सणासुदीच्या दिवसात अजिबात वाढणार नाही वजन, फक्त या टिप्स करा फॉलो
दिवाळी अवघ्या काही दिवसांवरच येऊन ठेपलेली आहे. दिवाळी म्हंटलं की फराळ आणि गोडधोड खाणे आलेच. सणासुदीच्या दिवसात गोड आणि तेलकट खाल्याने वजन वाढते. या दिवसांत वजन कसं नियंत्रणात ठेवावं हे आहार तज्ञांकडून जाणून घेऊया.
मुंबई : सणासुदीला सुरुवात होणार आहे. हीच वेळ असते जेव्हा कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र भेटतात आणि भरपूर मज्जा करतात. सणासुदीच्या काळात घरांमध्ये अनेक प्रकारचे पदार्थ बनवले जातात आणि यामध्ये गोड पदार्थांवर तर प्रत्त्येकच जण ताव मारतो. अशा प्रसंगी गोड आणि तेलकट पदार्थ खाण्यापासून माणूस स्वतःला रोखू शकत नाही. जे लोकं वजन कमी करत आहेत त्यांना या प्रसंगी स्वतःवर नियंत्रण ठेवणे खूप कठीण होते. त्यामुळे तुम्हालाही सणासुदीचा आनंद घ्यायचा असेल पण तुमचे वजन वाढवायचे (Weight Loss) नसेल, तर त्यासाठी आम्ही तुमच्यासोबत काही टिप्स शेअर करणार आहोत. या टिप्स फॉलो केल्याने तुमचे वजन अजिबात वाढणार नाही.
सणासुदीच्या काळात वजन नियंत्रित करण्यासाठी या टिप्स फॉलो करा
शारीरिक हालचाल महत्त्वाची – सुट्टी आणि सणासुदीच्या काळात व्यायाम आणि कसरत करणे खूप कठीण आहे, परंतु तुम्ही त्यात अजिबात संकोच करू नये. तुम्हाला जीम जावे वाटत नसल्यास, तुम्ही कुटुंबासोबत फुटबॉल किंवा कोणतेही मैदानी खेळ खेळू शकता. यामुळे तुम्ही अॅक्टिव्ह राहाल आणि कुटुंबासोबत एन्जॉयही करू शकाल. तसेच, नुसते बसण्याव्यतिरिक्त, आपण स्वयंपाकघरातील कामात किंवा घराच्या सजावटमध्ये मदत केली पाहिजे. या छोट्याशा मदतीमुळे तुमच्या शरीरातील अतिरिक्त कॅलरीज संतुलित राहतील.
पोर्शन कंट्रोल- आम्हाला माहित आहे की सणासुदीच्या काळात वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ आणि मिठाई खाण्यापासून स्वतःला रोखणे खूप कठीण आहे आणि तुम्ही स्वतःला थांबवू नका. पण विचारपूर्वक खाणे महत्त्वाचे आहे. एकाच वेळी भरपूर खाण्याऐवजी कमी प्रमाणात खा. एकत्र खाल्ल्याने जास्त खाण्याची समस्या उद्भवू शकते. तसेच गोड आणि तेलकट पदार्थ खाण्यासोबतच भाज्या, प्रथिने आणि संपूर्ण धान्यांचा आहारात समावेश करा. एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही सर्व काही खाऊ शकता परंतु भागाचा आकार लक्षात ठेवा.
हायड्रेटेड रहा – दिवाळी हिवाळ्याचे आगमन दर्शवते ज्यामुळे हवामान थंड होऊ लागते. हिवाळ्यात पाण्याची तहान खूपच कमी असते. तुम्ही जास्तीत जास्त पाणी पिणे आणि हायड्रेटेड राहणे महत्त्वाचे आहे. यामुळे तुमची मिठाई खाण्याची लालसा कमी होईल. जेव्हा तुम्ही गोड खात नाही, तेव्हा तुमचे वजन वाढत नाही.
शक्य तितके चालणे- सणासुदीमुळे व्यायाम करता येत नसेल तर शक्य तितके चालणे गरजेचे आहे. दर 2 तासांनी 15 मिनिटे चाला. लिफ्टऐवजी पायऱ्या वापरा. आणि वस्तू खरेदी करण्यासाठी, कारने न जाता पायी जा.