Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काय सांगता.. महिलेने गरोदरपणात केले 63 किलो वजन कमी; जाणून घ्या, कोण आहे ‘ही’ महिला आणि तिचा प्रवास!

वाढलेल्या वजनामुळे अनेकांना स्वतःची लाज वाटत असते. काहीवेळा अप्रिय घटनांचाही सामना करावा लागतो. इंग्लडमधील एका महिलेला वजन जास्त असल्याने, टॉय ट्रेन मध्ये बसण्यास नकार दिल्याने, ती दुखावली आणि तिने वजन कमी करण्याचा निश्चय करीत, तब्बल 63 किलो वजन कमी करून दाखविले.

काय सांगता.. महिलेने गरोदरपणात केले 63 किलो वजन कमी; जाणून घ्या, कोण आहे ‘ही’ महिला आणि तिचा प्रवास!
Follow us
| Updated on: Jun 14, 2022 | 8:45 PM

मुंबईः गरोदरपणात महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मूड स्विंग, शरीर दुखणे, पाठदुखी, पायात जडपणा, डोकेदुखी, तोंड कोरडे होणे इत्यादी मात्र या कठीण परिस्थितीत एका महिलेने आपले वजन कमी (Weight loss) केले आहे. वास्तविक, जेव्हा महिलेचे वजन कमी झाले, त्या काळात ती गर्भवती होती आणि त्याच वेळी तिचा फिटनेस प्रवास (Fitness travel) सुरू झाला. या महिलेने गरोदरपणात सुमारे 63 किलो वजन कमी केले आहे. गर्भवती असूनही, सुमारे 63 किलो वजन कमी केलेल्या महिलेचे नाव टॅनिस हेमिंग आहे, ती मूळची इंग्लंडमधील मेडस्टोनची आहे. 19 वर्षांची असतानाही तिचे वजन जवळपास 133 किलो होते. तिचं एवढं वजन असण्याचं कारण म्हणजे चुकीच्या खाण्याच्या सवयी (Wrong eating habits) ही महिला खुप खात असल्याने, तिचे वजन झपाट्याने वाढले होते. परंतु, एक दिवस तिच्या आयुष्यात असे काही घडले की, तिने गर्भवती असतांनाच सुमारे 63 वजन कमी करून दाखविले.

एकाच वेळी खात होती पूर्ण केक

टेनिस हेमिंगच्या म्हणण्यानुसार, वैयक्तिक समस्यांमुळे ती खोलीत एकटीच राहायची आणि त्यावेळी अन्न हाच तिचा एकमेव आधार होता. ती दिवसभर केक, चॉकलेट आणि आईस्क्रीम खात असे. ती कॅडबरीचे चॉकलेट सर्वात जास्त खात असे कारण त्या चॉकलेटचे व्हायलेट रंगाचे पॅकेजिंग तिला तिच्या मित्राची आठवण करून देत असे. एका मुलाखतीदरम्यान टॅनिस हेमिंगने सांगितले की, ती चॉकलेट्सची पॅकेट विकत घेत असे, ज्यामध्ये 6 चॉकलेट्स ठेवण्यात आली होती. ती पूर्ण १ पॅकेट एकाच वेळी खात असे. यानंतर ती संपूर्ण केक एकाच वेळी खात असे. तिच्या या सवयीमुळे तिचे वजन खूप वाढल्यामुळे घरातील सदस्यही नाराज झाले होते.

या घटनेनंतर बदलले आयुष्य

टेनिस हेमिंगने मुलाखतीदरम्यान सांगितले की, मी आता 36 वर्षांची आहे. लग्नानंतर वाढलेल्या वजनामुळे बाळंतपण करणं अधिक कठीण होतं, पण माझ्या मुलीचा जन्म फेब्रुवारी २०१६ मध्ये झाला, काहीही त्रास न होता. लग्नानंतर मी कुटुंबासोबत साउथेंडला फिरायला गेले होते. मग मुलांनी मला टॉय ट्रेनमध्ये बसण्याचा हट्ट धरला. पण माझे वजन खूप जास्त होते, त्यामुळे मला त्या ट्रेनमध्ये बसण्यास नकार देण्यात आला. त्या दिवसापासून मी वजन कमी करण्याचा प्लॅन बनवला होता. वजन वाढीमुळे, मला आरोग्याशी संबंधित काही समस्या येऊ लागल्या. उदाहरणार्थ, ऊर्जेचा अभाव, सांधेदुखी, थकवा. मी जेवण केले असते तर या सर्व समस्या दूर झाल्या असत्या. पण दुसऱया गरोदरपणात दोन बाळं पोटात असताना मी वजन कमी करायचं ठरवलं आणि माझं वजन जवळपास ६३ किलो कमी झालं. यानंतर 2019 मध्ये तुर्कीमध्ये माझी गॅस्ट्रिक बायपास सर्जरीही झाली. त्यानंतर मी माझ्या आहारातून सर्व चुकीच्या गोष्टी काढून टाकल्या आणि व्यायामाला सुरुवात केली.

संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल
संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल.
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका.
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला.
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य.
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार.
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल.
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान.
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?.
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख.
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर.