Health : कोणताही व्यायाम न करता वजन ठेवा नियंत्रणात, फक्त ‘ही’ एक सोपी गोष्ट करा!
Health News : प्रत्येकाला आपलं शरीर फिट असावं असं वाटतंच, वजन नियंत्रणात राहण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतात. मग जीम लावणं, डाएटवर राहणं असे अनेक उपाय करत असतात. तर आज आपण वजन नियंत्रणात राहण्यासाठी आणि फिट राहण्यासाठी कॅलरीजबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत. जर तुम्ही दररोज खाल्लेल्या कॅलरीजची संख्या कमी केली तर वजन नियंत्रणात आणण्याचा […]
Health News : प्रत्येकाला आपलं शरीर फिट असावं असं वाटतंच, वजन नियंत्रणात राहण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतात. मग जीम लावणं, डाएटवर राहणं असे अनेक उपाय करत असतात. तर आज आपण वजन नियंत्रणात राहण्यासाठी आणि फिट राहण्यासाठी कॅलरीजबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत.
जर तुम्ही दररोज खाल्लेल्या कॅलरीजची संख्या कमी केली तर वजन नियंत्रणात आणण्याचा हा एक प्रभावी मार्ग असू शकतो. पण, आपण दररोज किती कॅलरीज खाव्यात हे ठरवणे कठीण आहे, कारण कॅलरीज अनेक घटकांवर अवलंबून असते. तसंच लठ्ठपणा हा उच्च कोलेस्टेरॉल, उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका, मधुमेह, तिहेरी रक्तवाहिन्यांचे आजार अशा अनेक आजारांचे मूळ मानले जाते. त्यामुळे रोजच्या कॅलरी खाण्यावर लक्ष ठेवणे फार महत्वाचे आहे.
दररोज सरासरी किती कॅलरी खाल्ल्या पाहिजेत?
तुम्ही दररोज किती कॅलरीज खाल्ल्या पाहिजेत हे तुमचे वय, लिंग, उंची, वर्तमान वजन, क्रियाकलाप पातळी यासह इतर अनेक घटकांवर ठरवलं जातं. वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असताना कमी कॅलरी वापरून किंवा अधिक व्यायाम करून कॅलरी कमी करणे महत्वाचे आहे. .
तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असला तरीही, तुमच्या शरीराला आवश्यक पोषक तत्त्वे पुरवण्यासाठी तुम्ही पुरेशा कॅलरी खाणं महत्त्वाचं आहे. महत्त्वाचं सांगायचं झालं तर अनेक आरोग्य तज्ञ वजन कमी करण्यासाठी कॅलरी नियंत्रणात ठेवण्याची शिफारस करतात.
अनेक आहारतज्ञ दररोज कॅलरीजचे प्रमाण सुमारे 1,000-1,200 पर्यंत मर्यादित ठेवण्याची शिफारस करतात. हे बहुतेक निरोगी तरुणांसाठी पुरेसे नाही. तुमच्या कॅलरीच्या सेवनात कपात केल्याने अनेक गंभीर दुष्परिणाम होतात. यामुळे, मेटाबॉलिज्म दरात देखील बदल होतात ज्यामुळे दीर्घकाळ वजन नियंत्रित ठेवणे कठीण होते. तर आता आपण किती वयात किती कॅलरी असणं गरजेचं आहे याबाबत जाणून घेणार आहोत.
स्त्रियांसाठी कॅलरी चार्ट
19-30 वर्षे 2,000-2,400 कॅलरीज
31-59 वर्षे 1,800-2,200 कॅलरी
60+ वर्षे 1,600-2,000 कॅलरी
पुरुषांसाठी कॅलरी चार्ट
19-30 वर्षे 2,400-3,000 कॅलरी
31-59 वर्षे 2,200-3,000 कॅलरी
60+ वर्षे 2,000-2,600 कॅलरी
मुलांसाठी कॅलरी चार्ट
2-4 वर्षे मुले: 1,000-1,600 कॅलरी
लहान मुली: 1,000-1,400 कॅलरी
5-8 वर्षे वयोगटातील मुले: 1,200-2,000 कॅलरी
मुली:: 1,200-1,800 कॅलरीज
9-13 वर्षे मुले:: 1,600-2,600 कॅलरी
लहान मुली: 1,400-2,200 कॅलरीज
14-18 वर्षे वयोगटातील मुले: 2,000-3,200 कॅलरी