Diabetes problem : मधुमेहापासून मुक्त होऊ इच्छिता? ही युक्ती तुमच्यासाठी ठेरल उपयोगी ICMR ने सांगितले मधुमेह नियंत्रणाचे 55-20 मंत्र, आजच बदला तुमचे डाएट

भारतात मधुमेहाची समस्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च इंडिया डायबिटीजच्या ताज्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, मधुमेह आणि प्री-डायबिटीसच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही 50 ते 55 टक्के कमी कार्बोहायड्रेट आणि 20 टक्के प्रोटिन जास्त सेवन करावे.

Diabetes problem : मधुमेहापासून मुक्त होऊ इच्छिता? ही युक्ती तुमच्यासाठी ठेरल उपयोगी ICMR ने सांगितले मधुमेह नियंत्रणाचे 55-20 मंत्र, आजच बदला तुमचे डाएट
प्रातिनिधिक छायाचित्र Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 03, 2022 | 8:34 PM

मुंबई :  मधुमेहाची समस्या झपाट्याने वाढत आहे. जेव्हा रक्तातील ग्लुकोजची पातळी (Glucose level) खूप वाढते तेव्हा मधुमेहाची समस्या उद्भवते. हे संतुलित राखण्यासाठी, स्वादुपिंडातून इन्सुलिन नावाचे हार्मोन स्त्रवते. इन्सुलिन ग्लुकोज राखण्याचे काम करते. पण जेव्हा स्वादुपिंडातून इन्सुलिन योग्य प्रकारे (स्त्रवत नाही)सोडले जात नाही, तेव्हा मधुमेहाच्या समस्येला सामोरे जावे लागते. मधुमेहाचे टाइप-१ आणि टाइप-२ असे दोन प्रकार आहेत. टाइप-1 मधुमेहामध्ये, स्वादुपिंड इन्सुलिन (Pancreatic insulin) अजिबात तयार करू शकत नाही. त्याच वेळी, टाइप-2 मधुमेहामध्ये, स्वादुपिंड अत्यंत कमी प्रमाणात इन्सुलिन तयार करते. मधुमेहापूर्वीच्या स्थितीला प्री-डायबेटिक (Pre-diabetic) म्हणतात. मधुमेहावरील सर्वात मोठ्या अभ्यासानुसार, जर तुम्ही प्री-डायबेटिक असाल, तर चपाती आणि भात खाऊ नका आणि प्रोटिनचे सेवन वाढवा. अशा प्रकारे तुम्ही टाइप-2 मधुमेहाच्या धोक्यातून मुक्त होऊ शकता.

काय आढळले अभ्यासात

अभ्यासात असे सुचवण्यात आले आहे की, आहारातील एकूण ऊर्जेच्या कर्बोदकांमधे 50 ते 55 टक्के कमी करून आणि प्रथिनांचे प्रमाण 20 टक्क्यांनी वाढवून मधुमेह आणि पूर्व-मधुमेहाची समस्या टाळता येऊ शकते. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च इंडिया डायबेटिसचा हा नवीनतम अभ्यास १८,०९० व्यक्तींच्या आहारात समाविष्ट असलेल्या पोषक तत्त्वांच्या विश्लेषणावर आधारित आहे.

डाएटिंग हे सर्वोत्तम औषध आहे

भारतात मधुमेहाची समस्या झपाट्याने वाढत आहे. सध्या भारतात एकूण ७४ दशलक्ष लोक मधुमेहाच्या समस्येने त्रस्त आहेत. त्याच वेळी 8 कोटी लोक प्री-डायबेटिस आहेत. तसेच, लोक प्री-डायबिटीसपासून डायबेटिसमध्ये झपाट्याने रूपांतरित होत आहेत. अभ्यासाचे लेखक डॉ. व्ही मोहन म्हणाले, असा अंदाज आहे की, वर्ष-2045 मध्ये भारतात मधुमेहाचे एकूण 135 दशलक्ष रुग्ण असतील. याचा अर्थ येत्या 20 वर्षांत मधुमेही रुग्णांची संख्या दुप्पट होईल. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे जास्त कार्बोहायड्रेटयुक्त आहार घेणे.

ते म्हणाले, आपल्या एकूण उष्मांकांपैकी सुमारे 60 ते 75 टक्के कॅलरी कार्बोहायड्रेट्सच्या स्वरूपात असते आणि फक्त 10 टक्के प्रोटीन असते. पांढऱ्या तांदळाचे जास्त सेवन केल्याने मधुमेहाचा धोका वाढतो हे आम्ही यापूर्वी अनेक अभ्यासांतून सिद्ध केले आहे. गहू सुद्धा तितकाच वाईट आहे. आता जर एखाद्या व्यक्तीने कार्बोहायड्रेटचे प्रमाण 50 ते 55 टक्क्यांनी कमी केले आणि प्रोटीनचे प्रमाण 20 टक्क्यांनी वाढवले तर मधुमेहाच्या समस्येपासून मुक्ती मिळू शकते.

मधुमेहापासून मुक्त होण्यासाठी अन्नाचे प्रमाण

मधुमेहापासून मुक्ती मिळवण्यासाठी कार्बोहायड्रेट ते अन्नाचे प्रमाण ४९ ते ५४ टक्के, प्रथिने १९ ते २० टक्के, चरबी २१ ते २६ टक्के आणि आहारातील फायबर ५ ते ६ टक्के असावे. प्रभावी परिणाम मिळविण्यासाठी, स्त्रियांनी पुरुषांच्या तुलनेत त्यांचे कार्बोहायड्रेट सेवन दोन टक्क्यांनी कमी केले पाहिजे. त्याचप्रमाणे वृद्धांनी कार्बोहायड्रेटचे सेवन 1 टक्के आणि प्रथिनांचे सेवन तरुणांच्या तुलनेत 1 टक्क्यांनी कमी करावे.

त्याचबरोबर प्री-डायबिटीजच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी कर्बोदके 50 ते 56 टक्के, प्रथिने 10 ते 20 टक्के, फॅट 21 ते 27 टक्के आणि आहारातील फायबर 3 ते 5 टक्के असावे. त्याचबरोबर, अभ्यासात असे सुचवण्यात आले आहे की, जे लोक शारीरिकदृष्ट्या सक्रिय नाहीत त्यांनी सक्रिय लोकांपेक्षा 4 टक्के कमी कार्बोहायड्रेट्सचे सेवन करावे.

आदर्श अन्न थाळी कशी हवी

आयडियल फूड प्लेट अर्थात आदर्श अन्नाची थाळी कशी असावी? डॉ.मोहन म्हणाले, तुमच्या ताटातील अर्धी जागा भाज्यांसाठी असावी, त्यात हिरव्या भाज्या, कडधान्य, कोबी, फ्लॉवरचा समावेश करावा. लक्षात ठेवा की बटाट्यासारख्या जास्त पिष्टमय पदार्थांचा समावेश करू नका. प्लेटच्या इतर भागात मासे, चिकन आणि सोया सारख्या प्रथिने समाविष्ट करा. त्यासोबतच ताटात थोडा भात आणि दोन चपात्या ठेवाव्यात.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.