Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वजन कमी करण्यासाठी आता महागड्या औषधाची गरज नाही… जिवनशैलीत बदल करणे हीच वजन कमी करण्याची खरी गुरुकिल्ली… संशोधनाअंती झाले सिद्ध!

जर तुम्हीही जास्त वजनाने त्रस्त असाल आणि वजन कमी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. एंडोक्राइन सोसायटी द्वारे केलेल्या एका नवीन अभ्यासानुसार, लठ्ठ व्यक्तींना औषधांची नव्हे तर, जिवनशैली बदलण्याची आवश्यकता असते.

वजन कमी करण्यासाठी आता महागड्या औषधाची गरज नाही... जिवनशैलीत बदल करणे हीच वजन कमी करण्याची खरी गुरुकिल्ली... संशोधनाअंती झाले सिद्ध!
Weight LossImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 23, 2022 | 5:42 PM

आजकालच्या अनियमित जिवनशैलीमुळे आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे (Due to wrong habits) लोकांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. अशा स्थितीत ते लवकर कमी करण्यासाठी लोक अनेक प्रकारची औषधे वापरण्यास सुरुवात करतात. ज्याचे परिणाम मुख्यतः शरीरात नवीन समस्यांच्या रूपात दिसून येतात. परंतु, तज्ञाच्या मते, लठ्ठपणा कमी करण्यासाठी, लठ्ठपणाविरोधी औषध (Anti-obesity drug) नाही, तर तुमची जीवनशैली तुम्हाला वजन कमी करण्यास मदत करेल. जर तुम्हीही जास्त वजनाने त्रस्त असाल आणि वजन कमी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. एंडोक्राइन सोसायटी (Endocrine Society) द्वारे केलेल्या एका नवीन अभ्यासात असे आढळून आले आहे की, स्थूलताविरोधी औषधे न घेता केवळ जिवनशैली बदलवून केलेल्या प्रयत्नांमुळे जास्त वजन असलेल्या आणि लठ्ठ व्यक्तींचे 3 ते 5 वर्षांमध्ये सरासरी 10.6% वजन कमी झाले आहे. अटलांटा येथील सोसायटीच्या वार्षिक बैठकीत हे निष्कर्ष मांडणाऱ्या विश्लेषकांच्या मते, जर एखाद्या व्यक्तीचे वजन 10% पेक्षा जास्त कमी झाले. तर ते अनेक आजारांपासून मुक्त होऊ शकतात. न्यू यॉर्कमधील वेइल कॉर्नेल मेडिसिनचे प्रमुख संशोधक मायकेल ए. वेनट्रॉब, एमडी, यांच्या मते, ” लठ्ठपणाविरोधी औषधांचा परिणाम केवळ एक किंवा दोन वर्षे मर्यादित राहतो. अभ्यासादरम्यान, आम्ही वजन कमी करण्याची औषधे घेत असलेल्या ४०० पेक्षा जास्त वजनाच्या आणि लठ्ठ प्रौढांमध्ये ३-५ वर्षांमध्ये वजन कमी करण्याच्या देखभालीचे विश्लेषण केले आहे.”

कसे झाले संशोधन

अभ्यासामध्ये यूएस मध्ये स्थापित वजन व्यवस्थापन केंद्रातील 428 रुग्णांच्या डेटाची तपासणी करण्यात आली. कमी ग्लायसेमिक आहार आणि व्यायामावर लक्ष केंद्रित करण्यासाठी सर्व रूग्णांना त्यांच्या कार्यालयीन भेटी दरम्यान लठ्ठपणाच्या औषध तज्ञाद्वारे समुपदेशन केले गेले. त्याचप्रमाणे रुग्णांना पॅनेल केलेल्या पोषणतज्ञांशी अतिरिक्त सल्लामसलत करण्याची ऑफर दिली गेली. क्लिनिकल उपचारांमध्ये FDA मंजूर आणि ऑफ-लेबल वजन कमी करण्याच्या औषधांचा समावेश होता. संशोधनात वजन कमी करण्यासाठी, मेटफॉर्मिन, फेंटरमाइन आणि टोपिरामेट ही सर्वात प्रसिद्ध औषधे वापरली गेली. शेवटच्या भेटीत रुग्ण वजन व्यवस्थापनासाठी सरासरी दोन औषधे घेत होते. या रुग्णांचे सरासरी 4.7 वर्षे निरीक्षण केले गेले.

हे सुद्धा वाचा

10 टक्के वजन कमी होणे गरजेचे

या कालावधीत त्यांनी सरासरी 10.6 टक्के वजन कमी केले. हे साध्य करण्यासाठी त्या सर्वांना थेरपी आणि जिवनशैलीतील बदल राखावे लागले. यावर बोलताना मायकल ए. म्हणतात, “10 टक्के वजन कमी होणे वैद्यकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे कारण ते मधुमेह, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉल आणि अडथळा आणणारा स्लीप एपनिया यांसारख्या हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी जोखीम घटकांमधील सुधारणांशी संबंधित आहे, तसेच हालचाल आणि जिवनाच्या एकूण गुणवत्तेत सुधारणा करण्यास उपयोगी आहे,” लठ्ठपणाविरोधी औषधे हे लठ्ठपणासाठी कमी वापरलेले उपचार पर्याय आहेत. मधुमेह आणि हृदयरोगासह लठ्ठपणा-संबंधित रोगांना ही औषधे प्रतिबंधित करू शकतात. परंतु, तुम्हाला दीर्घकाळासाठी वजन कमी करायचे असेल, तर तुम्ही तुमच्या जिवनशैलीत बदल करणे तितकेच गरजेचे असल्याचे संशोधकांनी सांगीतले. वजन कमी करण्यासाठी पायी फिरणे, योगासने, नियमीत व्यायाम यांचा अधिक फायदा होत असल्याचे संशोधकांनी सांगीतले.

संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती
संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती.
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली.
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी.
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर.
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.