फास्ट चालल्यामुळे आपल्या शरीरातील चरबी बर्न होण्यास मदत होते.
फास्ट चालणे आणि जॉगिंग करणे यांच्यात तुलना करायची झाल्यास फास्ट चालण्यापेक्षा जॉगिंग केल्यामुळे आपली चरबी लवकर बर्न होते. पण फास्ट चालल्यामुळे देखील आपल्याला लठ्ठपणा कमी करण्यास मदत होते. ज्यांना गुडघेदुखी आहे किंवा आधीच एखादी जुनी जखम आहे अशा लोकांसाठी फास्ट चालणे खूप फायदेशीर आहे. तसंच स्लो जॉगिंगही कॅलरीज बर्न करण्यास मदत करतात.
दरम्यान, कोणताही व्यायाम म्हणजे ज्यामध्ये शरीराराची हालचाल होईल तो उत्तमच मात्र जॉगिंग आणि चालण्यामध्ये ज्याला जो शक्य होईल करावा.