Wearing Sweater At Night is Dangerous: तुम्हीही रात्री स्वेटर घालून झोपता का ? झोपेतच व्हाल या आजाराचे शिकार

अनेक लोक थंडीपासून बचाव करण्यासाठी रात्री स्वेटर घालूनच झोपतात. यामुळे उबदार वाटेल व शरीराचा फायदा होईल असं त्यांना वाटतं. पण रात्री झोपताना स्वेटर घातल्याने नुकसान होऊ शकतं.

Wearing Sweater At Night is Dangerous:  तुम्हीही रात्री स्वेटर घालून झोपता का ? झोपेतच व्हाल या आजाराचे शिकार
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Jan 10, 2023 | 4:35 PM

नवी दिल्ली – उत्तर भारतात घसरलेल्या तापमानामुळे थंडी (cold) शिगेला पोहोचली आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी लोक अनेक उबदार कपड्यांचे थरावर थर (warm clothes)घालून घराबाहेर पडत आहेत. थंडी टाळण्यासाठी काही लोक रात्रीही उबदार कपडे घालून झोपतात. पण रात्री गरम कपडे घालून झोपणे आरोग्यासाठी हानिकारक (wearing warm clothes while sleeping) ठरू शकते. रात्री गरम कपडे परिधान केल्याने रक्ताभिसरण तर मंदावतेच पण त्वचेशी संबंधित आजारही होतात. रात्री स्वेटर घालून का झोपू नये, हे जाणून घेऊया.

त्वचेची समस्या उद्भवू शकते

रात्री झोपताना गरम कपडे घातल्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. रात्री गरम कपडे अथवा स्वेटर घालून झोपल्याने शरीरातील ओलावा कमी होतो, त्यामुळे तुम्हाला एक्झिमा किंवा खाज सुटणे असा त्रास सहन करावा लागू शकतो. त्याव्यतिरिक्त रात्री मोजे घालून झोपल्याने बॅक्टेरिअल इन्फेक्शनही होऊ शकते.

हे सुद्धा वाचा

ब्लड प्रेशर वाढते

रात्री स्वेटर किंवा अन्य उबदार कपडे घालून झोपल्याने रक्तदाबही वाढतो. रात्रीच्या वेळी स्वेटर किंवा उबदार कपड्यांमुळे घाम येऊ शकतो, ज्याचा थेट परिणाम रक्तदाबावर होतो. अशा परिस्थितीत रात्री साधे कपडे घालून झोपण्याचा सल्ला दिला जातो.

हवा खेळती रहात नाही

थंडीपासून बचाव करण्यासाठी आपण सहसा स्वेटर किंवा उबदार कपडे वापरतो. कधी कधी अती थंडीमुळे काही लोक रात्रीच्या वेळीही स्वेटर घालून झोपतात, पण स्वेटरमुळे शरीरातील हवेचा दाब कमी होतो, त्यामुळे शरीराचे तापमान वाढते. जर आपण जास्त वेळ स्वेटर किंवा उबदार कपडे घालून झोपलो तर हृदयाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.

इतर गरम कपड्यांमुळेही होते नुकसान

थंडी टाळण्यासाठी रात्रीही स्वेटर घालूनच झोपल्याने उबदार कपड्यांचे तंतूही कमजोर होतात. तंतूंच्या कमकुवतपणामुळे कपड्यांचा टिकाऊपणा कमी होतो. रात्रीच्या वेळी थंडी टाळण्यासाठी ब्लँकेट किंवा रजाई वापरणे चांगले. तरीही तुम्हाला उबदार कपडे घालून झोपायचे असेल तर झोपण्यापूर्वी त्वचेवर मॉयश्चरायझर लावावे आणि हलका स्वेटर घालून झोपा.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.