Weight Loss Tips: लवकर वजन कमी करायचे असेल तर ‘या’ टीप्स करा फॉलो; हे पदार्थ खाऊन करा दिवसाची सुरूवात!

Weight Loss Tips: लठ्ठपणा ही एक समस्या आहे, लठ्ठपणामुळे आरोग्याशी संबधीत इतरही समस्या सुरू होतात. तुमचेही वजन जास्त असेल आणि तुम्हाला ते कमी करायचे असेल तर येथे सांगितलेले काही उपाय करून पहा.

Weight Loss Tips: लवकर वजन कमी करायचे असेल तर ‘या’ टीप्स करा फॉलो; हे पदार्थ खाऊन करा दिवसाची सुरूवात!
Follow us
| Updated on: Jul 12, 2022 | 11:03 PM

मुंबईः भारतात लठ्ठपणा हा आजार मानला जात नाही, पण प्रत्यक्षात ही एक अशी समस्या आहे, की त्यामुळे, तुमचे शरीर अनेक समस्यांचे कारण (The cause of the problems) बनते. म्हणूनच लठ्ठपणाला रोगांचे घर म्हटले जाते. चुकीची जीवनशैली (Wrong lifestyle) आणि सकस आहाराची कमतरता यांचा आपल्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. तुमचेही वजन जास्त असेल तर तुम्ही ते कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेणेकरून शरीराला इतर आजारांपासून वाचवता येईल. लठ्ठपणा दूर करण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या आहारात बदल (Dietary changes) करावे लागेल.

तज्ज्ञांच्या मते. खाण्यापिण्याच्या सवयी सुधारल्या तरच माणूस आपल्या वजनावर बऱ्याच अंशी नियंत्रण ठेवू शकतो. याशिवाय काही आरोग्यदायी गोष्टींचाही आहारात समावेश करणे आवश्यक आहे. जाणून घ्या, अशा 4 गोष्टींबद्दल ज्यांचा आहारात समावेश केला जाऊ शकतो, त्यामुळे, तुमचे वजन झपाट्याने कमी होऊ शकते.

रिकाम्या पोटी खा लसूण : सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी लसणाच्या दोन पाकळ्या तोंडात चावून घ्या आणि एक ग्लास कोमट पाण्यात लिंबू पिळून प्या. हे रोज केल्याने तुमचे वजन कमी होण्यास मदत होईलच, पण तुमची रोगप्रतिकारशक्तीही मजबूत होईल. लसूण गिळल्यानंतर सुमारे तासभर काहीही खाऊ नका.

सफरचंद : असे म्हणतात की, रोज एक सफरचंद खाल्ल्यास सर्व समस्या दूर होतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही रोज सकाळी रिकाम्या पोटी सफरचंद खाल्ले तर तुम्हाला खूप फायदा होतो. सफरचंदामध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट असतात, जे तुमचे वजन कमी करण्यास तसेच शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात.

न्याहारीमध्ये उपमा खा : असं म्हणतात की सकाळचा नाश्ता राजासारखा असावा. पण याचा अर्थ पुरी, पराठे किंवा स्मूदी खाणे असा नाही. याचा अर्थ त्या गोष्टी खाव्यात, ज्या तुम्हाला दिवसभर ऊर्जा देतात. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल, तर तुमच्या नाश्त्यात उपमा खा. यामध्ये भरपूर प्रोटीन असते, ते खाण्यासही हलके असते. यामुळे तुमचे वजन कमी होते.

स्प्राउट्स: सकाळच्या नाश्त्यामध्ये स्प्राउट्स हा देखील एक चांगला पर्याय आहे. यामध्ये प्रथिने देखील भरपूर असतात. हे खाल्ल्यानंतर तुमचे पोट बराच काळ भरलेले राहते. हे तुमच्या शरीराला शक्ती आणि ऊर्जा देखील देते, तसेच तुमचे वजन कमी करण्यास उपयुक्त आहे.

इडली : सकाळच्या नाश्त्यासाठी इडली हा उत्तम पर्याय असू शकतो. यामध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. तसेच, कोणत्याही प्रकारची स्निग्धता नसते. ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. यामुळे तुमचे पोट भरते आणि तुम्हाला ऊर्जा मिळते.

 या गोष्टींच्या बाबत सर्तक रहा

या सर्व गोष्टी असूनही, तुम्हाला काही वर्कआउट्स देखील करणे आवश्यक आहे, जेणेकरून तुमच्या शरीरातील चयापचय चांगले होईल. तुम्ही दररोज सकाळी सुमारे एक तास व्यायाम करा. संध्याकाळी जेवल्यानंतर अर्धा तास पायी फीरा. याशिवाय बाहेरचे अन्न, जास्त मसालेदार आणि स्निग्ध पदार्थ पूर्णपणे टाळा. जास्त साखर खाणे टाळा. साखरेऐवजी गूळ किंवा शुगर कॅंडी खा.

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.