काय आहे Mommy Makeover सर्जरी? कोरियोग्राफर फराह खाननेही केली होती, वाचा सविस्तर

प्रसूतीनंतर अनेकदा महिलांच्या ओटीपोटाचा भाग सैल पडतो. ज्यांना या गोष्टीचा त्रास होतो, त्यांच्यासाठी डॉक्टर या नव्या प्रकारच्या सर्जरीचा सल्ला देतात. केवळ महिलाच नव्हे तर पुरुषदेखील ही सर्जरी करून घेतात.

काय आहे Mommy Makeover सर्जरी? कोरियोग्राफर फराह खाननेही केली होती, वाचा सविस्तर
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Mar 30, 2023 | 4:22 PM

शरीराचा एखादा भाग किंवा अवयवाची प्रक्रिया पूर्ववत करण्यास सर्जरी (Surgery) म्हणतात. शरीराच्या एखाद्या भागाला किंवा अवयवाला इजा झाली असेल तर अशा प्रकारची प्रक्रिया सर्जरीद्वारे नीट केली जाते. वैद्यकशास्त्राच्या प्रगतीनुसार, आता अत्याधुनिक पद्धतीने सर्जरी करण्याच्या पद्धती विकसित झाल्या आहेत. केवळ शरीरातील बिघडलेल्या क्रिया दुरुस्त करणेच नव्हे तर काही अवयव आणखी चांगले करण्यासाठीदेखील सर्जरी केली जाते. यापैकीच एक म्हणजे टमी टक (Tummy Tuck) किंवा ममी मेकओव्हर (Mommy Makeover) सर्जरी.

काय आहे टमी टक सर्जरी?

प्रसूतीनंतर महिलांच्या ओटीपोटाचा भाग सैल पडतो. त्यामुळे कधी कधी डॉक्टर या सर्जरीचा सल्ला देतात. केवळ महिलाच नाही तर पुरुषदेखील टमी टक सर्जरी करून घेतात. ४७ वर्षांची बॉलिवूड कोरियोग्राफर फराह खान यांनीही टमी टक सर्जरी केल्याचं मान्य केलंय. यालाच अॅब्डॉमिनोप्लास्टी असंही म्हणतात. ही सर्जरी एवढी का आवश्यक आहे, जाणून घेऊयात…

फायदे काय?

टमी टक सर्जरीद्वारे अतिरिक्त त्वचा काढून टाकली जाते. तर काही प्रमाणात फॅट्सदेखील काढले जातात. याला बॉडी कॉन्टूरिंग सर्जरी असेही म्हणतात. पोटावरील अतिरिक्त चरबी आणि त्वचा या शस्त्रक्रियेदरम्यान काढून टाकली जाते. पण अत्यावश्यक असते, तेव्हाच या सर्जरीचा सल्ला डॉक्टर देतात.

मम्मी मेकओव्ह सर्जरी

प्रसूतीनंतर महिला टमी टक सर्जरी करतात, तेव्हा त्याला ममी मेकओव्हर सर्जरी असं म्हणतात. ३५ ते ४० वयोगटातील महिला अशा प्रकारची शस्त्रक्रिया करतात. टमी टक सर्जरीमुळे काही प्रमाणात ब्रेस्ट रिडक्शनदेखील होते, असे जाणकार सांगतात. प्रसूतीनंतर महिलांचे पोट सैल पडते. मात्र या सर्जरीनंतर महिला पोटाला योग्य आकार देऊ शकतात. प्रेग्नंसीनंतर ६ महिने किंवा वर्षभरानंतर जेव्हा स्तनपान बंद होते, तेव्हा ही सर्जरी करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येतो. शस्त्रक्रियेदरम्यान पोटावर जमलेली अतिरिक्त चरबी काढून टाकली जाते. तसेच अतिरिक्त त्वचाही काढतात. सर्जरीनंतर ६ आठवडे प्रेशर गारमेंट परिधान करावे लागतात.

3 प्रकारची सर्जरी

तज्ज्ञांच्या मते, टमी टक सर्जरी तीन प्रकारची असते. नाभीच्या खालील पोटावरील चरबी आणि त्वचा काढली जाते. ज्या महिलांना भविष्यात अपत्य नको असते, त्या महिला ही सर्जरी करून घेतात. दुसरा प्रकार लायपो अॅब्डॉमिनोप्लास्टी असा आहे. लायपोसक्शनद्वारे चरबी काढली जाते. पोट, मांड्या, जांघेवरील चरबी याद्वारे काढली जाते. हा वजन घटवण्याचा उपाय नाही. त्यानंतर तिसरा प्रकार म्हणजे बेरिअॅट्रिक सर्जरी. अमर्याद वजन असलेल्यांना या सर्जरीचा सल्ला दिला जातो. पोट, जांघ, पाठीच्या खालच्या भागात लटकणारी चरबी या सर्जरीद्वारे कमी केली जाते.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.