पन्नाशी नंतरही हाडे मजबूत राहण्यासाठी कसलाही विलंब न करता फॉलो करा या टिप्स
निरोगी हाडांसाठी आपल्या जीवनशैलीत काही बदल करणे महत्वाचे आहेत. कारण याचा आपल्या शरीरावर फरक पडत असतो. जर तुमच्या हाडांचे आरोग्य मजबूत असेल तर तुम्हाला कोणत्याच समस्यांना सामोरे जावे लागत नाही. तसेच योग्य आहार आणि काही सवयी बदल्या तर हाडांशी संबंधित समस्या टाळण्यास मदत होते.
आपलं शरीर हे तरुणपणातच नाही तर पन्नाशी नंतर सुद्धा फिट राहावे असे प्रत्येकाला वाटतं असते. यासाठी प्रत्येकजण आपापल्या आहारात पोषक आहारांचा समावेश करत असतो. त्याचबरोबर वाढत्या वयाबरोबर हाडे कमकुवत होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, ती थांबवता येत नाही. तसेच आपण दीर्घायुष्य जगण्यासाठी हेल्दी राहणे फार महत्त्वाचं आहे. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीने वयाची 30 वर्षे पूर्ण होण्याआधीच उपाययोजना सुरू केल्या पाहिजेत. कारण या वयापर्यंत हाडांमध्ये मास तयार होते, जे हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असते. पण जर तुम्ही वयाची ४०-५० वर्षे गाठली असाल तर हाडांचे आरोग्य तंदुरुस्त राहण्यासाठी तुम्ही हे उपाय करून पहा.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या मते, महिला आणि पुरुषांना वयाच्या 50 व्या वर्षापर्यंत दररोज 1000 मिलीग्राम कॅल्शियमची आवश्यकता असते. तर 50-70 वयोगटातील महिलांना 1200 मिलीग्राम कॅल्शियमची गरज असते. अशा तऱ्हेने वाढत्या वयानुसार तुमच्या शरीरातील हाडे मजबूत ठेवायची असतील तर आतापासूनच आहारात भरपूर कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश करायला सुरुवात करा.
व्हिटॅमिन डीच्या प्रमाणात काळजी घ्या
आपल्या शरीरातील हाडांच्या आरोग्यासाठी कॅल्शियम जितके महत्वाचे आहेत तितकेच व्हिटॅमिन डी देखील खूप महत्वाचे आहे. तसं बघायला गेलं तर आपल्या हाडांच्या मजबुतीसाठी सूर्यप्रकाश हेच मुख्य स्त्रोत आहे, परंतु हाडांच्या रोजच्या कॅल्शियमकरिता तुम्ही घरगुती उपाय करा. यात तुम्ही तुमच्या आहारात अंड्यातील पिवळ बलक, दुग्धजन्य पदार्थ, फॅक्टयुक्त मासे यासारख्या पदार्थांचे सेवन करू शकता. दररोज 600-800 आंतरराष्ट्रीय युनिट्सची मात्रा समतोल राखण्याचा प्रयत्न करा.
व्यायाम महत्वाचा आहे
आरोग्यासोबत हाडांच्या मजबुतीसाठी सुद्धा व्यायाम करणे महत्वाचे आहे. यासाठी चालणे आणि वजन उचलणे यासारखे व्यायाम हाडांसाठी सर्वोत्तम मानले जातात. कारण यामुळे हाडांच्या कमकुवत होण्याची प्रक्रिया मंदावते. हाडे निरोगी ठेवायची असतील तर सतत काम करणं खूप गरजेचं आहे. जेवढं तुम्ही ॲक्टिव्ह असेल तेवढं जास्त काळ तुम्हाला हाडांच्या कमकुवत होण्याच्या समस्येला सामोरं जावं लागणार नाही.
धूम्रपानापासून दूर रहा
तुम्ही जर नेहमी धूम्रपान करत असाल तर तुमच्या आरोग्यासाठी व हाडांसाठी खूप धोक्याचं आहे. धूम्रपान केल्याने हाडे ठिसूळ होण्याची प्रक्रिया खूप वेगवान होते. हेच कारण आहे की आजच्या काळात लोकं तसेच तरुणवर्ग सुद्धा हाडांच्या दुखण्याने व धोकादायक आजारांनी त्रस्त आहेत. त्यामुळे धूम्रपान पूर्णपणे टाळणे गरजेचे आहे. यासोबतच अल्कोहोलच्या सेवनावर ही नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे.
वजन नियंत्रणात ठेवा
आपल्याला अधिकतर आजार आपल्या वाढत्या वजनाने होत असतात. कारण वयानुसार तुमचे वजन कमी असेल तर तुम्हाला फ्रॅक्चर होणाच्या समस्या आणि हाडांच्या नुकसानीच्या समस्येला सामोरे जावे लागेल. दुसरीकडे, जर आपले वजन जास्त असेल तर तुम्हाला अतिवजनाच्या मानाने सांध्यामध्ये फ्रॅक्चरची समस्या देखील होऊ शकते. त्यामुळे तुमच्या वजनावर लक्ष ठेवा.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)