Weight Loss | डिलिव्हरीनंतर वाढलेलं वजन कमी करायचेय? मग, ‘या’ टिप्स नक्की ट्राय करा!

गर्भधारणेदरम्यान शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात, ज्यामुळे स्त्रीचे वजन लक्षणीय वाढते. त्याच वेळी, प्रसूतीनंतर, स्त्री बाळाच्या काळजीत इतकी अडकली की, ती स्वत:कडे नीट लक्ष देऊ शकत नाही.

Weight Loss | डिलिव्हरीनंतर वाढलेलं वजन कमी करायचेय? मग, ‘या’ टिप्स नक्की ट्राय करा!
वाढलेले वजन
Follow us
| Updated on: Mar 03, 2021 | 1:37 PM

मुंबई : गर्भधारणेदरम्यान शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात, ज्यामुळे स्त्रीचे वजन लक्षणीय वाढते. त्याच वेळी, प्रसूतीनंतर, स्त्री बाळाच्या काळजीत इतकी अडकली की, ती स्वत:कडे नीट लक्ष देऊ शकत नाही. यामुळे, वाढलेले वजन कमी करण्यासाठी पुरेसा वेळच मिळत नाही. आपणासही अशी समस्या असल्यास,  आपण आज येथे असे काही उपाय जाणून घेणार आहोत, ज्यासाठी तुम्हाला जास्त कष्ट करावे लागणार नाहीत आणि तुमचे वजनही देखील लवकर कमी होईल (Weight loss after delivery know the easy home remedies).

‘या’ टिप्स नक्की ट्राय करा!

– ओव्याचे पाणी पोट कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. एका ग्लास पाण्यात एक मोठा चमचा ओवा घालून ते पाणी उकळा. नंतर ते पाणी कोमट करून प्या. आपण इच्छित असल्यास, ते एकाचवेळी मोठ्या प्रमाणात तयार करू शकता आणि ते एका भांड्यात ठेवू शकता. त्यानंतर, आपण दिवसभरात कधीही हे पाणी पिऊ शकता. असे केल्याने, लवकरच आपल्याला चांगले परिणाम दिसतील. जर, आपण दिवसभर हे पाणी पिऊ शकत नसाल, तर किमान सकाळी रिक्त पोटी आणि जेवणानंतर नक्की प्या.

– पोटावरील चरबी कमी करण्यासाठी, तसेच वजन कमी करण्यासाठी दालचिनी आणि लवंगा खूप चांगले मानले जातात. यासाठी एका ग्लास पाण्यात दोन ते तीन लवंगा घाला आणि त्यात दालचिनीचा एक तुकडा घालून ते उकळवा. नंतर कोमट झाल्यावर ते प्या.

– जर तुमची डिलिव्हरी नॉर्मल असेल, तर बदाम आणि मनुकेसुद्धा तुमच्यासाठी फायदेशीर आहेत. यासाठी 10 बदाम आणि 10 मनुके घ्या. मनुक्यामधील बिया काढा. दोन्ही गोष्टी एकत्र मिसळून त्याची बारीक पेस्ट तयार करा. ही पेस्ट एक कप कोमट दुधात मिसळून प्या. यामुळे काही दिवसांतच चरबी कमी होण्यास सुरुवात होईल. – शक्य असल्यास दररोज दुधीचा रस प्या. यामुळे आपल्याला पोषण देखील मिळेल आणि चरबी देखील कमी होईल. सलाड म्हणून तुम्ही कच्चा दुधी खाऊ शकता (Weight loss after delivery know the easy home remedies).

– एक चमचा मध, अर्धा चमचा काळी मिरी आणि एक चमचा आल्याचा रस सकाळी एक ग्लास कोमट पाण्यात मिसळून रिक्त पोटी प्या. याने वजन कमी होईल आणि शरीरात शक्ती देखील येते.

– रात्री एक कप कोमट दुधात, त्यात पाव चमचा जायफळ पावडर घाला. याच्या सेवनाने आपले वजन वेगाने कमी होईल.

– शक्य असल्यास दिवसभर कोमट पाणी प्या. हे केवळ शरीराच्या विषारी घटकांनाच काढून टाकणार नाही, परंतु शरीराचे वजन देखील वाढू देणार नाही.

– जर, आपण व्यायाम करू शकत नाही, तर किमान प्राणायाम करा. तसेच, सकाळी आणि संध्याकाळी किमान अर्धा तास चाला. यामुळे आपले वजन देखील कमी होईल, आपल्या स्नायूंचा कडकपणा कमी होईल आणि सर्व शारीरिक आणि हार्मोनल समस्यांमध्ये फायदेशीर ठरेल.

– अनेक स्त्रिया आपल्या फिगरचा विचार करून बाळाला जास्त स्तनपान करत नाही. परंतु, हा तुमचा गैरसमज आहे. आपल्यासाठी आणि आपल्या बाळाच्या आरोग्यासाठी स्तनपान चांगले आहे. याने केवळ मुलाचे पोषणच होत नाही, तर आपली चरबी आणि अतिरिक्त कॅलरी देखील कमी होतात.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Weight loss after delivery know the easy home remedies)

हेही वाचा :

Skin Care | शिजवलेल्या तांदळापासून मिळेल चमकदार त्वचा, नक्की ट्राय करा ‘राईस’ फेसपॅक!

Beauty Tip | लग्नाच्या दिवशी सुंदर दिसायचंय, तर आताच ‘अशाप्रकारे’ घ्या त्वचेची काळजी!

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.