दिवाळीच्या फराळामुळे वजन वाढले आहे? मग या सोप्या उपायांनी करा कमी
दिवाळीच्या दिवसात फराळ करून वजन वाढले आहे? मग या सोप्या उपायांनी तुम्ही वजन कमी करू शकता.
मुंबई, सध्या दिवाळीचा सण सुरु आहे. दिवाळी म्हंटलं की, फराळ हा आलाच. तुम्हाला देखील नातेवाईकांनी आग्रहाने फराळ खाऊ घातला असेल तर नक्कीच वजन देखील वाढले असेल. वाढललेले वजन कमी करण्यासाठी (Weight Loss) काही जण व्यायाम करतात तर काही फिरायला जातात. अनेक जण डायटिंग (Diet) करून वजन नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करतात, मात्र बऱ्याचदा योग्य तो परिणाम मिळत नाही. असावेळी आहारात काही विशेष गोष्टींचा समावेश करणे आवश्यक आहे.
- हळद: वजन कमी करण्यासाठी हळदीचे सेवन करणे फायदेशीर आहे. हळदीमुळे पचनसंस्था मजबूत होते. तसेच पोटाची चरबी देखील कमी होते. याशिवाय हळद रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. वजन कमी करण्यासाठी आहारात हळदीचा अवश्य वापर करावा.
- पेरू: वजन कमी करायचे असेल तर पेरू खायला सुरुवात करा. पेरू केवळ वजन कमी करण्यास मदत करत नाही तर पचनसंस्था देखील मजबूत करते.
- रताळे: रताळ्यामध्ये व्हिटॅमिन ए, बी, सी, मॅंगनीज आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. त्यात फायबर असते, त्यामुळे जास्त वेळ भूक लागत नाही. वजन कमी करण्यासाठी रताळ्यांचा आहारात समावेश करावा.
याशिवाय काही व्यायाम देखील तुम्ही करू शकता
- सायकलिंग करणे: सायकलिंग करणे हा देखील एक महत्वाचा व्यायाम ( Exercise For Weight Loss) आहे जो आपले शरीर तंदुरुस्त ठेवण्यास मदत करतो आणि वजन कमी करण्यास मदत करतो. सायकल चालवणे हे मुळात घराबाहेर केला जाणारा व्यायाम आहे. परंतु जर आपणास सायकल चालवता येत नसेल तर आपण स्तिर सायकल चा देखील वापर करू शकता ज्यामुळे तुम्हाला घरामध्ये राहून सायकल चालवण्याचे फायदे मिळतील.
- पायऱ्या चढणे: आपण कितीही तंदुरुस्त असलो तरीही पायऱ्या चढणे हे आपल्यासाठी आव्हानात्मक असते. कारण ज्या प्रमाणे पायऱ्यांची बनवत असते त्यासाठी पायांच्या सगळ्याच स्नायूंची मदत घ्यावी लागते. यामुळे शरीरातील कॅलरीज झपाट्याने कमी होते.
हे सुद्धा वाचा
Non Stop LIVE Update