वजन कमी करायचंय?, तर ‘या’ पदार्थांसोबत करा कोरफडीचे सेवन
असे म्हणतात की वाढलेले वजन (Weight gain) अनेक आजारांना (Illness) निमंत्रण देते. त्यामुळे अनेक जण आपले वजन वाढूनच नये यासाठी प्रयत्न करतात, तर काही जण आपले वाढलेले वजन कमी कसे करता येईल या विचारात असतात. वजन कमी करण्यासाठी कोरफडीकडे एक उत्तम घरगुती उपाय म्हणून पाहिले जाते.
Health tips : असे म्हणतात की वाढलेले वजन (Weight gain) अनेक आजारांना (Illness) निमंत्रण देते. त्यामुळे अनेक जण आपले वजन वाढूनच नये यासाठी प्रयत्न करतात, तर काही जण आपले वाढलेले वजन कमी कसे करता येईल या विचारात असतात. वजन कमी (Weight loss)करण्यासाठी अनेक जण आपल्या आहारात बदल करतात, डॉक्टरांनी सुचवलेल्या विविध औषधांचा आधार घेतात. तुम्ही जर यापैकीच एक असला तर तुम्हाला हे माहित आहे का? की वजन कमी करण्यासाठी तुम्ही ज्या औषधांचे सेवन करतात त्यामुळे तुमचे वजन तर कमी होते, मात्र अशा औषधांचे दीर्घकाळ सेवन केल्याने त्याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अशा औषधांचे अतिरिक्त सेवन न करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. या औषधांऐवजी तुम्ही वजन कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय देखील ट्राय करू शकता. यामुळे भलेही तुमचे वजन उशिराने कमी होईल मात्र हे उपाय पूर्णपणे सुरक्षीत असतात. अशा पदार्थांच्या दीर्घकाळ सेवनाचे तुमच्या आरोग्यावर परिणाम होत नाहीत. आज आपण वजन कमी करण्यासाठी कोरफड कशी उपयुक्त आहे? याची माहिती घेणार आहोत.
लिंबू आणि कोरफड
वजन कमी करण्यासाठी कोरफड आणि लिंबू हे दोनही पदार्थ उत्तम मानले जातात. डॉक्टरांकडून देखील वजन कमी करण्यासाठी लिंबू आणि कोरफडीच्या सेवनाचा सल्ला दिला जातो. कोरफडीचे ज्यूस तयार करा, त्यामध्ये एक अर्ध्या लिंबाचा रस मिसळवा हे मिश्रण रोज सकाळी व्यायाम केल्यानंतर अर्ध्या तासाने सेवन करा, याचे नियमित सेवन केल्यास तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल.
कोरफड आणि गरम पाणी
गरम पाणी पिल्यामुळे शरीरातील अनेक समस्या दूर होतात. तुम्ही जर दररोज एक ग्लास गरम पाणी पिले तर तुमच्या शरीरातील अतिरिक्त फॅट बर्न होण्यास मदत होते. मात्र गरम पाण्यात जर कोरफडीचे ज्यूस मिसळून ते पाणी पिल्यास आणखी फरक पडतो. तुमचे वजन कमी होण्यास मदत होते.
खाण्यापूर्वी कोरफडीचे सेवन
खाण्यापूर्वी कोरफडीच्या सेवनाचे अनेक फायदे आहेत. खाण्यापूर्वी वीस मिनिटे अधी कोरफडीचे सेवन करावे. खाण्यापूर्वी कोरफडीचे सेवन केल्यास तुमचे वजन तर कमी होतेच, सोबतच तुमची पचनशक्ती देखील सुधारते. पचनशक्ती मजबूत बनल्याने तुमचा अनेक आजारांपासून बचाव होतो.
भाज्यांसोबत कोरफडीचे सेवन
कोरफडीचा नुसता रस पिल्याने देखील तुमचे वजन कमी होते. मात्र कोरफड ही अत्यंत कडू असल्याने तिचा नुसता रस पिणे शक्य होत नाही. अशावेळी तुम्ही विविध भाज्यांच्या रसामध्ये कोरफडीचा रस मिसळून तुम्ही कोरफडीच्या रसाचे सेवन करू शकता. विशेष: गाजराच्या रसात कोरफडीचा रस मिसळून त्याचे सेवन केल्यास ते अधिक फायदेशीर ठरते.
टीप : वरील माहिती ही केवळ सामान्य ज्ञासाठी देण्यात आली असून, कोणतेही औषधोपचार सूरू करण्यापूर्वी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा.
संबंधित बातम्या
घरातील कामं केल्याने कोरड्या झालेल्या हाताना बनवा कोमल – मुलायम , फॉलो करा या काही टीप्स!
Health care | नेहमी अंडी खाताय?, अतिरेक झाल्यावर होऊ शकतो जीवघेणा गंभीर आजार!
Skin care : ब्लीचिंग करण्यापूर्वी ‘या’ अत्यंत महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा!