महिला आणि पुरुषांनी वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचा नाश्ता करावा का?; फूड चार्ट काय सांगतो?

शरीराच्या गरजेनुसार पुरुष आणि महिलांचा नाश्ता वेगवेगळा असू शकतो. महिलांसाठी चिया पुडिंग आणि फ्लॅक्स सीड्सचे अधिक फायदे असू शकतात, तर पुरुषांसाठी ओट्स आणि स्मूदी अधिक उपयुक्त ठरू शकतात.

महिला आणि पुरुषांनी वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचा नाश्ता करावा का?; फूड चार्ट काय सांगतो?
Follow us
| Updated on: Dec 15, 2024 | 3:23 PM

सध्या पुरुष असो की स्त्री दोघांची एक समस्या समान आहे. ती म्हणजे वाढते वजन. दोघांनाही वजन कमी करण्याची मोठी चिंता सतावत असते. त्यासाठी मग ते जीमला जातात, वॉकिंग करतात, योगा करतात आणि डाएट प्लानही अवलंबतात. त्यामुळे वजन नियंत्रणात राहतं. पण याबाबत काही शंकाही आहेत. वजन कमी करायचं असेल तर महिला आणि पुरुषांनी वेगवेगळ्या प्रकारचा नाश्ता केला पाहिजे का? दोघांची चयापचय प्रणाली वेगळी असते का? असा प्रश्न सर्वांना पडतो आणि त्यात तथ्यही आहे. वजन कमी करण्यासाठी पुरुष आणि महिलांचा नाश्ता वेगळा असतो. आज आपण त्याचीच माहिती घेऊया.

महिलांसाठी नाश्ता :

चिया पुडिंग

चिया बिया उच्च फायबर्स, ओमेगा-3 फॅटी अॅसिड्स आणि अँटीऑक्सिडन्ट्सने भरपूर असतात. चिया बिया रात्री दूधात भिजवून ठेवता येतात आणि सकाळी नाश्त्याच्या रूपात सेवन करता येतात. यात मध किंवा नट्स देखील टाकू शकता. तसं केल्याने भूकेवर नियंत्रण राहतं.

व्हेजी एग ऑम्लेट

नाश्त्यात शाकाहारी पदार्थांचा समावेश असलेलं ऑम्लेट तयार करा. अंड्यात प्रचंड प्रोटीन असतं. पचन आणि स्नायूंच्या आरोग्यासाठी प्रोटीन उपयुक्त असतं. स्पिनॅच, मिरची, कांदा, टोमॅटो इत्यादी भाज्या ऑम्लेटमध्ये टाकून अधिक पोषण मिळवता येते.

फ्लॅक्स सीड्स आणि सफरचंदासह पनीर

पनीराचे छोटे तुकडे करा आणि त्यावर फ्लॅक्स सीड्स पसरवा. यात चवीसाठी मीठ आणि मिरी घाला. त्यात एक सफरचंद छोटे तुकडे करून टाकता येते. पनीर प्रोटिन आणि कॅल्शियमचे चांगले स्रोत असतात, तर फ्लॅक्स सीड्स ओमेगा-3 आणि फायबर्स देतात.

पुरुषांसाठी नाश्ता :

ओट्स

ओट्स आपल्या दैनंदिन ऊर्जा आवश्यकतांची पूर्तता करण्यासाठी सर्वोत्तम आहे. ओट्समध्ये डाळ, नट्स, आणि फळे टाकून अधिक पौष्टिकता मिळवता येते.

स्मूदी

स्मूदीमध्ये विविध पोषणतत्त्वांचा समावेश असतो. तुम्ही स्पिनॅच, केळी, प्रोटीन पावडर आणि बदाम बटर मिक्स करून एक पौष्टिक स्मूदी तयार करू शकता.

योगर्ट

योगर्ट प्रोटीन आणि प्रोबायोटिक्सचा चांगला स्रोत आहे. त्यात डाळ आणि सुकी द्राक्षे टाकून स्वादिष्ट आणि पौष्टिक नाश्ता तयार करता येतो.

(डिस्क्लेमर : बातमीत दिलेल्या माहितीला आम्ही दुजोरा देत नाही. कोणताही उपचार करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांकडून वैद्यकीय सल्ला घेऊनच उपचार करावेत.)

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.