कोरोनाचा सामना करणारी शरीरातील ‘आर्मी, पोलीस आणि स्पेशल टास्क फोर्स’, कशी काम करते? वाचा…
शरीरात कोरोना विषाणूने शिरकाव केल्यानंतर शरीरातील ही आर्मी तात्काळ आपलं काम सुरु करते आणि टप्प्याटप्प्याने कोरोना विषाणूच्या ओळखीपासून त्यांना शरीराबाहेर पिटाळण्यापर्यंतचं काम करते.
नवी दिल्ली : कोरोना संसर्गाने जगभरात लाखो लोकांचे बळी घेतले आहेत. अशातच कोट्यावधी लोक या संसर्गापासून बरेही झाले आहेत. कोरोना संसर्गातून बरे होण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच शरीरातील आर्मी, पोलीस आणि स्पेशल टास्क फोर्स किती मजबूत आहे हे फार महत्त्वाचं आहे. शरीरात कोरोना विषाणूने शिरकाव केल्यानंतर शरीरातील ही आर्मी तात्काळ आपलं काम सुरु करते आणि टप्प्याटप्प्याने कोरोना विषाणूच्या ओळखीपासून त्यांना शरीराबाहेर पिटाळण्यापर्यंतचं काम करते. पण हे काम नेमकं कसं चालतं याविषयी अनेकांना उत्सुकता असते. त्याचाच हा खास आढावा (What is Body immunity system how it works against Corona Virus).
शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे वातावरणातील असंख्या विषाणूंशी युद्ध करणारी आपल्या शरीराची सुरक्षा यंत्रणा. याला आपण आर्मी, पोलीस किंवा आरोग्य यंत्रणेच्या भाषेत स्पेशल टास्क फोर्सही म्हणू शकतो. शरीरात कोणत्याही विषाणूने प्रवेश केला की ही यंत्रणा तात्काळ शरीराबाहेरील या विषाणूंचा मार्ग अडवते. त्यांची ओळख पटवून त्यांच्याविरोधात शरीरात अँटीबॉडीजच्या रुपातील सैन्य तयार करुन युद्ध सुरु करते. कोरोनावर मात करणाऱ्या कोट्यावधी लोकांच्या शरीरातही अशाच प्रकारचं युद्ध झाल्यानंतर ते बरे झाले आणि त्यांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार झाल्या. याचं सर्व श्रेय शरीरातील रोग प्रतिकारक शक्तीला जातं.
कोरोना विषाणू शरीरावर कसा हल्ला करतो?
अमेरिकेतील ओरेगॉन युनिव्हर्सिटीमध्ये सहाय्यक संशोधक प्राध्यापक डॉ. सुषमा नैथानी म्हणाले, “कोरोना विषाणू नाका तोंडातून श्वसननलिकेच्या माध्यमातून फुफुसापर्यंत पोहचतो. त्यानंतर या विषाणूचे स्पाईक (काटेरी भाग) प्रोटिन फुफुसाच्या पेशींवर चिकटतात. त्यानंतर या विषाणूचा जीनोम (आर.एन.ए. RNA) सक्रीय होऊन पेशींमधील पोषकद्रव्यांचा उपयोग करुन आपली संख्या वाढवतो. पोषकद्रव्य संपले की हे विषाणू तेथून बाहेर पडतात आणि नव्या पेशींना लक्ष्य करत पुन्हा ही सर्व प्रक्रिया होते. अशाप्रकारे कोरोना विषाणू फुफुसाला निकामी करण्याचा प्रयत्न करतो.”
नवे विषाणू पाहून शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती काय करते?
विषाणूने शरीरावर हल्ला केल्यानंतर शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती अचानक सक्रीय होते आणि त्याविरोधात काम सुरु करते. सुरुवातीला शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती या नव्या विषाणूला ओळखण्याचा प्रयत्न करते. ज्या पेशींवर हल्ला झालाय तो भाग लगेचच शोधून रोग प्रतिकार शक्ती या भागात अँटिबॉडी तयार करते. या अँटिबॉडी विषाणूवर हल्ला करुन त्यांना संपवतात.
रक्षक पेशींचं काम कसं होतं?
शरीरातील रक्षक पेशींना विषाणूला ओळखता आलं नाही तर या पेशी शरीराचं नुकसान करण्याचाही धोका असतो. त्यामुळे फुफुसातील पेशी जखमीही होऊ शकतात. शरीरातील मृत पेशींची साफसफाई करण्यासाठी मॅक्रोफाज पेशी काम करतात. जर रक्षक पेशींनाही विषाणूशी लढण्यात यश आलं नाही तर मेंदूला अधिक मदतीचा संदेश जातो. या टप्प्यावर खोकला किंवा गळ्यात खवखव होण्यास सुरुवात होते.
मेंदूपर्यंत अधिक मदतीचा संदेश आल्यानंतर शरीरातील सक्रीयता कमी करण्याचे आदेश येतात. त्यानंतर शरीराचं तापमान वाढतं. रुग्णाला ताप आलाय म्हणजेच शरीर विषाणूंविरोधात निर्णयक लढा लढतंय. शरीरातील वाढत्या तापमानामुळे विषाणूंची शक्ती कमी होते. शरीरातील ज्या संसाधनांचा विषाणू वापर करते ती संसाधनं निष्क्रिय होतात.
शरीरातील स्पेशल टास्क फोर्सचं काम करणाऱ्या डेंड्रेटिक पेशी कसं काम करतात?
3-4 दिवसांच्या तापानंतरही विषाणूंचा संसर्ग न संपल्यास मेंदूकडे अधिक मदतीचा संदेश जातो. त्यामुळे शरीरातील स्पेशल टास्क फोर्सचं काम करणाऱ्या डेंड्रेटिक पेशी मैदानात उतरतात. त्या विषाणूंची अचूक ओळख करतात. या पेशी विषाणूंना आपल्या सोबत संलग्न करतात आणि हेल्पर टी पेशींकडे घेऊन जातात. या पेशी विषाणूंचा खात्मा करण्यासाठी अँटिबॉडी तयार करतात. अशाप्रकारे शरीर कोरोनाचा सामना करते. विशेष म्हणजे प्रत्येकाची रोगप्रतिकारक शक्ती वेगळी असते. त्यामुळे विषाणूंना मिळणारा शरीराचा प्रतिसाद काहीसा वेगळाही असू शकतो.
हेही वाचा :
आमदार असावा तर असा! रेमडेसिव्हीरसाठी 20 लाखाचा निधी जिल्हाधिकार्यांकडे सुपूर्द!
माथाडी कामगारांना अडवल्यामुळे नरेंद्र पाटील आक्रमक, APMC मार्केट चालू न देण्याचा राज्याला इशारा
व्हिडीओ पाहा :
What is Body immunity system how it works against Corona Virus